Skip to content

एक स्ट्रॉंग व्यक्ती स्वतःच्या इमोशन्स बाजूला सारून जे लॉजिकली घडू शकतं त्यावर विश्वास ठेवते.

एक स्ट्रॉंग व्यक्ती स्वतःच्या इमोशन्स बाजूला सारून जे लॉजिकली घडू शकतं त्यावर विश्वास ठेवते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


एमोशन, भावना आताच्या काळात या शब्दाला खूप महत्त्व आलं आहे. आताचा माणूस हुशार आहे, प्रगल्भ आहे पण तितकच पुरेस नाही. आता IQ सोबतच EQ म्हणजेच इमोशनल कोशन्ट किती महत्त्वाचा आहे याची जाणीव सर्वामध्ये पसरत चालली आहे. दृढ होत चालली आहे. शाळा, कॉलेज, कंपनी इथे व्यक्तीच्या इंटेलिजन्स बरोबरच त्याचा भावनिक बुध्यांक पण पाहिला जातो.

माणूस फक्त हुशार असण पुरेस नसून त्याला स्वतःच्या भावना नीट ओळखता येणं, त्यांना नीट व्यक्त करता येणं, त्यांचा व्यवस्थापन करता येणं, इतरांसोबत चांगले नाते संबंध प्रस्थापित करण असेल, त्यांना समजून घेणं असेल या गोष्टी आता खूप गरजेच्या आणि महत्त्वाच्या आहेत. भावनिकदृष्ट्या स्थिर असलेली व्यक्ती कठीण प्रसंगात गांगरून जात नाही. ती संयमाने काम करते.

हे सर्व केव्हा होत जेव्हा खरच व्यक्ती भावनिकदृष्ट्या भक्कम असते, त्या व्यक्तीचा भावनिक गुणांक उच्च असतो. कारण भावना या सर्वांना जाणवतात. आपल्या मेंदूच्या रचनेत ते आहे. मेंदूमधील amygdala हा जो भाग आहे त्याला भावनांच केंद्रस्थान मानलं जातं. त्यामुळे अशी कोणतीही व्यक्ती नाही जिला भावना जाणवत नाहीत. सर्वांना त्या जाणवतात.

काही मानसिक आजार किंवा अवस्था आहेत जिथे माणसाला भावना जाणवतात पण व्यक्त करता येत नाहीत. पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण विचार केला तर माणसाला आनंद होतो, दुःख, राग, चिंता, भीती, उत्साह या सर्व भावना त्या त्या वेळी जाणवतात.

या बाबतीत सर्व व्यक्ती एकाच पातळीवर येतात. पण मग तरीही काही व्यक्ती भावनिक असतात अस म्हटल जात, खूप संवेदनशील, काही व्यक्ती कठोर आहेत अस म्हटल जात. इतकं की यांना मनच नाही अस पण कित्येकदा ऐकून घ्यावं लागतं. तु रुक्ष आहेस, तू दुसऱ्यांचा विचार करत नाही, मन जपता येत नाही अशी बोलणी ऐकून घ्यावी लागतात.

हा फरक कसा पडतो? तर तो भावना ओळखण्याच्या व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळेच. ज्या व्यक्ती खूप जास्त भावनिक असतात त्या मनाने नाजूक असतात. अश्या व्यक्तींना कोणी काही बोललं तर लगेच लागत. मन इतकं संवेदनशिल असत की समोरचा काही पटकन बोलून गेला तर वाईट वाटत, रडू येत. कोणतीही भावना प्रमाणाच्या बाहेर जाणवणे.

या ज्या अती भवनिक व्यक्ती असतात त्यांचा बरेचदा चुकीचा फायदा घेतला जातो. याच कारण त्यांना manupilate करण तुलनेनं सोपं असत. समोरच्या व्यक्तीने डोळ्यातून जरा अश्रू गाळले, जरा प्रेमाने बोलली तरी या पाघळतात. अस करून आपल्याला हवी ती गोष्ट यांच्याकडून करून घेतली जाते.

आपल्याला स्वतः ला याचा अनुभव असेल किंवा आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतील ज्यांचा असा स्वभाव असेल. बुध्दी पेक्षा मन काय सांगत हे ऐकावं अशी एक त्यांची मानसिकता असते. यामुळे बरेचदा असे निर्णय घेतले जातात ज्यातून नुकसानच होते.

याउलट भावनिकरित्या भक्कम व्यक्ती असते. स्वतःच्या भावनांना नीट ताब्यात ठेवणं, त्यांना नीट व्यक्त करण अश्या व्यक्तींना नीट जमत. त्यामुळे भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. काहीही करायचं असेल तर त्याच्या मागे लॉजिक म्हणजेच साध्या भाषेत तर्क लावला जातो.

सदसद्विवेकबुद्धी वापरली जाते. आपण जे काही करत आहोत त्याचे पुढे जाऊन काय परिणाम होतील याचा ही व्यक्ती नीट विचार करते. आता आपल्याला ही गोष्ट बरोबर वाटते पण दीर्घकालीन फायद्याची आहे का हे तपासल जात. अश्या व्यक्ती पटकन कोलमडून जात नाहीत. समोरच्याला वाईट वाटेल किंवा चुकीचं वाटेल म्हणून भावनिक होऊन अस काही करत नाही ज्यातून पुढे जाऊन नुकसान होईल. याउलट नीट तार्किक विचार करून जे योग्य आहे तस वागते.

जेव्हा अश्या प्रकारे व्यक्ती वागते तेव्हा बरेचदा तिला कठोर किंवा भावनाशून्य मानलं जात. पण अस नसत. आधी म्हटल तस भावना या सर्वांना जाणवतात कारण त्या आपल्या शारीरिक रचनेचा एक भाग आहेत. फरक इतका आहे की या व्यक्ती भावनेच्या आहारी जात नाहीत. वाहवत नाहीत. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जिथे आपल्याला भावनिक होऊन चालत नसत. तिथे नीट विचार करूनच वागावं लागतं.

इथे आपल्याला कितीही काहीही वाटलं तरी ते बाजूला साराव लागत कारण तेच योग्य असत. करीअर च्या दृष्टिकोनातून आपलं मूल बाहेर जात असेल तर आपण त्याला तिथे कश्या पद्धतीने नीट राहता येईल यासाठी प्रेरित करण अपेक्षित असत, पुढील आयुष्यासाठी प्रेरणा देणे आवश्यक असत.

इथे आपणच खूप जास्त भावनिक झालो तर समस्या मुलासाठी पण निर्माण होतात. म्हणून भावनिकदृष्ट्या भक्कम असण आवश्यक आहे. आणि अस करण म्हणजे आपल्या मनातल्या भावनांना दाबून टाकणं, नष्ट करण अस नाही. तर त्याच नीट व्यवस्थापन करण, त्यांना योग्य वेळी योग्य प्रमाणात व्यक्त करण अस आहे. अस केल तर आपल्या समस्या कमी होतील आणि आपल्या समोरील गोष्टी सोप्या होतील.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!