Skip to content

एक NEGATIVE मन तुम्हाला कधीच POSITIVE आयुष्य देऊ शकत नाही.

एक NEGATIVE मन तुम्हाला कधीच POSITIVE आयुष्य देऊ शकत नाही.


मयुरी महाजन


प्रत्येकाचा आयुष्याचा प्रवास जरी वेगवेगळा असला, तरी त्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाच्या दृष्टिकोन मात्र तितकाच निराळा असलेला बघायला मिळतो, कदाचित आपण काही गोष्टींवर विश्वास ठेवायला कधीच तयार नसतो, आणि या जगात संपूर्ण गोष्टी करण्यासाठी फक्त विश्वासच पुरेसा आहे, कारण जग कितीही आधुनिक झालं, तरी ते शेवटी विश्वासावरचं चालतं, राँन्डा बर्न यांचे रहस्य नावाचं पुस्तक आहे, जे आपल्याला आपल्या विचारशक्तीवर आणि त्या विचारानुसार घडत जाणारी आपली जीवन पद्धती याबद्दलचे विश्लेषण सांगते,

आपल्या मनात येणाऱे विचार म्हणजे चांगले , किंवा वाईट नसून जर आपण ध्यान करत असाल, तर त्यात आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे आपल्या मनात येणार्‍या विचारांना आपल्याला थांबवायचे नाहीयेय, येणाऱ्या विचारांना येऊ द्यायचे ,जाणाऱ्या विचारांना जाऊ द्यायचे, जरी एखाद्या प्रसंगात वारंवार आयुष्यात त्याचं गोष्टी घडत असतील, तर त्यावेळी व्यक्ती निराश होते, हाताश होते, निगेटिव्ह विचार सारखे मनात येतात.

व्यक्ती त्या निगेटिव्ह विचारांना इतकीच चघळते की समोर काही पॉझिटिव्ह असले तरी व्यक्ती त्याकडेही निगेटिव्ह पद्धतीनेच बघते, व तसाच विचारही करू लागते, त्यामुळे आपण नेहमी लक्षात असू द्यायला हवं ,की एक नेगेटिव्ह मन आपल्याला कधीच पॉझिटिव्ह आयुष्य देऊ शकत नाही, परिस्थिती आणि घटना प्रसंगच काही वेळेला निगेटिव्ह विचारांच्या जाळ्यात अडकवतात ,पण एक गोष्ट कायम आपण लक्षात घ्यायला हवी, की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला दोन पैलू असतात, आपण त्यातून कुठला निवडतो, त्यावरती आपले आयुष्य अवलंबून असते,

बघा समजण्यासाठी आपण सोपे उदाहरण घेऊ टीव्ही वरती सिरीयल बऱ्यापैकी सर्वच पाहतात, त्या प्रत्येक सिरीयलचा विचार केला, तर बघा असं आयुष्यात सदा सर्वकाळ एकदम सुरळीत चाललेलं आहे, happy happy, असं कधी दाखवलेले आहे का ???काही काळासाठी आनंद असतो, काही काळासाठी दुःखही असतं ,आणि काही काळासाठी एकमेकांवरती रागही असतो, प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेसाठी कधीच नसते, आणि कधीच नसणार ….आयुष्य क्षणभंगुर आहे, त्या आयुष्याला प्रत्येक क्षणामध्ये जगून घ्यायला हवं…

जीवनाची सिरीयल सुद्धा काही अंशी अशीच चालत राहते, जर आपण आपल्या मनाला सांभाळू शकलो, तर आपण प्रत्येक गोष्ट सांभाळू शकतो ,आणि मन सांभाळण्याचा एक मार्ग म्हणजे आपले विचार ज्या पद्धतीचे विचार आपण ठेवणार ,तसेच मन घडत जाते, व आपल्यासमोर सुद्धा तसेच घडतांनाही दिसतात,

कधीकधी दोन व्यक्तींवर परिस्थिती सारखीच असते, परंतु त्यात ज्याचे मन पॉझिटिव्ह असतं, त्याच्या आयुष्यात ती व्यक्ती अगदी त्या परिस्थितीतून धडा घेऊन काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टींच्या शोधात असते, तर तीच परिस्थिती जेव्हा निगेटिव्ह विचारसरणी ठेवणारी व्यक्ती सांभाळते ,तेव्हा ती परिस्थितीला दोष देणार ज्यांनी साथ नाही दिली,

त्या व्यक्तींना त्या गोष्टीसाठी गृहीत धरणार, व सतत यांच्यामुळे असं त्याच्यामुळे तसं, असे आरोप करून स्वतःच्या परिस्थितीचा खेळखंडोबा करणार, परंतु आपण नेहमीच लक्षात घ्यावे, आपण जे काही आहोत आणि जे काही नाही आहोत, त्याचे संपूर्णता जबाबदार आपण स्वतःच आहोत ,

आपल्याचं हातात आपल्या आयुष्याची दोर आहे, त्यामुळे परिस्थिती बदलत राहणार, आपण त्याला सामोरे कसे जातो, त्यावरून आपल्या आयुष्याची पुढची रूपरेषा ठरत जाते ,हा कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात ,पण त्या गोष्टी आपल्याला काय शिकवायला आलेले आहेत हे शोधणे महत्त्वपूर्ण आहे.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!