मनाला लावून न घेणे” ही कला आत्मसात करा!
मयुरी महेंद्र महाजन
मन आपल्या सर्व इंद्रियांमध्ये न दाखवता येणारा पार्ट असला तरीसुद्धा मनाचे महत्त्व अगाध आहे ,आपण कुठे बरोबर, कुठे चुकीचे, आपण किती खरे ,किती खोटे,, एकंदरीत पाहिलं तर मन आपल्या संपूर्ण आयुष्याचा आलेख तंतोतंत सांभाळते, जगण्याच्या धावपळीत सगळीचं लोक आपल्याला आधार देणारी असतील ,असे नाही परंतु आपले मन मात्र कायम आपला आधार असते ,ज्या वेळेस आपण मनाने खचतो ,त्यावेळेस कोणीही आपल्याला आधार देण्याचा फायदा नसतो,
आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असलो, तर अन्य गोष्टी करायची गरज भासत नाही, आपल्या मनाचा आणि ईच्छांचा ताळमेळ जुळायला हवा, आयुष्याच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात, काही टोचून बोलणारी असतात ,काही टोमणे मारणारी असतात, काही पदोपदी आत्मिक अवहेलना करणारी असतात, काही मानसिक स्तरावरती खच्चीकरण करणारी असतात, काही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्या स्वभावाचा फायदा घेणारी असतात, एक ना अनेक प्रकारची पद्धतीची, लोकं ज्यांचा आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येतोचं, आणि आपण आयुष्यात येणाऱ्या या लोकांना आपण टाळू शकत नाही, परंतु आपण त्यासाठी पर्यायी व्यवस्था जरूर करू शकतो.
ती या प्रकारे की कुणीही आपल्याला किती प्रकारे तोडण्याचा प्रयत्न केला, तरी ‘मनाला लावून न देणे’ ही कला जर आपण आत्मसात केली तर आपल्या आयुष्याला आपण आपल्या वळणाने वळवू शकतो, आपल्या आनंदाची जबाबदारी आपलीच असते, आपण कुठेही गेलो तरी आपल्याला कुठेतरी कोणाचे दोन शब्द एकावेचं लागणारं, मग त्यात आपले कुटुंब मित्रपरिवार असो ,ऑफिसला कामाच्या ठिकाणी भेटणारी माणसं असो, बाहेर कुठे कुठली वस्तू घ्यायला गेल्यावर बाहेर घडणाऱ्या काही घटना असो,
प्रत्येक ठिकाणी आपल्याला पटण्यासारखे असेल ,असे नाही प्रत्येकाच्या बाबतीत हा काही बोलला, तो काही म्हणतो, तो असचं कसं बोलला, असे जर आपण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत बसलो, तर आपण तिथेच अडकून राहणारं.
मनाला लागणाऱ्या गोष्टी मनाला लागतातचं, मग ते काही आपण ठरवून लावून घेत नाही, परंतु आपल्या मनाची कार्यक्षमता वाढवायची असेलं, आपल्या कामात जगण्यात जर आपल्याला वृद्धिंगत व्हायचं असेलं, तर आपल्याला मनाला लावून न घेणे ही कला आत्मसात करावी लागेल, यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत, आज ठरवले, आणि आजचं ते आत्मसात करणार, असे होत नाही , ते हळूहळू आत्मसात होत जाणारं,
ही कला आहे, आणि कलेचे एक वैशिष्ट्य असते,कला एकदा अंगवळणी पडली , तर मात्र ती कधीही विसरता येत नाही,मन हे खूप नाजूक असते ,तसेच ते वेळप्रसंगी खूप कणखरही असते, कुणीतरी आपल्यामुळे दुखावू नये यासाठी आपण आपल्याच मनाला कितीतरीदा दुखावलेले असते, याचा अर्थ ते आपल्या मनाला लागलेले असते, बर जेव्हा मनाला लागलेले असते, तेव्हा आपल्या भावना आपल्या हृदयाची धडधड एवढेच काय मनाला खूपच लागलेल्या गोष्टी डोळ्यातून पाणी सुद्धा आणतात, सांगता येत नाही, नेमके झाले काय ??
पण डोळ्यांतील अश्रू सांगून जातात, मनाला लागलेली ठेचं किती मोठी आहे, आपण मनुष्य जन्माला आलो आहोत, आपल्याला भावना आहेत, त्या ज्या त्या वेळेला प्रकटही होतात, परंतु प्रत्येक गोष्ट आपण मनाला लावून घेत असू, तर मात्र ते आपल्या स्वतः साठीच घातक ठरू शकते ,त्यासाठी आपणच आपल्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करूया आणि आपल्या आयुष्याला अजून फुलवूया….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खुप छान…… कुठनकुठे आपल्या सोबत असेच घडत असते.
खुप छान वाटला 👌👌
Useless. No details provided about how exactly to acquire the skill
खूप छान
अगदी वेळेत आणि आवडीच्या विषयावर व गरजेच्या वेळीच हा लेख टाकल्याबद्दल प्रथमतः आभार , आपल्याकडून असेच छान छान विचार आम्हाला वाचण्यासाठी मिळावे हीच एक सदिच्छा 🙏 धन्यवाद
कला आत्मसात कशी करायची ते लिहीलेच नाही
अतिशय सुंदर लेख आहे👍🏻👍🏻👌 माझ्या बाबतीत पण असचं हाेत आहे
Khup chan