Skip to content

एकाच घरातील दोन स्त्रिया एकमेकांना समजून घेत नाहीत ??

एकाच घरातील दोन स्त्रिया एकमेकांना समजून घेत नाहीत ??


मयुरी महाजन


माणूस म्हणून आपल्याकडे समजूतदारपणा असायला पाहिजेच, अन्यथा माणूस होण्याला अर्थ तरी काय??? समजून घेण्यासाठी कधी मनाचे मोठेपण, तर कधी अनुभवाचे शहाणपण लागते, एक ठिकाणी वाचण्यात आलं होतं की स्त्री हीच स्त्रीची मोठी क्षत्रू आहे, खरं तर मी त्यावर विचार केला की अशी मनोवृत्ती तरी का असेल,??? किंवा ज्यांनी हे विधान केलं त्यांना तसे अनुभव तरी आलेले असावेत, किंवा त्यांना निदर्शनास तरी आले असावेत, म्हणून एव्हाना सगळ्या स्त्रिया हे एकमेकांच्या शत्रू आहेत, असे तरी नाही, पण स्री साठी पहिली अडचण स्त्रीचं असू शकते, पण जोपर्यंत काळाचा प्रश्न येतो, तोपर्यंत मला तरी वाटतं ,की काही विधान ही त्या त्या काळाला तंतोतंत लागू पडणारी असतीलच, पण काळ बदलतो, वेळ बदलते ,पण विधान मात्र तशीच राहतात…..

मी स्वतः सुद्धा एक स्त्री आहे, एकाच घरात असणाऱ्या दोन स्त्रिया व त्यापेक्षा जास्त असणाऱ्या स्त्रियांचे एकमेकांशी होणारे संभाषण, हे त्या त्या वयाच्या टप्प्यावरती त्या प्रसंगात वेगवेगळ्या पद्धतीने होताना दिसते ,खरंतर या निसर्गाने स्त्री ची केलेली जडणघडण ,हे ऐका शक्तीच्या रूपाने केलेली बघायला मिळते, प्रत्येक स्त्रीला तिच्या जीवनात टप्प्याटप्प्याने जे काही बदल घडत जातात ,मग ते शारीरिक स्तरावरती असतील, किंवा मग मानसिक स्तरावरचे असतील, प्रत्येक बदलला प्रत्येक वेळेला सामोरे जावेच लागते,

खरं म्हणजे कुणालाही समजून घ्यायचं असेल, तर त्याच्या बाजूने उभे राहून विचार करावा लागतो, किंबहुना एकमेकांना समजून घेण्याची प्रत्येकाची कुवत वेगवेगळी असते, जसे की 6 सहा या आकडाचा विचार केला तर याबाजूने उभे असणारे व्यक्ती त्याला सहाच म्हणणार, व त्या बाजूने ऊभी असणारी व्यक्ती त्याला 9चं म्हणणार, दोघी बरोबर आहेत, प्रश्न फक्त एकमेकांच्या जागी उभा राहून विचार करण्याचा आहे, त्यामुळे कधी कधी वाटतं की एखाद्याने समजून तरी किती वेळा घ्यावं, प्रत्येक वेळी आपण समजून घेणार ,तर लोक आपल्याला तसं गृहीत धरून चालणार ,हे सुद्धा महत्त्वाचं आहे, म्हणजे समजून घ्यायला लागलो की लोक आपल्याला जास्त समजूतदार समजू लागतात,

एकाच घरातील दोन स्त्रिया मात्र एकमेकांना समजून घेत नाही, स्त्रियांमध्ये कुठेतरी एखाद्या गोष्टीवरून हेवादावा असतोच, तिलाच कसं ,मला कसं नाही, काही वेळेस ते उघडपणे बोललं ही जातं, काही वेळेस माघारी ,पण हेवा मात्र स्री च्या स्वभावाच्या ठाई असलेला गुण बघायला मिळतो, स्त्री या एकमेकांना यासाठी सुद्धा समजून घेत नाहीत ,की ते एकमेकांच्या गरजांना दुहेरी स्थान देताना दिसतात, तुला कशाला त्या गोष्टीची गरज, मला आवडतं ते माझी गरज आहे, असं म्हणून बरेचदा स्वतःच्या गरजांना एका दुसऱ्या स्त्रीच्या तुलनेत कायम वरचढ ठरवणाऱ्या स्रीया एकमेकांना समजून घेताना कमी पडतात,

स्त्री जातीच्या स्वभावाचा जरी वेगळ्या स्त्रीच्या बाबतीत वेगळा अनुभव असला, तरी एक स्त्री ही दुसऱ्या स्रीपेक्षा वरचढ ठरू पाहते, किंवा बरेचदा तुलना करत असते, मग त्यात त्यांचे सौंदर्य असेल, तर कधी जीवनशैली असेल ,किंवा तिलाच कसे सगळे चांगले म्हणतात, या विनोदी भूमिका असतील, पण ते तितकंच जीव्हारी लागलेलं असते,

दोन स्त्रियांमध्ये समजून घेण्याच्या पातळी संघर्ष यासाठी सुद्धा असतो ,की आपल्याला आपल्या हक्काचं काहीतरी गमावण्याची भीती असते, त्यामुळे समजून घेताना त्या पातळीवर तितका संघर्ष दिसून येतो, ती जर मला समजून घेत नाही, तर मी तिला का म्हणून समजून घ्यावं, हा सुद्धा त्यात महत्त्वाचा मुद्दा असतो ,परंतु या ठिकाणी एकच वाटतं की आपण कोणाला समजून घेणार नाही, तर आपल्याला कोणी समजून घ्यावं ही अपेक्षा तरी का म्हणून ठेवावी…


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एकाच घरातील दोन स्त्रिया एकमेकांना समजून घेत नाहीत ??”

  1. ती जर मला समजून घेत नाही तर मी तरी किती वेळा समजून घ्यावं, असं नक्कीच वाटू शकतं (नेहमी समजून घेणाऱ्याला)…. किती वेळा अपमानित व्हायचं?…. शेवटी आत्म आदर(सेल्फ रिस्पेक्ट) आहे की नाही

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!