Skip to content

दिवस-रात्र रडून काढणाऱ्या लोकांना एका ठराविक काळानंतर रडूही येत नाही.

दिवस-रात्र रडून काढणाऱ्या लोकांना एका ठराविक काळानंतर रडूही येत नाही.


मयुरी महाजन


आपल्या आयुष्याची ,जन्माची सुरुवातच राहण्यापासून झालेली आहे, हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहेच, याचा अर्थ रडण्याशी आपल्या सर्वांचा खूप जवळचा संबंध आहे, कधीतरी कोणी काही बोलले व ते मनाला लागले की टचकन डोळ्यात पाणी येतं, कारण मन दुखावलेलं असतं, कितीही आपण काही गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न केला, तरी एखाद्या वेळेस घटना किंवा प्रसंगचं असा उद्भवतो की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही, आपल्या विषयाला समजून घेण्यासाठी आपण बघुया एक सत्यघटना,ज्यात नावांमध्ये बदल केलेला आहे,

मृणाल – सुंदर, सुशील, देखणी आणि सोज्‍वळ कोणीही तिला बघितले तर तिच्या प्रेमात पडेल, असं सौंदर्य, आणि त्यासोबत संस्कारी, विनयशील, अत्यंत बोलका स्वभाव, लग्नाच्या वयाची झाल्यानंतर तिचे लग्न लावून दिले जाते,

जशी मृणाल तसाच तिला साजेसा व शोभून दिसणारा तो मुलगा कॉलेजला मुला-मुलींना शिक्षणाचे धडे द्यायचा, त्यासोबतच दोघांचेही
एकमेकांवर जीवापाड प्रेम एकमेकांशिवाय दोघेही अपूर्णच, प्रेम असे होते की, कोणालाही त्यांच्या प्रेमाचा हेवा वाटायचा, अगदी एकमेकांना साजेल, असा त्यांचा स्वभाव होता, त्यांच्या संसाराला अजून पालवी फुटते, त्यांच्या घरात छोट्या बाळकृष्णाचे आगमन होते, दोघेही एकमेकांची काळजी घेतात, व एकमेकांना जाणतात, प्रत्येक परिस्थितीत एकमेकांचा आधार होतात, जबाबदारीच्या बाबतीत दोघेही कुठेही कमी पडत नाही,

संसारात गोड झालेले त्यांचे क्षण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात ,हा संसार पुढे सुरू असतो, मुलगा मोठा होऊ लागतो, आणि सर्वकाही सुरळीत पणे चालू असते ,या दोघांच्या नात्यातील विशेष बाब म्हणजे ते दोघे इतकी म्हणजेच चाळीस-पंचेचाळीस च्या वयापर्यंत पोहोचूनही त्यांचं प्रेम मात्र नित्य नवीनच वाटत राहते, त्यांच्याकडे बघून कधी त्यांच्या वयाचा प्रेमाचा अंदाज लावता येत नाही, फक्त सोबत राहणे प्रेम नाही, तर एकमेकांसाठी असणे हे देखील प्रेम आहे, हे त्यांना बघून कळते,

त्यांच्या मुलालाही त्यांनी चांगले संस्कार दिले, आणि प्रोफेसर असणारी व्यक्ती ही कवी व लेखक होती, त्यांच्या कवितांच्या रूपाने त्यांनी प्रत्येक गोष्टीला अगदी आपल्या शब्दांनी जिवंत गेलेले आम्ही बघितले आहे, ते आमचे गुरुवर्य, ज्यांच्यामुळे खरच अनेकांना लेखणी काय असते, हे कळले, त्यांचा हात असा अचानक सुटून जाईल, असे कधी वाटले नव्हते, काही कारणास्तव त्यांचे निधन झाले, व त्यांच्या पत्नी मृणाल यांच्या पायाखालची जमीन सरकली, एक कवी मनाचा माणूस सर्वांमधून हरवला याचे दुःख प्रत्येकाला होतेच, परंतु त्यांच्या पत्नी यांना दुःख अनावर झाले ,व त्या दिवस-रात्र त्यांच्या ध्यासात राहू लागल्या, ते गेल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू पाहिले नाही, त्यांनी कितीतरी दिवस व रात्र अशाच रडून काढलेल्या आहेत,

त्यांना तर कधी कधी ते परत आल्याचा भासही व्हायचा, ते रडून आपले दुःख मोकळं करत असल्या तरी त्यांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीची आठवण येत असावी, त्यांना जाऊन किती तरी वर्ष उलटली परंतु अजूनही त्या दरवाजाच्या बाजूला बसून त्याच्या येण्याची वाट बघत बसलेल्या दिसतात ,

त्यांनी दिवस रात्री रडून काढल्या आहेत, हे खर आहे, परंतु आता मात्र त्यांना तो ठराविक काळ गेल्यानंतर त्यांना आता रडूही येत नाही ,कारण त्यांना त्यांच्या दुःखा पुढे वास्तव दिसून येत नव्हते, परंतु आता त्यांनी ते वास्तव स्वीकारले आहे,

छोट्या छोट्या गोष्टींवरून जर आपल्या डोळ्यात पाणी येत असेल, तर आपण खूप हळव्या मनाचे आहोत ,परंतु मनाला लागलेली एखादी गोष्ट जर डोळ्यातून सतत पाणी आणत असेल, तर ते काही ठराविक काळानंतर येणं बंद होतं, कारण रडून-रडून व्यक्ती आतल्या आत इतकी मजबूत होऊन जाते, की त्या मजबुतीवरती व्यक्ती असंख्य घाव सोसण्याचे बळ निर्माण करते, ज्यामुळे दिवस-रात्र रडून काढणाऱ्या लोकांना एका ठराविक काळानंतर रडू येत नाही…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!