सन्मानाने जगायचं असेल तर स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखू नका.
टीम आपलं मानसशास्त्र
आपल्याकडे काय क्षमता आहेत , आपल्यात काय ” खासियत” आहे हे आपणच बरेचवेळा समजू शकत नाही. आजकाल जो तो दुसऱ्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो . त्याने तिने असे केले तर मलाही तसेच करायचं आहे. त्याच्या / तिच्या सारखे बनायचे आहे. दुसऱ्याचे आयुष्य हे प्रत्येकाला जगण्याची इच्छा आहे.
पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जसे आहात ते खरचं खूप सुंदर , चांगले आहात. तुमच्यामध्ये भरपूर गुण आहेत. तुम्हाला जर सन्मानाने जगायचं असेल तर स्वतः ला कधीच दुसऱ्यां पेक्षा कमी समजू नका.
दुसऱ्या मध्ये एखादा गुण असेल त्याकडे तुम्ही attract होता. पण म्हणजे तुमच्या मध्ये कमतरता आहेत . तुम्ही कमी आहात असे बिलकुल समजू नका.
आपल्याला मुळात आपल्यात काही कमी आहे याची जाणीव का होते ? तर आपलेच लोक , नातेवाईक आपलेच parents आपल्यावर सतत Hammering करत असतात. त्याच्याकडे बघ तो किती हुशार आहे. त्याच्यासारखा हो. बनण्याचा प्रयत्न कर. हो. तो / ती बघ सगळ्या गोष्टीत पुढे असते / असतो. अभ्यास , खेळ , निबंध , वक्तृत्व , music अशा अनेक गोष्टी करतो / करते . नाहीतर तू – अशी सतत तुलना आपलेच लोक करत असतात. आणि कायम इतरांच्या सारखे बनण्याकरिता प्रोसहन देत असतात.
खरे तर असे psychological pressure न देता तुमच्या मुलांच्यात कोणते गुण आहेत आणि कोणत्या कमतरता आहेत याचा शोध घेण्यास त्यांना मदत करा. आणि ज्या कमतरता , उणिवा आहेत त्या भरून काढण्यास मदत करा. जे चांगले गुण , चांगल्या गोष्टी त्या अधिक चांगल्या होण्यास मदत करा आणि प्रोत्साहन द्या. तसा विचार आणि कृती त्यांच्यात घडण्याकरीता मदत करा. त्यांना त्यांच्या गुणांसह सन्मानाने जगू द्या.
सर्वगुण संपन्न कोणीच असू शकत नाही. आणि एकच व्यक्ती सगळ्या आघाड्या सांभाळू शकत नाही. तसे झाले तर ती व्यक्ती नक्कीच कुठे ना कुठे कमी पडणार.
उदाहरण : टाटा , बिर्ला , अंबानी यांनी ठरविले सगळी कामे स्वतः करायची , तर मग accounts , finance marketing , manufacturing या सगळ्या आघाड्या त्यांनी एकट्याने सगळे बघायचे तर ते कमी पडणारच. पण म्हणूनच ते या प्रत्येक विभागा करिता अनेक लोक hire करून सगळी कामे सुरळीत काम करून घेतात म्हणून ते प्रगती ही करतात आणि सन्मानाने आयुष्य जगू ही शकतात.
तसेच छोट्या मोठ्या प्रमाणात आपण ही हे करू शकतो. आपल्यात ही या क्षमता असतात . आहेत याची जाणीव होणे गरजेचे असते. आपण ही दुसऱ्यांच्या पेक्षा कमी नाही. आपणही आपल्या क्षमता , गुण वेळीच ओळखले पाहिजेत. एखादी गोष्ट येत नाही तर शिकण्याचा प्रयत्न जरूर करा पण तरी ही त्यात प्रगती नसेल म्हणजे कमी आहात असे नाही तर इतर गोष्टीत श्रेष्ठ आहात. एखादी गोष्ट येत नाही म्हणजे आपण सगळीकडे कमी आहोत ही चुकीची समजूत मनातून काढून टाकली पाहिजे. तुम्ही जे आहटबते सर्वश्रेष्ठ आहात. आपले Best Version बनण्याचा प्रयत्न करा.
जर सर्व लोक सारखेच असते. तर वेगवेगळी व्यक्तिमत्त्व , विविध क्षेत्रे तरी का निर्माण झाली असती ?
तुम्हाला वाटते की दुसऱ्याचे आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुम्ही त्यांचे अनुकरण करू लागता आणि खऱ्या अर्थाने तुमचा सन्मान तुम्हीं कमी करून घेता. कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीचे बाह्य जीवन फक्त बघत असता . प्रत्यक्षात त्यांचे life काय आहे ,त्यांचे स्ट्रगल , त्यांच्या अडचणी काय ? किंवा त्यांची मजबुरी काय हे तुम्हाला माहिती नसते. तो emotionally , financially किती डिस्टर्ब आहे. किती प्रॉब्लेम्स आहेत . कोणत्या परिस्थिती मधून जातो हे तुम्हाला माहिती असते का ? तर नाही !!
मग तुम्ही त्यांच्या सारखे का व्हावे? तुमचा सन्मान तुम्हाला जपणे गरजेचे आहे. त्याकरिता स्वतः ला दुसऱ्यां पेक्षा कमी समजू नका. तुमचे वेगळेपण जपा.
एका जंगलातून एक साधू महाराज जाताना त्यांना झाडावर बसलेला दुःखी असा कावळा दिसला . त्याला विचारले तू का दुःखी आहेस तेव्हा त्याने सांगितले की माझ्या काळया रंगामुळे , माझ्या आवाजा मुळे माझ्या कडे कोणी बघत ही नाही. मला हंस व्हायचे आहे. साधू महाराज म्हणतात की तू हंसाला विचार त्याचा अनुभव आणि मग तरी जर तुला तसे बनायचे तर सांग मी बनवितो.
कावळा हंसाला विचारतो तर हंस म्हणतो माझा हा पांढरा रंग आणि सारखे पाण्यात राहायचे मला कंटाळा येतो मला पोपटासारखा सुंदर हिरवे आणि लाल चोच आणि झाडावर बसायचे , उडायचे आहे. तेव्हा कावळा म्हणतो मला हंस नाही व्हायचे. पोटाकडे जातो त्याला विचारतो . पोपट म्हणतो माझ्या आणि झाडाच्या सारख्याच रंगा मुळे माझ्याकडे कोणाचे लक्ष जात नाही.
मला मोरा सारखे सुंदर व्हायचे म्हणजे सगळे माझ्याकडे बघतील. सगळे मिळून मोराकडे जातात. मोर रडवेल्या आवाजात म्हणतो तुम्ही आवाज ऐकता आहात का ? हे ओरडण्याचा ? मदतीचा ? हा माझ्या सहकाऱ्यांचे ..हे मनुष्य आम्हाला खूप त्रास देतात. आमचे सुंदर पंख , मोरपीस अमानुषपणे काढून घेतात. आम्हाला किती यातना होतात.
मोर म्हणतो मला कावळा व्हायचे आहे. कारण तो झाडावर बसून मस्त आराम करत असतो. कोणी त्याला त्रास ही देत नाही.
हे ऐकल्यावर मात्र कावळा शहाणा होतो. आणि म्हणतो की खरेच मी खूप सुखी आहे. आणि मी कोणापेक्षा ही कमी नाही. मी खूप आनंदी आहे. आणि माझा मी खूप सन्मानाने जगतो. मला आवरजून रोज घासातला घास ठेवणारी , नैवेद्य दाखविणारी ही लोक माझी वाट बघत असतात. त्या शिवाय जेवत ही नाहीत. मला कोणाचे खरेच त्रास नाहीत.
आयुष्य सुंदर आहे. कोणी तरी कुठे तरी श्रेष्ठ आणि कुठे तरी कनिष्ठ असणार आहेत. आपण आपल्या जागी योग्य आहोत. सन्मानाने जगायचं असेल तर स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखू नका.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Nice
सुपर