एक स्त्री आयुष्यभर स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षा लपवत असते. कारण…
टीम आपलं मानसशास्त्र
An English man : why Indian ladies do not shake hand?
Swami Vivekanand : can an ordinary citizen of your country shake hands with the Queen?
English man: No…
Swami Vivekanand : In our Country each and every women is a Queen….
खरोखरच बघा भारतीय स्त्रिया आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. पण पहिल्यापासून कोणी हात पुढे केला तर दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याची किंवा पाया पडून वाकून नमस्कार करण्याची स्त्रीची अदब ! स्त्रीने तिचा स्वतः चा राखलेला दर्जा.
आपण जर भारताचा विचार केला तर स्त्री चा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा ती मर्यादाशील. लज्जा , आणि आदर करणारी अशी च प्राथमिक प्रतिमा डोळ्यासमोर येते. अर्थात आता स्त्रिया ही बऱ्याच मॉडर्न झाल्या आहेत.
किती ही सुधारणा झाली, मुली उच्च शिक्षित झाल्या तरी ही एक स्त्री आयुष्यभर स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षा लपवत असते. हे अगदी खरे. कारण…काय असावीत ?
१. स्त्री ही अतिशय भावनिक , संवेदनशील असते आणि ती कायम इतरांना जपत आलेली असते. : बरेचवेळा स्त्री ही इतरांना खूप सांभाळून घेत असते. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यातून तिचा हा गुण आहे की ती कायम इतरांना जपत आलेली असते.
मग वडीलधारी मंडळी असतील तर त्यांचा मान राखायचा. त्यांना कोणताही विरोध करायचा नाही ते जे सांगतील ते ऐकायचे .आपली इच्छा असो अथवा नसो त्यांचेच विचार किंवा इच्छा असतील तसे वागायचे. कारण पूर्वापार पासून देण्यात आलेली शिकवण की स्त्री ने विरोध करायचा नाही.
याखेरीज आपली पुरुष प्रधान संस्कृती यामुळे वडील, नवरा किंवा मुलगा या कोणालाच स्त्री विरोध करू शकत नाही.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरातल्या मोठ्या स्त्रिया , किंवा बरोबरीच्या स्त्रिया यांचे विचार ही असेच की आम्ही हेच करत आलो आहोत तुला ही असेच वागावे लागेल. त्यांना असे वागावे लागले म्हणून पुढच्या पिढीत बदल घडवून आणण्याचे मार्ग , ताकद त्यांच्यात नाहीत. किंवा असेल तरी ती इच्छा नाही. आम्हाला जसे वागावे लागले तसेच तुम्ही ही वागायचे अशी वृत्ती. त्यामुळे स्त्री ही तिच्या इच्छा बाजूला सारून कायमच इतरांच्या इच्छे प्रमाणे वागावे लागते.
२. बरेचवेळा स्त्रीला तिच्या आकांक्षा लपवाव्या लागतात. किंवा इच्छा आकांक्षा या बाजूला ठेवायला लागतात. कारण काय तर स्त्री वर असणाऱ्या सर्वात जास्त जबाबदाऱ्या. स्त्री ही गृहिणी ही असते. स्त्री घरात , बाहेर ,. मुलांच्या करिता , घरासाठी, कुटुंबासाठी दिवसरात्र झटत असतें .
बरेचवेळा घरच्यांच्या जबाबदाऱ्या , आजारपणे , घरातल्या वृध्द व्यक्ती यांची देखभाल , मुलांची शिक्षण, शाळा , meetings , classes , त्यांचे अभ्यास घेणे , त्यांना वेळेत पाठविणे किंवा स्वतः सोडून येणे याकरिता कायम वेळ द्यावा लागतो. नवरा त्याचे ऑफिस वेळा , डबे , खाणे पिणे , त्यांच्या करिता कायम तत्पर राहावे लागते.
अशा वेळेस स्वतः चे कार्यक्रम बरेचवेळा रद्द करावे लागतात. कुठे बाहेर जायचे असेल , काही स्वतः करिता वेळ द्यायचा असेल , किंवा ऑफिस असेल तरी ऑफिस आणि या जबाबदाऱ्या ही कसरत करत सगळे सांभाळावे लागते बरेचवेळा तो ताण असह्य होतो. सततची धावपळ , ताण याचा शरीरावर परिणाम होतो.
याखेरीज जेव्हा बाळंतपण होते तेव्हा बाळाची जबाबदारी , त्याचा सांभाळ यात बरेचवेळा अडकून पडायला होते. एक तर दीर्घ कालीन सुट्टी किंवा मग आहे हा जॉब सोडणे आणि घरात पूर्ण वेळ लक्ष देणे हा पर्याय उरतो.
मग थोडक्यात आपले कितीही चांगले करिअर असेल तरी त्यात प्रगती करण्याची इच्छा , आकांक्षा या लपवून सद्य परिस्थती चा स्वीकार करून सामोरे जावे लागते.
३. बरेचवेळा लग्नापूर्वी काम किंवा नोकरी करणारी स्त्री ही लग्नानंतर कुटुंब , घरचे , नवरा , घरतले सासू सासरे यांच्या इच्छेविरुद्ध स्त्री कोणते स्वतः चे निर्णय घेवू शकत नाहीं. तिला तेवढी मोकळीक नसते. लग्नानंतर नोकरी करू नको हा अट्टाहास असेल तर त्यातून तिच्या इच्छा, आकांक्षा या मागे टाकाव्या लागतात.
४. कुमारिका असताना जरी स्त्री ही नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसाय करणारी असली तरी ती तेच बरेचवेळा सुरू ठेवू शकत नाही कारण सासरच्या लोकांची बंधने , त्यांच्या इच्छा थोपविल्या जातात त्यात आपल्या इच्छा लपवाव्या लागतात.
५. पुरुषांच्या प्रमाणे स्त्री पटकन स्वतः पुरते विचार करून बाहेर पडू शकत नाही. तिच्या जबाबदाऱ्या , कर्तव्य यात अडकून पडते. प्रसंगी ती त्या बाहेर जावू शकत नाही.
उदाहरणार्थ : ऑफिस तर्फे परदेशात जाण्याची संधी तिला मिळाली असेल पण मूल खूप लहान असेल किंवा दहावी बारावी ला असतील, board exam , महत्वाच्या परीक्षा असतील तर पुरुष मुलांची जबाबदारी स्त्रीवर टाकून कधी ही अन् केव्हाही जावू शकतो. मात्र स्त्री तिची कर्तव्य , जबाबदाऱ्या यात अडकून पडते. आणि बरेचवेळा मिळालेली चांग्ली संधी हातची घालवते. आपल्या इच्छा , आकांक्षांवर पाणी फेरते.
६. मुलगा मुलगी भेदभाव : भारतात अजून ही बरेच ठिकाणी मुलगा मुलगी भेदभाव आहे. मुलींना शिक्षण नाही द्यायचे. तर सगळे घरचे करून मुलींनी शिक्षण घ्यायचे. यात बरेचवेळा मुलीच्या शिक्षणाकरिता असे विचार करतात कशाला तिची इच्छा विचारात घ्यायची. तिला काय करायचे हे काय महत्वाचं नाही. कारण चांगले शिक्षण दिले तरी तिचे आज ना उद्या लग्न होणारच. मग घर , जबाबदाऱ्या या आहेतच. मग कशाला तिच्यावर फार पैसे तरी खर्च करा . साधे शिक्षण देवू .नाही शिकली तरी काही बिघडत नाही असे विचार करणारे. किंवा मग किती ही खर्च केला , नोकरी लागली तर लग्नानंतर सासरचा फायदा होणार आपले नुकसान च की आपला खर्च होणार . मग कशाला शिकवा हि वृत्ती ही दिसून येते . अशावेळी मुलगी कितीही हुशार असेल, महत्वाकांक्षी असेल , हुशार असेल तरी ही तिला तिच्या इच्छा या माराव्या लागतात.
७. नोकरी करणारी स्त्री वेळेत घरी पोहचू शकली नाही . कारणे अनेक असतात. वाटेत करावी कामे , भाजी , दळण , इस्त्री चे कपडे , बिल भरणे यातून वेळ झाला किंवा रोज कामाच्या ठिकाणी वेळ झाला तर समजून घेणारी घरची असतील तर ठीक अन्यथा रोजचे वाद , भांडणे , अगदी मारामारी पर्यंत वेळ येत असेल तर स्त्री सगळे सोडून घरी बसणे स्वीकारते कारण रोजचे वाद नकोत. इथेही ती तिच्या इच्छा लपवून च ठेवते ना. का तर भांड्याला भांडे नको लागायला आणि त्यातून जास्त वाद नकोत व्हायला.
बरेचवेळा स्त्री स्वतः करिता फार कमी जगते. तिचा आनंद आपल्या लोकांना आनंद देण्यात , सुखी ठेवण्यात त्यांची काळजी घेण्यात , त्यांना आपल्या प्रेमाने आणि आपुलकिने सगळी कर्तव्य करत असताना तडजोड करावी लागते ती काही वेळेस अनिच्छेने तर काही वेळेस जबरदस्तीने तर काही वेळेस स्वतः मनाने ती स्वेच्छेने करते
यातून तिला तिच्या इच्छा आणि आकांक्षा लपवून ठेवणे भाग पडते.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
