Skip to content

कालबाधित सत्य ! दुःखे न पचवता येणारी व्यक्ती स्वतःच्याच आयुष्याचा छळ मांडते.

कालबाधित सत्य ! दुःखे न पचवता येणारी व्यक्ती स्वतःच्याच आयुष्याचा छळ मांडते.


मेराज बागवान


दुःख आहे म्हणून आयुष्याला खरा अर्थ आहे.दुःखच माणसाला सर्व काही शिकविते.दुःखच नसेल आणि फक्त सुख असेल तर त्याला जीवन म्हणता येणार नाही.दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे.म्हणून दुःखच आपल्या आयुष्याची दिशा ठरविते.पण ह्या दुःखातून बाहेर मात्र लवकरात लवकर पडता आले पाहिजे. कारण,’दुःखे न पचवता येणारी व्यक्ती स्वतःच्याच आयुष्याचा छळ मांडते.’ आणि हे मात्र कालबाधीत सत्य आहे.

कोमल एक सर्वसामान्य मुलगी.लग्न झाल्यानंतर ती संसारात खूप छान रुळली.तिच्या ह्या सुंदर संसारवेलीवर कळी देखील बहरली.ती एक सुंदर अशा मुलीची आई झाली. ‘अनघा’ असे तिचे नाव.अगदी खूप छान चालू होते.अनघा आता वर्षाची होऊन गेली होती. एके दिवशी कोमल, तिचे पती आणि अनघा बाहेर फिरायला गेले होते.एके ठिकाणी थांबल्यानंतर , अनघा बाहेर बागडू पाहत होती.आणि त्या उत्साहातच ती अचानक मुख्य रस्त्याकडे धावू लागली.कोमल चे पती तिला धरायला जाणार तोवर एका भरधाव येणाऱ्या मोटारीने अनघा ला जोरदार धडक दिली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

कोणत्याही आई-वाडीलांसाठी आपल्या बाळाचा मृत्यू हा खूप मोठा धक्का असतो.आणि तसेच कोमल आणि तिचे पती मंगेश यांच्या बाबतीत झाले.काळ पुढे पुढे जात होता.घरातील सर्वच जण खूप दुःखी झाले होते, पण त्यातून बाहेर देखील पडत होते.पण ह्या सगळ्यात सर्वात मोठा धक्का कोणाला बसला असेल तर ती होती,कोमल.आईचे प्रेम सर्वात महान आणि खरे असते.सर्वात जास्त आईच आपल्या बाळाला ओळखत असते. कोमल अनघाच्या मृत्यूमुळे खूप खचली होती.तिला जाऊन सहा महिने झाले तरी तिचे आयुष्य आहे तिथेच होते.तिच्या म्रुत्युला ती स्वतःला दोषी मानत होती.नीटपणे काही खात-पित नव्हती. कोणाशी काही बोलत नव्हती.स्वतःला कोंडून घेत होती.

सर्वांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला तरी ती ह्या दुःखातून बाहेर पडत नव्हती.डॉक्टरांच्या उपचारांना देखील प्रतिसाद देत नव्हती.आणि ह्या सगळ्याचा परिणाम तीच्या आरोग्यावर तर होत होताच.पण त्याचबरोबर तिच्या संसारावर देखील होत होता.मंगेश देखील खूप त्रासात होता.पण अनघा हे दुःख पचवू शकली नाही आणि जणू आयुष्याचा छळ मांडू लागली.

अनघा सारख्या अशा अनेक व्यक्ती ,घटना आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. दुःख तर मोठे असतेच.पण ते पचवणे देखील तितकेच गरजेचे असते.कारण आयुष्यभर तेच दुःख घेऊन बसलो तर तुम्ही तुमच्या आयुष्यावर अन्याय करीत आहात.कोणत्या एका दुःखाने आयुष्याला पूर्णविराम लागत नाही.आयुष्य हे शेवटपर्यंत जगावेच लागते.जर तुम्ही तुमचे दुःख पचवू शकत नसाल , तर स्वतःसाठी नाही तर किमान तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी तरी तुम्ही ते दुःख थोडे बाजूला ठेवून त्या व्यक्तींसाठी जगले पाहिजे.

प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या मोठया दुःखातून जात असते.त्यामुळे माझेच दुःख खूप मोठे आहे हे समजणे चुकीचे आहे.ही मोठी दुःखेच जगण्याचा खरा अर्थ शिकवीत असतात.तसेच तुमची दुःखे आणि तुम्ही त्यातून कसा मार्ग काढला हे इतरांना देखील प्रेरणादायी ठरते.त्यामुळे दुःखाच्या क्षणी तुम्ही ठेवलेला संयम , भावनिक समतोल खूप मोलाचा ठरतो.

जी व्यक्ती दुःखातून बाहेर पडत नाही ती आयुष्यात कोणत्याच क्षेत्रांत प्रगती करू शकत नाही.ती व्यक्ती हळू हळू नैराश्यात आणि नकारात्मकतेत जाते.आणि तिचे पूर्ण आयुष्यच धूसर बनते.निर्णय घेण्यास ती व्यक्ती सक्षम राहत नाही.आयुष्यातील नाती, आनंद ती व्यक्ती हिरावून बसते.सतत भूतकाळातच रमते.वर्तमानाचा पूर्ण उपभोग घेऊ शकत नाही.आणि अशा प्रकारे ती व्यक्ती तिच्या आयुष्याचा छळ मांडते.

एक सुप्रसिद्ध वाक्य आहे.’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’.म्हणजेच काय तर, सुख आणि दुःख आपल्या मानण्यावर आहे.दुःखात किती बुडून जायचे आणि किती लवकर त्यातून बाहेर पडायचे हे सर्वस्वी आपल्या हातात असते. एकदा दुःखातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय माणूस कणखर बनत नाही. दुःखाला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे फार महत्वाचे असते.तुम्ही दुःखाला असे हाताळले पाहिजे की दुःखाला देखील पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याआधी विचारच करावा लागेल.

स्वतःच्या आयुष्याचा छळ किती जरी दुःख आले तरी मांडू नका.कारण आयुष्य कधीच ,कोणासाठीच आणि कोणत्याही कारणास्तव थांबत नाही.आणि तुम्ही देखील ते थांबू देऊ नका.आणि हे देखील कालबाधित सत्य आहे.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “कालबाधित सत्य ! दुःखे न पचवता येणारी व्यक्ती स्वतःच्याच आयुष्याचा छळ मांडते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!