Skip to content

डोक्यात गेलेल्या लोकांचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर हा लेख पूर्ण वाचा.

डोक्यात गेलेल्या लोकांचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर हा लेख पूर्ण वाचा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“तु का इतकी चिडचिड करतो आहेस? शांत हो जरा आणि कॉफी पी.” सुयश जयला म्हणाला.” अरे कसा शांत होऊ. एकतर ही लोक माझ्या घरी येणार वर मलाच अश्याप्रकारे प्रश्न विचारणार जसं काही मी यांना बांधील आहे. मी का देऊ यांच्या प्रश्नांची उत्तरं? आणि कधीतरी ठीक आहे रे? सारखं काय असत आमच्या घरी? त्यात त्यांचा तो मुलगा, गौरव, आल्याबरोबर याला घरातल्या सर्व वस्तू पहायच्या असतात. त्यांच्या किमती, त्या कुठून आणल्या, कश्या आणल्या, मग त्याचा खर्च कसा मॅनेज केला.

इतकी उत्सुकता तर लहान मुलाला पण नसते रे! बर यांना काही पटकन बोलायच पण नाही. आमच्या मातोश्रीना राग येतो. आपल्या माणसांना अस बोलू नये हे ऐकून घ्यावं लागतं. पण ती कशी वागतात हे तिला दिसत नाही. मी काही बोललो तरी आईला रुचत नाही. मग काय बसा मुग गिळून. पण खर सांगू डोक्यात जातात ही लोक माझ्या. तर होतोय. आता मला याचा.”

सुयश रागाने बोलत होता. त्याला आता हे सर्व असह्य झालं होत. गोष्ट अशी होती की त्यांचे काही पाहुणे हल्लीच त्यांच्याच शहरात राहायला आले होते. सुरुवातीला लांब म्हणून कधी फार भेटणं व्हायचं नाही. आता एकाच शहरात आहोत म्हणून ते सारखे वरचेवर भेटायला यायचे. आले तरी चार शब्द बोलतील, थोडावेळ बसुन जातील अस ते करत नसत. आले की दोन तीन दिवस राहणार, मग त्यांची सर्व उठबस सुयशच्या आईलाच करावी लागे. ती काही बोलून दाखवते नसे. पण तिचा थकवा सुयशला जाणवायचा.

इतकचं वाटायचं की जी लोकं आली आहेत त्यांना याची जाणीव तरी व्हावी की आपल्यामुळे समोरच्या माणसाला त्रास पडत आहेत आपण काहीतरी मदत केली पाहिजे. पण काही त्यांच्या लक्षात येत नसे. हे झालं आईच्या बाबत. पण तो जेव्हा कामावरून थकून घरी जायचा तेव्हा या सर्वांची वेगवेगळ्या गोष्टींवरून प्रश्नांची सरबत्ती सुरू व्हायची. ह्यातला हल्लीचा नवीन विषय होता सुयशच लग्न.

त्याला लग्न करायचं नव्हत अस नाही. पण त्याच्या डोक्यात या बद्दल काही प्लॅन्स होते. त्याने याबद्दल काही विचार केला होता. जो त्याला इतक्यात कोणाला सांगायचा नव्हता. पण हे त्या लोकांच्या लक्षात येत नव्हत. ते सारखं त्याला एकच प्रश्न विचारून भंडावून सोडत. एक दिवस या सगळ्याला वैतागून सुयश घरी गेलाच नाही. आज देखील तो रागाने कॅन्टीन मध्ये येऊन बसला होता. म्हणूनच जय त्याचा मित्र त्याच्यासाठी कॉफी घेऊन आला. अश्या गोष्टी, असे प्रसंग आणि अशी माणसं आपल्याही आयुष्यात आपल्याला कुठे ना कुठे भेटत असतात. मग ती पाहुणेच असतील अस नाही. कोणीही असू शकत. त्यांचा स्वभाव, वागणं अस असत की आपल्याला त्यांचा सहवास नकोसा वाटतो, आपली चिडचिड होते, बरेचदा आपला स्वतःवरचा ताबा सुटतो. आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्यालाच जास्त त्रास होतो. त्या लोकांना हे समजत पण नाही. म्हणून जर अश्या लोकांचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर काही गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत.

पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःवर ताबा ठेवता आला पाहिजे. समोरचा कसही वागला तरी आपल्याला त्याच्या हातात असा कोणताच रिमोट द्यायचा नाहीये ज्याने त्यांना हवी तशी प्रतिक्रिया ते काढू शकतील. थोडक्यात दुसऱ्या कोणामुळे आपली मनस्थितीत बिघडेल इतकं आपण स्वतः ला कमकुवत बनवायचं नाही. आता वाचून वाटेल की अस शक्य आहे का? कोण कसही वागेल आणि आपण काहीच करायचं नाही. याने काय होणार? तर स्वतःवर ताबा ठेवणे म्हणजे हातावर हात ठेवून शांत बसणे अस नाही. तर त्या गोष्टीचा इतका परिणाम न करून घेणे ज्याने आपल्या बाकीच्या कामांवर, स्वास्थ्यावर परिणाम होईल.

Marcus aurelius च एक छान संवाद आहे. एक माणूस त्यात म्हणतोय,

“People are so obnoxious and annoying, i hate everyone.”

यावर aurelius म्हणतात,

“Why should you be angry at the world? As if the world would notice.”

म्हणजेच काय तर लोक कशीही असली तरी तुला का रागवयला पाहिजे? जसं काही लोक तुझा राग पाहणारच आहेत. असच होत. आपण इतका त्रास करून घेतो, रागावतो पण समोरच्या व्यक्तीला ते समजत देखील नाही. म्हणून आपण स्वतः स्वतः वर ताबा मिळवला पाहिजे. आणि हे लगेच शक्य होत नाही. याला वेळ लागतो. मनाप्रमाणे शारीरिक आरोग्य पण सांभाळावं लागतं. अनेकदा रागात आपल्या श्वासावर ताबा राहत नाही. यासाठी अस काही झालं तर दीर्घ श्वास घेऊन स्वतः ला शांत करणे गरजेचं आहे. आता बरेचदा अस होत की समोरची व्यक्ती जे वागते तेच आपल्याला दिसत आणि त्यावर आपण लगेच रिॲक्ट होतो. इथे अस न करता ती व्यक्ती अस का वागते हे समजून घेण्याचा प्रयत्न करा, तिचा स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी त्या माणसाशी बोलण गरजेचं असत. समजून घेणं गरजेचं असत.

बोलण ही देखील एक कला आहे, एक कौशल्य आहे. आपल्याला जर योग्य पद्धतीने बोलता येत असेल तर आपण परिस्थिती पण नीट हाताळू शकतो. अश्या प्रसंगात आपण एकतर गप्प बसतो किंवा मग चिडतो. अस न करता आपल्याला ठामपणे बोलता आलं पाहिजे. म्हणजेच assertively बोलता आलं पाहिजे. Assertive बोलण म्हणजे भांडण करण किंवा स्वतःचा मुद्दा कसा खरा आहे, योग्य आहे हे पटवून देणं नाही. तर समोरच्या माणसाला समजून घेऊन आपल्याला हे काही वाटत आहे मग तो त्रास का असेना योग्य शब्दात सांगण ज्यानं तो माणूस पण दुखावला जाणार नाही. रागात हे शक्य होत नाही.

अश्या पद्धतीने स्वतः वर ताबा ठेवून, त्या माणसाला समजून घेऊन बोलून आपण आपला त्रास कमी करू शकतो. याचबरोबर अश्या लोकांसोबत ठराविक अंतर ठेवून राहणं, वाद होण टाळणे, शक्यतो लांब राहणे अस केल्याने देखील आपण आपला त्रास कमी करू शकतो. पण हे. सर्व करून देखील ती व्यक्ती बदलत नसेल तर आपल्याला त्रास करून घ्यायच कारण नाही. कारण आपण कोणालाही कंट्रोल करू शकत नाही आपण फक्त प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने योग्य मार्गाने प्रयत्न करत राहायचं ज्याने आपण समाधानी आयुष्य जगू शकतो. ते आपल्या हातात आहे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!