Skip to content

एकदा का तुम्ही matured झालात, तेव्हा कळतं की मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणं किती महत्त्वाचं!

एकदा का तुम्ही matured झालात, तेव्हा कळतं की मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणं किती महत्त्वाचं!


मेराज बागवान


‘Maturity’ खूपदा वापरला जाणारा शब्द.अगदी रोजच्या बोलण्यातील.पण ही ‘Maturity’ जेवढी बोलायला सोपी तेवढीच खूप महत्वाची गोष्ट आहे. इतकी महत्त्वाची की, आयुष्य कसे जगले पाहिजे याची जाण ही गोष्ट करून देते.मग Maturity येते म्हणजे नक्की काय होते, माणूस कसा वागतो-बोलतो, कसे बरे आयुष्य जगतो ,इतरांशी कसे वागतो? तर ह्या Maturity त एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. ती म्हणजे, ‘एकदा का तुम्ही matured झालात, तेव्हा कळतं की मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणं किती महत्त्वाचं असत’.

तुम्ही इतक्या वयाचे झालात की Matured झालात असे अजिबात नसते.वयाचा आणि Maturity चा पूर्णपणे संबंध असतोच असे नाही.ही Maturity खूप साध्या साध्या। गोष्टींमधून दिसून येते.खूप छोट्या छोट्या गोष्टी तुमची Maturity दाखवून जातात. जसे की , काही विषय सुरू आहे ,आणि समूहातील एखादी व्यक्ती आपलाच मुद्दा घेऊन अडून बसली आहे.पण त्याक्षणी तुम्ही ती गोष्ट खोडुन न काढता शांत राहता आणि हेच Maturity चे म्हणजेच समजुतदारपणाचे लक्षण आहे.

तुम्ही Maturity होतात ,तेव्हा स्वतःला प्रत्येक वेळी सिद्ध करीत बसत नाही.तुम्ही नेहमी संयम ठेवतात आणि वेळेवर काही गोष्टी सोडून देतात.आणि ह्या गुणाची खरेच फार गरज आहे.जर दोघांपैकी किमान एक जण जरी हा गुण आत्मसात करू शकला तर नक्कीच अनेक वाद-विवाद,भांडणे,कलह टळू शकतात आणि नाती टिकून राहू शकतात.

जेंव्हा तुम्ही समजून घेऊ लागलतात, तेव्हा तुमच्या इतरांविषयीच्या अपेक्षा देखील वाढत नाहीत.किंबहुना तुम्ही कोणाकडून अपेक्षाच ठेवत नाही.आणि हे साध्य तेंव्हाच होते जेव्हा तुम्ही Matured होतात.त्यावेळी मग तुम्हाला शांत राहण्याचे महत्व कुणीही न सांगता समजते.पण हा समजूतदारपणा येण्यासाठी मात्र दृष्टिकोन बदलावा लागतो.आणि स्वतःमध्ये गरजेचे ते बदल देखील करावे लागतात.आणि हे कोणी सांगून होत नाही.तर तुम्हांला स्वतःलाच हे करावे लागते.आणि एकदा का हे जमले की वाद न घालणे किती गरजेचे आहे हे तुमच्या लक्षात येते.

संयम, आयुष्यातील फार मोठी गोष्ट.पण अनेकदा ही सर्वत्र दिसून येत नाही. संयम म्हणजे स्वतःवर ताबा असणे, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणे. आणि एकदा का तुम्ही संयमी झालात की एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तरी देखील तुम्ही कोणताही अट्टाहास न करता, ती गोष्ट स्वीकार करता आणि शांतपणे आयुष्य जगतात.आणि हे सगळं तुम्ही करू शकतात कारण तुम्ही Matured झालेले असतात.

एकदा का तुमच्यात Maturity आली की, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही जशी आहे तशी स्वीकारतात.प्रत्येक मुद्दा सिद्ध करण्याची गरज नसते हे तुम्ही मग जाणू लागतात.शांत राहणे स्वतःसाठी तसेच इतरांसाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हांला समजते.प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही हे तुम्ही स्वीकारतात आणि आयुष्य एक प्रकारे शांती ची वाट धरते.

आयुष्यात पावलोपावली अनेक माणसे भेटतात, अनेक अनुभव येतात, अनेक सुख-दुःखे पाहायला मिळतात, बरेच चढ-उतार येतात आणि ह्या सगळ्यात आयुष्य मात्र जगावेच लागते.कारण ,’काहीही झाले तरी जगायचे सोडायचे नाही ‘ हा विचार म्हणजेच Maturity. आणि कायम तुमच्यात ही Maturity रुजून गेली की मग आयुष्य खडतर जरी असले तरी देखील काहिच फरक पडत नाही.

ही Maturity काय आपोआप येत नाही.स्वानुभव खूप काही सांगून जातात.चुका खूप काही शिकवून जातात.दुःखे,वाईट घटना,माणसे आयुष्याचे रंग दाखवून जातात.भूतकाळ बहुअंगांनी भरलेला असतो.पण ह्या सगळ्यावर फक्त विचार करून, किंवा ह्या सगळ्या गोष्टींना दोष देऊन काहीच उपयोग होत नाही. यातून तुम्ही तेव्हाच Matured होतात जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या अनुभवातून शिकतात, चुका लक्षात घेतात, त्यात सुधारणा करतात आणि त्यातून धडा घेऊन आयुष्यात मागे वळून न पाहता पुढे पुढे चालत राहतात.

थोडक्यात सांगायचे तर, एकदा का तुम्ही Matured झालात की,तेव्हा कळत, प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देण्याऐवजी शांत राहणे किती महत्वाचे असते.वेळेकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात, गरज असते ती संयम ठेवून Maturity दाखविण्याची.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!