Skip to content

डॉमिनेटिंग आणि स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या लोकांसोबत कसं वागायचं ?

डॉमिनेटिंग आणि स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या लोकांसोबत कसं वागायचं ?


काव्या धनंजय गगनग्रास

(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)


विराजच्या वागण्याचा आता सर्वांना त्रास होऊ लागला होता. ऑफिसमध्ये सर्वजण त्याच्या वागण्याला कंटाळले होते. कारणही थोडफार तसच होत. त्याचा स्वभाव तसा होता. सर्वांना dominate करणे, आपल म्हणणं सर्वांवर थोपवण असा काहीसा त्याचा स्वभाव होता. त्याचप्रमाणे,

मी म्हणेन ते खर, माझ्याहून हुशार कोण नाही अशी त्याची वृत्ती होती. त्यामुळे तो इतरांच बोलण सहसा ऐकून घेत नसे. तसच त्याच्या बोलण्याला कोणी विरोध केलेलेही त्याला आवडत नसे. जे काही आहे ते माझ्या मर्जीने झालं पाहिजे, मी सांगतो म्हणजे ते बरोबरच आहे. पण इथे दुसऱ्याच पण काहीतरी मत असू शकत, त्याचही काही म्हणणं असू शकतं हा विचार त्याच्या डोक्यात येत नसे. ऑफिस मध्ये तो वरिष्ठ पदावर होता. त्यामुळे त्याचं पद पण तस आणि एकंदरीत स्वभाव पण तसा बॉसी होता. त्याची एकप्रकारची narcissistic personality होती.

त्याच्या हो ला हो करणारी माणसं त्याला आवडत. त्यांच्याशी त्याच पटे. त्याच्याहून कमी बुद्धिमत्ता असलेल्या किंवा कमी क्षमता असलेल्या व्यक्तींना तो बघून ही घेत नसे. त्याला फक्त आपल्याबरोबरची लोक ठीक वाटत असत. तसच लोकांनी त्याच कौतुक करावं, सतत त्याच्याकडे लक्ष द्यावं अस त्याला वाटे. बाकीच्या लोकांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत, त्याचाही विचार केला पाहिजे अस मात्र त्याला कधी वाटलं नाही. कारण त्याच्या स्वभावाचा तो भागच नव्हता. पण त्याच्या या वर्चस्वी स्वभावाचा इतरांना त्रास होत होता. कोणाला काही बोलताही येत नसे. कारण त्याच पदही तस होत. जे बोलत त्यातून वाद निर्माण होत. त्यामुळे विराज शी नेमक वागावं तरी कसं हा प्रश्न सर्वांना पडला होता.

जिथे लोक येतात तिथे संबंध हे निर्माण होतातच. त्यालाच अंतरवैयक्तीत संबंध असे म्हणतात. जे एक कौशल्य आहे. ज्यामध्ये संवाद म्हणजेच बोलण्याला खूप महत्त्व आहे. हे संवाद करण पण तितकंच महत्त्वाचं कौशल्य आहे. सर्वांना जमत अस नाही. कारण बोलण आणि संवाद यात खूप फरक आहे. या गोष्टींच्या कमतरतेमुळे नात्यामध्ये ताण तणाव तसेच मतभेद वगैरे निर्माण होतात. मग ती नाती औपचारिक असोत किंवा अनौपचारिक. जेव्हा अशी वर्चस्व गाजवणारी, स्वतः ला कोणीतरी मोठी समजणारी लोक आपल्याला भेटत असतात तेव्हा ते आपलं कौशल्य असत की या लोकांसोबत वागायचं कसं. कारण त्या व्यक्तीवर आपला कोणत्याच प्रकारचा कंट्रोल असू शकत नाही. पण आपण कसं वागायचं जेणेकरून समोरची परिस्थिती नोट हॅण्डल करता येऊ शकते हे आपल्या हातात आहे. त्यामुळे अश्या व्यक्ती भेटल्यावर, त्यांचा सामना करायला लागल्यावर आपण कसं वागल पाहिजे हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत.

१. अश्या व्यक्तीच्या गोष्टीला मनाला न लावून घेणे: जी लोक dominating असतात ती दुसऱ्याच्या मताचा फारसा विचार करत नाहीत. ती पटकन काहीतरी बोलून जातात. वेगवेगळ्या पद्धतीने manipulate करतात. ही गोष्ट काहीजणांना सहन होते, काहीजण जे संवेदनशील असतात त्यांना सहन होत नाही. ते लगेच मनाला लावून घेतात. पण अस वाटून घेण्याची काही गरज नाही. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जर आपल्याला पूर्णपणे माहीत असेल तर आपल्याला हे समजू शकत की हा त्याच्या स्वभावाचा एक भाग आहे. सुधारणा व्हायची असेल तर ती त्यांच्या बाजूने त्यांनी केली पाहिजे. आपण फार फार मदत करू शकतो. पण शेवटी ते त्यांच्याच हातात असत. आपण त्यावर कसं react करायचं हे ठरवू शकतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आपण आपल्यावर किती फरक पाडून घ्यायचा, स्वतःचा मुड कसा ठेवायचा हे आपल्या हातात आहे.

२. जेव्हढयास तेव्हढ बोला: काही जणांचा स्वभाव असा असतो की ते लगेच समोरच्याशी भावनिक होऊन जातात, गुंतून जातात, दुसऱ्याची जबाबदारी पण स्वतःवर घेतात. या अर्थाने की समोरच्याला सर्व सांगणं, समजावणं ही माझी जबाबदारी आहे. अस जेव्हा होत आणि समोरचा त्याच्या उलट काहीतरी वागतो तेव्हा त्रास आपल्याला होतो. दुसऱ्याच्या प्रती आस्था असणे, empathy असणे वाईट गोष्ट नाही. ती सर्वांसोबत असली पाहिजे. पण त्याची मर्यादा असते. समोरची व्यक्ती तशी असावी लागते. वाघ अडचणीत आहे म्हणून लगेच सोडवायला गेलात तर तो आपल्याला मारू पण शकतो. कारण तो त्याच्या स्थायीभाव आहे. त्यामुळे आपण कोणासमोर कसं वागावं हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण त्यांचा राग करावा, द्वेष करावा अस नाही. पण जास्त भावनिक पण होऊ नये. त्याचा त्रास आपल्याला होतो. म्हणून अश्या व्यक्तीशी जेवढ्यास तेव्हढ बोलण, वागणं जास्त गुंतून न पडणं कधीही योग्य ठरतं.

३. Assertive व्हा: स्वतः ला सर्वश्रेष्ठ समजणारी लोक आपले निर्णय आपल वागणं दुसऱ्यावर लादतात, दुसऱ्याच्या मताचा फार विचार त्यात नसतो. म्हणून इथे आपण assertive होणं गरजेचं आहे. आपल म्हणणं आपल्या स्पष्टपणे मांडता आला पाहिजे. आता स्पष्ट बोलण म्हणजे आक्रमक होण किंवा भांडण असा होत नाही. तर आपल जे काही म्हणणं आहे ते समोरच्या व्यक्तीला न रागावता नीट शब्दात सांगणे, त्याचबरोबर त्याचही मत जाणून घेऊन एका समान अश्या मतावर दोघांनी येणे.

एरवी होत अस की ती व्यक्ती काहीतरी थोपावते, आपल्याला नाही पटलं की आपण विरोध करतो. मतभेद होतात ते याने.

याउलट त्याच्या मताचा आदर करत माझ पण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून काहितरी म्हणणं आहे मत आहे अस बोलण केल तर ते नीट होऊ शकते. Dominating व्यक्तींना त्याच्या उलट बोललेल आवडत नाही. त्यामुळे जरी तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणायला मदत करायची असेल तर त्यांना कोणत्याही गोष्टीत थेट विरोध न करता अस बोलण केला तर शक्यता जास्त असते की ते तुमचं बोलण पण ऐकतील.

अश्याप्रकारे आपल्या बाजूने आपण काही प्रयत्न केले तर आपण अश्या व्यक्तीसोबत नीट राहू शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

12 thoughts on “डॉमिनेटिंग आणि स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या लोकांसोबत कसं वागायचं ?”

  1. अशा व्यक्ती खुप मुर्ख असतात

  2. छान…मी हाच उपाय करत आले आहे…

  3. अशा व्यक्तींपासून चार हात दूर राहणे हाच उपाय आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार.

  4. यात विरामचिन्हे वापरली नाहीयेत. त्यामुळे वाचायला खूप त्रास होतो. आणि डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा इतका मोठा लेख आणि त्यात महत्वाचे मुद्दे अगदी 20 शब्दात सांगण्यासारखे आहेत.

  5. भाग्यश्री गोखले

    खूप उपयुक्त आहे मला मदत झाली धन्यवाद अशी व्यक्ती आहे नात्यात

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!