Skip to content

वारंवार एकच गाणं दररोज ऐकण्याचा नेमका अर्थ काय??

वारंवार एकच गाणं दररोज ऐकण्याचा नेमका अर्थ काय??


मयुरी महाजन


गाणी ऐकणे आणि त्या शब्दांच्या सुरांवरती ते गुणगुणत असणे, व त्यासोबत त्या शब्दांना फील करणे, हे सर्वात मोठी गोष्ट आहे, बघा आपण बरेचदा ज्या वेळेस ज्या मूडमध्ये असतो, आपण नेमकं तशीच गाणं ऐकत असतो, म्हणून गाणी ऐकण्याचा आपल्या मानसिकतेशी खूप जवळचा संबंध आहे, आता तसं पाहिलं तर गाणी ऐकणाऱ्यांमध्ये प्रकार आहेत ,काही रोज गाणी ऐकणारी असतात ,काही मुडनुसार गाणी ऐकणारे असतात, काही दुसऱ्यांनी लावलेली आहेत, म्हणून गाणे ऐकून आनंद घेणारी असतात,

परंतु गाण्यांच्या ऐकण्याच्या पद्धती जरी निराळ्या असल्यात तरी मानवी स्वभावानुसार ते मानवाला सुखावणाऱ्या व माणसाच्या मनाला आनंद देऊन जाणाऱ्या भावना असतात ,पण या सगळ्यात खूप महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते ,ती म्हणजे आपण कुठल्या प्रकारची गाणी ऐकतो , किती वेळ ऐकतो, जर आपण वारंवार एकच गाणं दररोज ऐकत असणार ,तर त्याचा नेमका अर्थ काय ,??

नाही म्हटलं तरी मानवाचे मन हे खूप संवेदनशील असते, त्याला सहज कुठल्याही गोष्टी लागत नाही, आणि लागणाऱ्या गोष्टी या सहजपणाने निघतही नाही, त्यामुळे व्यक्ती स्वतःला गुंतवण्याचा व एकंदरीत गाण्यांच्या माध्यमातून स्वतःला एक प्रकारे व्यक्त करू इच्छितो, गाणे ऐकणे हे आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली बाब आहे,

कारण की आपल्या पंचंद्रियंमार्फत जे सेन्सर आपले काम करतात, त्यापैकी ऐकणे व त्यातून आनंद घेणे हे अप्रतिम गोष्ट आहे ,आपल्या मानसशास्त्रामध्ये गाणी ऐकलेला थेरपीच्या रूपातही वापरले जाते,

जर एखादी व्यक्ती दररोज एकच गाणं वारंवार येत असेल, तर आपण सर्वात आधी त्या व्यक्तीला ते गाणं ऐकत असताना निरीक्षण करायचे, त्या व्यक्तीला ते गाणं ऐकताना हावभाव काय आहेत, त्याचा बारकाईने पाठपुरावा करावा, कारण व्यक्ती असं वारंवार करण्याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण दळलेली असतात,

जसे की त्या गाण्यांमधील शब्द त्या गाण्याचे सूर त्या व्यक्तीच्या आयुष्याशी हुबेहूब मिळत असतात, त्या गाण्याच्या व त्या व्यक्तीच्या जीवनाचा खूप जवळचा संबंध असतो, त्या गाण्याचे बॅकग्राऊंड आपल्याला जे संदेश देतात ,त्या गोष्टीचा त्या व्यक्ती जीवनाशी असलेला संबंध ती व्यक्ती कुणासोबतही शेअर करू शकत नाही,

अशी त्या व्यक्तीची स्वतःची एक विचारसरणी गृहीत धरलेली असते ,त्यामुळे उभ्या आयुष्यात चाललेल्या बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देत व्यक्ती आपल्या आयुष्याबरोबर त्या गाण्यांमधून आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करते ,

वास्तव जेव्हा व्यक्तीला स्वीकारता येत नाही, व व्यक्ती आपल्या जगात वावरू इच्छिते, आपल्या धुंदीत जगू इच्छिते, त्यावेळेस सुद्धा व्यक्ती एकट्यातच आपल्या जगाला अनुभवत गाणी ऐकत असते, गाण्याचा सूर आणि जीवनाचा सुर एकमेकांना इतके हुबेहू मिळत जुळत असतात, की ते कधीकधी जीवनाचा एक भाग कल्पनेतील जीवन चित्रपटाच्या रुपाने समोर घडत आहे ,किंवा घडेल याच्या कल्पनेत त्या गाण्यांच्या सहवासात व्यक्ती स्वतःला गुंतवतो,




गाणं ऐकण्याचा व्यक्तीच्या मानसिकतेची खूप जवळचा संबंध आहे, ती कोणते गाणे ऐकते, व का ऐकते, किती वेळ ऐकते, व कशासाठी, ऐकते, कुठलीही गोष्ट करताना फक्त अति होऊ नये, याची काळजी घेणे, म्हणजे बाकी गोष्टी सांभाळता येतात, त्यामुळे आपल्या आवडीनिवडी जरूर जपाव्यात, जरूर त्याचा आनंद घ्यावा,


परंतु आपली कुठलीही आवड छंद आपल्यावर त्याची हुकूमत होईल, इतकं त्याच्या आहारी जाऊ नये, नंतर त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो, इतका मात्र खर, त्यासाठी आपण आपल्या मानसिकतेला आपल्यानुसार चालवतोय की आपली मानसिकता आपल्याला चालवतेय, ती आपल्यापासून आऊट ऑफ कंट्रोल तर नाहीय ना, ते पाहणे खूप गरजेचे आहे…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

 

1 thought on “वारंवार एकच गाणं दररोज ऐकण्याचा नेमका अर्थ काय??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!