एक कणखर महिला कधीच give up करत नाही, ती रात्रभर रडेल पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार करेल.
पुजा सातपुते
आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्याला जे पाहिजे असतं ते मिळत नाही किव्हा उशिरा मिळतं. एक तर ते आपल्या नशीबात नसतं किव्हा ते मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो आणि हाच स्ट्रगल आपल्याला घडवतो आणि कणखर बनवतो.
स्त्री व पुरुष निसर्गाने बनवलेले दोन घटक आहेत. दोघांनाही निसर्गाने वैशिष्ठ गुण दिले आहेत. पुरुष हे कणखर असतात तर महिला या जरा हळव्या असतात आणि दोघेही आपआपल्यापरीने कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत असतात. भलेही पुरुष कठीण परिस्थितीला निर्भयपणे सामोरं जातात पण कुठेतरी त्यांना त्यांच्या रागामुळे किव्हा असहनशीलतेमुळे give up करावंसं वाटतं. अश्या वेळीस त्यांना कोणाच्यातरी सपोर्टची गरज असते आणि ती गरज फक्त त्यांच्या आयुष्यातील महिलाच पूर्ण करू शकते. कारण निसर्गानी पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त सहनशील बनवलं आहे आणि याच सहनशीलतेमुळे कुठलाही कठीण प्रसंग ती आरामात सोडवू शकते.
कदाचित ही गोष्ट सगळ्यांना पटणार नाही पण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता लढाईची वृत्ती ही जन्मताच महिलांना मिळालेली आहे आणि याच वृत्तीमुळे घरामधल्या सदस्यांनाही नवीन उमेद मिळत असते.
काही जणांना हीच सहनशीलता विकनेस वाटते खरी आणि बरेचदा त्याचा गैरफायदाही घेतला जातो. पण ही विकनेस नसून तिची एक स्ट्रेन्थ आहे. या बळावर ती स्वतःसकट स्वतः च्या जवळच्या माणसांना डिप्रेशन मधून बाहेर काढते.
कुठल्याही कठीण परिस्थितीत एक कणखर महिला कधीच give up करत नाही, ती रात्रभर जरूर रडेल पण दुसऱ्या दिवशी स्वतःला व स्वतः बरोबर तिच्या खास लोकांना कठीण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार करेल. हे अश्रू तिचे विकनेस नसून स्ट्रेन्थ आहेत कारण जेव्हा ती स्वतःचं मन मोकळं करते तेव्हा तिला तिच्या समोर उभ्या असलेल्या कठीण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मदत होते.
आपण आपल्या घरात बघितलं असेल. घरातले छोटे असो किव्हा मोठे, जेव्हा आपल्याला बरं नसतं तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला आपली आई हवी असते किव्हा घरात जी कोणी काळजी घेणारी महिला असेल ती हवी असते, मग ती बायको असो, मुलगी असो किव्हा बहीण. तिचा एक स्पर्श, आधार, तिचा हसरा चेहरा कुठलंही दुखणं झेलण्याची ताकत देतं. प्रॉब्लेम्स कितीही मोठे असले तरी ती सय्यमाने त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करते. असं नाही की तिला त्रास होत नाही पण ती तो त्रास आतल्या आत दाबून सर्वांना धीर देत असते.
काही जणांच्यामते महिला खूप रडक्या असतात. त्यांना असं वाटत असतं की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर रडणाऱ्या कठीण परिस्थितीला कसं सामोरं जाणार. पण बरेचदा तुम्ही बघितलं असेल छोट्या गोष्टींवर रडणाऱ्या महिला मोठ्या अडचणींवर हसत हसत मात करतात. भले त्या एकांतात रडतात पण कणखरपणे वाईट परिस्थिती हाताळतात. महिला रडक्या नाहीत तर त्या हळव्या असतात आणि आपल्या जवळच्या लोकांचं दुःख त्यांना बघवत नसतं.
बरेचदा तिचा हाच स्वभाव तिच्या अंगाशी येतो आणि तिला ग्रांटेड घेतलं जातं. सहजपणे सगळं विसरून तिला मूर्ख म्हंटलं जातं. हे सगळ्या घरी होतंच असं नाही कारण काही जणांना खूप जाणीव असते आणि अशी लोकं खरंच आदरायुक्त आहेत. पण कित्तेगदा तिचा स्वाभिमान सहजपणे दुखावला जातो. पण तरी सुद्धा सगळं विसरून ती सगळ्यांना सपोर्ट करत राहते. एक नव्यानी स्वतः मध्ये आणि आजूबाजूच्या लोकांच्यात उमेद जागवत असते. काही जणांना कधी कधी तिचं सांगणं कटकट वाटतं खरं पण ती नेहमी योग्य त्या गोष्टीच सांगत असते.
म्हणून तुमच्या आयुष्यात ज्या कोणी महिला असतील त्यांचा आदर करा, त्यांना ग्रांटेड नका घेऊ. सपोर्ट करणारे, समजून घेणारे सगळ्यांना भेटत नसतात. तुमच्या आयुष्यात जर कोणी असे असतील तर त्यांची रिस्पेक्ट करा आणि त्यांना नेहमी जपून ठेवा. तिला फार काही हवं नसतं. फक्त तिच्या अस्तित्वाची जाणीव, प्रेमळ शब्द आणि तुमचा थोडा वेळ हवा असतो.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदरच ठेवा. आयुष्यात give up न करता कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायचा प्रयत्न करा. आपल्या खास लोकांना जपा. काही दिवसात परिस्थिती बदलते पण आपली खास लोकं आपल्याशी कुठल्याही परिस्थितीत नेहमी तशीच वागतात आणि परिस्थिती किव्हा मूड प्रमाणे बदलणारी माणसं आपली कधीच खास होऊ शकत नाहीत.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Encouraging for all women who are facing this todays daily .