नाती टिकवण्यासाठी आपण खूप ऊर्जा घालवतो.
विद्या जाधेकर
सोनुच्या १० वर्ष जुन्या मैत्रीणीच्या आयुष्यात पैसै, नोकरी, शिक्षण, लग्न असे वेगवेगळे टेन्शन चालु असताना सोनुने आपल्याकडुन होईल तेवढी सर्वतोपरी मदत मैत्रिणीला केली. कालांतराने मैत्रीणीच्या आयुष्यात स्थैर्य आले आणि कालांतराने तिने सोनु सोबतचे संभाषन कमी केले. टाळु लागली.
पुढे जेव्हा सोनुच्या आयुष्यात अडचणीचे प्रसंग आले तेव्हा अनेकदा ती एकटी पडली १० वर्ष जपलेली मैत्री सोनुच्या वेळेला कामी आली नाही. सोनु निराश झाली. आपण नक्की कुठे कमी पडलो याचाच विचार करु लागली….
या प्रसंगातुन काही गोष्टी लक्षात येतात…
१ . एकतर सोनुने निष्कारण मैत्रीणीकडुन अपेक्षा ठेवल्या. आपल्या केव्हातरी ती उपयोगी या भावनेने मदत केली गेली. तिला समजुन घेण्यात सोनु कमी पडली.
२. मैत्रीणीने वैयक्तिक स्वार्थासाठी मैत्री टिकवली जोवर आधाराची मदतीची गरज होती तोवर ती घेतली जेव्हा गरज संपली तिचा मुळ स्वभाव समोर आला.
बर्याचदा आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही दिर्घ काळ आपल्यासोबत असतात काहींशी आपले नाते अतिशय घट्ट असते तर काहीं सोबत हव तस ट्युनिंग जुळलेलच नसत..याच नातेवाईक असो की मित्रमैत्रिणी असो की इतर कुणी व्यक्ती…
अगदीच ट्युनिंग न जुळलेल्या व्यक्तिचा आपल्या मनावर तसा विशेष प्रभाव पडत नाही अशा व्यक्तींकडून अपेक्षाही कमीच असतात पण जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत आपले नातेसंबंध चांगले व दिर्घकालीन असतात तेव्हा बर्याचदा त्या व्यक्तीकडून स्वाभाविकपणे अपेक्षा ठेवल्या जातात.
अनेकदा आपल्याला जे लोक अतिशय जवळचे वाटतात तिच समान भावना समोरच्याच्या मनातही आहे हे आपण गृहीत धरून चालतो पण तसे नसल्यास मात्र नाराज होतो.
अनेकदा ते आपल्याला स्वार्थी वाटुन जातात….एखाद्या व्यक्तींच्या संघर्षाच्या काळात आपण त्याला आधार देतो मदत करतो पण जेव्हा कधी ती वेळ आपल्यावर येते तेव्हा मात्र आपल्यासोबत ते लोक नसतील तर त्यांच्याबद्दल राग वाटु लागतो चिड येते.
या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी अनेकदा आपल्याला समोरच्याची बाजु ऐकुन व समजुन घेणे हितकारक ठरत. समजुन घेऊन ही जेव्हा समाेरची व्यक्ती आपला फक्त स्वतः च्या फायद्यापर्यंतच वापर करत होती हे जर लक्षात आल तर स्वतः चे कर्म व भावना यांवर विश्वास ठेवुन त्या व्यक्तीसोबत आपला प्रवास इथपर्यंत च होता असे मानुन त्या गाडीतुन उतरून घेणे अधिक हिताचे ठरते.
मनस्ताप करून दोष देउन आपण स्वतः चेच नुकसान करू शकतो त्यापेक्षा आपल्या कुवतीप्रमाणे समोरच्याची भावना आोळखुन निर्णय करणे गरजेचे बनते. जितके महत्व नाती जपण्याला असेल तितकेच (त्याहुन अधिक) महत्व आपल्या मानसिक आरोग्याचे आहे हे विसरता येणार नाही.
अनेकदा आपण नाती मैत्री टिकवण्यासाठी खुप ऊर्जा घालवतो पण हाती निराशा आल्यावर स्वतः ला त्रास करून घेतो. असे न करता आपण कुणासाठी काही करतो तर ते निस्वार्थी पणे करता यायला हवे आज मी काही केल तर समोरच्याने काहीतरी आपल्यासाठी केलच पाहीजे या भावनेने माणसं दुरावतात. उगीचच गोष्टी तुटेपर्यंत ताणवत बसण्यापेक्षा सोडुन दिल्याने पुढील नुकसान टळु शकते…

Online Counseling साठी !
लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.
तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.

