Skip to content

एकाच व्यक्तीमुळे रागावरचं नियंत्रण सुटत असेल तर हे उपाय करून पहा.

एकाच व्यक्तीमुळे रागावरचं नियंत्रण सुटत असेल तर हे उपाय करून पहा.


हर्षदा पिंपळे


रोहन आणि रेश्मा एका कॉलेजमध्ये शिकत होते.रोहन कॉलेजमधील हुशार विद्यार्थी होता.त्यामुळे सगळे शिक्षक त्याचं नेहमीच कौतुक करायचे. पण वर्गातील रेश्मा मात्र त्यामुळे फार विचित्र वागायची. तिला स्वतःला खूप वेगळाच attitude होता.तिला वाटायच की वर्गात ति एकटीच स्मार्ट आहे वगैरे. ती नेहमी रोहनला काही ना काही बोलायची. इतरांनी रोहनच कौतुक केलेलं तिला बिलकूल सहन व्हायच नाही.

त्यामुळे ती अनेकदा रोहनबद्दल वेगवेगळे गैरसमज कॉलेजमध्ये पसरवायची. हळुहळू रोहनला या गोष्टीचा प्रचंड त्रास व्हायचा. तो अक्षरशः वैतागून जायचा. त्याची प्रचंड चिडचिड व्हायची. एकदा गप्पा मारता मारता शशांकने सहजच रेश्माचा विषय काढला. आणि रेश्माच नाव ऐकताच रोहन प्रचंड चिडला.

“त्या त्या मुलीचं नावही घेऊ नको.माझ्या डोक्यात जाते रे ती.मला तर ती समोरही नकोशी वाटते.का नाव घेतोयस तु सारखं सारखं त्या मुलीचं ?तुला कळत नाहीयेका…? माझा तीव्र संताप होतोय.”

रोहन शशांकला म्हणाला.

“ठीक आहे नाही घेत मी तिचं नाव. सॉरी यार रोहन्या.पण मला सांग इतका का त्रागा करून घेतोयस…?” शशांक म्हणाला.

शशांक आणि रोहनच्या गप्पा चालूच होत्या.असो,तर हे झालं एखादं उदाहरण.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांचा आपल्याला कधी ना कधी राग येतोच. पण अशीही एखादी व्यक्ती असते की तिचा आपल्याला प्रचंड राग येतो.ती व्यक्ती समोर दिसली,तिचं नाव कानावर पडलं तरी आपली चिडचिड होते.आपला आपल्या रागावरचा कंट्रोल नियंत्रणात राहत नाही.आपण एखादी चांगली गोष्ट करतानाही जर ती व्यक्ती आपल्या समोर आली तरीही ती गोष्ट करणं अनेकदा आपण थांबवतो.

अशावेळी तनामनात केवळ राग आणि द्वेषाचीच भावना निर्माण होते.आणि यामागे असंख्य कारणं असतात यात शंका नाही.त्या व्यक्तीने आपल्याला प्रचंड त्रास दिलेला असतो.आपली फसवणूक केलेली असते वगैरे वगैरे.तर मग अशा वेळी रागावरचं नियंत्रण सुटतं नं…? तर असं रागावरचं नियंत्रण सारखं सारखं सुटणं चांगलं नाही. म्हणून यासाठी काही उपाय करून पहा.जसे की,

*मेडीटेशन:
मेडीटेशनमध्ये प्रचंड ताकद आहे हे आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे.त्यामुळे मेडीटेशन करणं किती महत्त्वाच आहे हे लक्षात घेऊन रोज मेडिटेशन करणे.

*व्यायाम:
व्यायामामुळे शारिरीक आणि मानसिक ऊर्जा मिळते.शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने राहते. मनाचा थकवा फारसा जाणवत नाही.

*विचार करणं थांबवणे:
ज्या व्यक्तीमुळे राग येतो किंवा रागावरचं नियंत्रण सुटतं त्या व्यक्तीचा सातत्याने विचार करणे थांबवणे.कारण जर तुम्ही सातत्याने त्या व्यक्तीचा विचार केला तर त्याने त्रासच होणार आहे.त्यामुळे विचार करत असाल तर तो त्वरित थांबवणे.

*अपेक्षा करणं सोडून देणे:
जर त्या व्यक्तीकडून तुम्ही काही अपेक्षा करत असाल तर त्या अपेक्षा करणं वेळीच सोडून देणे.

*घडलेल्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करणे:
त्या व्यक्तीमुळे आयुष्यात काही चुकीचं घडलं असेल तर ते विसरायचा प्रयत्न करणे.कारण सारखं आठवत राहिलो तर त्याचा त्रासच जास्त होतो.

*निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे:
निसर्गासारखं उत्तम असं काही नाही.त्यामुळे निसर्गाला जवळ करा.निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारा.चालण्याने राग शांत होण्यास मदत होते.राग नियंत्रणात येण्यास मदत होते.

*संगीत/नृत्य:
दोन्हीही गोष्टी राग निवळण्यास,कंट्रोलमध्ये आणण्यास खूप मदत होते. एखादं रॉक साँग लावून बेभान होऊन ठेका धरा.दोन्हीही उत्तम थेरपीझ् आहेत.

*वस्तू फेकणे/आदळआपट करणे टाळणे:
रागावरचं नियंत्रण सुटल्यावर कित्येकांना आदळ आपट करण्याची सवय असते. तर अशावेळी शक्यतो आदळ आपट करणं टाळावे.कारण आदळ आपट केल्यामुळे नुकसान आपलच होणार असतं.त्यामुळे अशा परिस्थितीत शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करणे.

*Self Controlling , anger management या गोष्टी शिकून घेणे.

पाणी पिणे,दीर्घ श्वास घेणे ,शांत राहणे असे अनेक
प्रकारचे काही उपाय किंवा टिप्स तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा.राग येणं ही नैसर्गिक भावना असली तरी तिचा उद्रेक होणं चांगली गोष्ट नाही. त्यामुळे काही गोष्टी नक्की अमलात आणायला हव्यात तरच आपण आपल्यावर नियंत्रण मिळवू शकतो.

तुम्ही तुमच्यावर अशी वेळ आली तर काय करता तेही सांगायला विसरु नका.कशा पद्धतीने तुम्ही व्यक्त होता,तुमचं anger management कोणत्या पद्धतीने करता हे नक्की शेअर करा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!