दुसऱ्यांना सतत दोष देणाऱ्या व्यक्तींनी हा लेख जरूर वाचावा
काव्या गगनग्रास
पीयूष, चाळीत राहणारा एक सर्वसाधारण मुलगा. आज त्याच्या आयुष्यातील खूप मोठा दिवस होता. त्याची परिस्थिती जरी सर्वसाधारण असली तरी त्याने त्याच्या बुध्दीच्या जोरावर चांगले शिक्षण घेतले होते. त्याचे पहिल्यापासून स्वप्न होते की आपण शिकून ias व्हायचे. त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते. जेव्हा परीक्षा आल्या तेव्हा त्याने चांगला अभ्यास केला. परीक्षेत तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण देखील झाला. त्याला काही दिवसांनी इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात आला. पण या मधल्या दिवसांमध्ये काही घटना पीयूष च्या आयुष्यात घडल्या.
त्या अश्या की जेव्हा त्याला समजल आपल्याला काही दिवसांनी इंटरव्ह्यू साठी बोलवलं आहे. त्या दिवशी रात्री झोपताना एक काळा बुरखा घातलेला माणूस त्याच्या समोर आला. पीयूष त्याला पाहून घाबरला. तो माणूस समोर येऊन म्हणू लागला की नुसत परीक्षेत पास होऊन, नंबर काढून काही होत नाही. खरी परीक्षा इंटरव्ह्यू मध्ये असते. तिथे तर बरीच जण असतात. खूप तज्ज्ञ लोकं इंटरव्ह्यू घेत असतात. थोडीच सहजासहजी सिलेक्ट होता येणार तिथे. इतका अभ्यास करून तिथे सिलेक्ट झाला नाही तर काय होणार रे तुझ? वाया गेलं सर्व!
त्याच हे बोलण ऐकलं मात्र आणि पीयूष च अवसान गळून गेल. अभ्यासाचं नाही तितकं त्याने इंटरव्ह्यू च टेन्शन घेतलं. बरं हा बुरखा घातलेला माणूस त्याला एकदाच दिसला आणि निघून गेला अस पण नाही. दिवसातून एकदा तरी तो दिसायचाच आणि पीयूषचा आत्मविश्वास घालवून टाकायचा.
अस हे चार दिवस तरी चाललं. पीयूषला या सर्वाचा आता कंटाळा आला. कारण एकतर तो माणूस कोण हे त्याला समजत नव्हत. तो कोणाला काही सांगू शकता नव्हता कारण हा माणूस फक्त त्याला दिसत होता. लगेच गायब होत होता. एक दिवस त्याने ठरवलं की या माणसाचा खरा चेहरा पाहायचा. जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी ती व्यक्ती पुन्हा आली आणि काही बोलू लागली तेव्हा पीयूष ने लगेच पुढे जाऊन त्याचा बुरखा, त्याचा तो मास्क बाजूला केला.
आश्चर्याचा धक्का बसला त्याला; कारण तो माणूस, ती व्यक्ती जी त्याला सारखी नकारात्मक विचार देत होती ती दुसरी तिसरी कोण नसून तो स्वतः होता. ती व्यक्ती म्हणजे दुसर कोण नसून त्याच्याच मनाचा आवाज होता. ते त्याचेच नकारात्मक विचार होते ज्यांनी अस मूर्त रूप घेतलं होत आणि त्याला मागे खेचत होते.
हळू हळू त्याला काहीतरी उलगडू लागलं. जेव्हा त्याला इंटरव्ह्यू बद्दल समजल होत तेव्हा हे सर्व सुरू झाल होत. त्याने या इंटरव्ह्यू च्या प्रक्रियेबद्दल आधी बऱ्याच जणांकडून ऐकलं होत आणि त्यातून त्याचे हे विचार सुरू झाले होते. तो बुरखाधारी माणूस कोणाला दिसत नव्हता कारण हे सर्व त्याच्या आत चालू होत. त्याच्या भीतीला, चिंतेला त्याचे स्वतःचे विचारच कारणीभूत होते. दुसर कोणी नाही तर तोच त्याचा शत्रू बनू पाहत होता.
पण हा बुरखा जेव्हा खाली उतरला तेव्हा त्याला या सर्वाची जाणीव झाली. त्याला समजल जर हा शत्रू त्याने स्वतः निर्माण केला आहे तर त्याला घालवण देखील त्याच्या हातात आहे. अजून काही अवकाश होता. त्याने इंटरव्ह्यू ची चांगली तयारी केली. विश्वासाने त्याने इंटरव्ह्यू दिला आणि तो त्यात पास झाला.
तर अशी होती ही पीयूष ची कहाणी. मित्रानो आपण कितीही म्हटलं की अमुक एक प्रसंग घडला म्हणून मी अस वागलो, या व्यक्तीमुळे मला अस वागणं भाग पडल, तो माणूस, ती परिस्थिती माझी शत्रू होती. पण हे खरं नाही, आपला सगळ्यात चांगला मित्र आणि आपला सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर ते बाह्य परिस्थती नाही तर आपणच असतो.
आपले विचार असतात. कोणी कसही वागल तरी आपण त्यावर कसा विचार करायचा, आपल्या या विचारांना चांगल ठेवून, आरोग्यदायी ठेवून आपला मित्र बनवायचं जो आपल्याला पुढे जायला मदत करेल की त्यांना चुकीच्या पद्धतीने फिरवून, नकारात्मक करायचं आपला शत्रू करायचं हे आपल्या हातात आहे.
हिटलरच्या नाझी छळ छावणीत असलेल्या, त्या अमानुष छळातून बाहेर पडून जगाला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल विचार करायला लावणाऱ्या एका महान तत्त्ववेत्याचे Viktor frankl चे बोल आपल्याला नक्की अश्या वेळी प्रेरणा देऊ शकतात. ते असे,
“Everything can be taken from a man but one thing: the last of the human freedoms—to choose one’s attitude in any given set of circumstances, to choose one’s own way.” …
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Lekh khup chan ahe
सुंदर
Chhan ahe