Skip to content

ढगाळ वातावरणातुन मनात येणारी नकारात्मकता अशी दूर करा.

ढगाळ वातावरणातुन मनात येणारी नकारात्मकता अशी दूर करा.


काव्या धनंजय गगनग्रास

(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)


ताराला खूप उदास आणि एकट वाटत होत. तिला कुठे बाहेर जायची इच्छा होत नव्हती. थकवा आल्यासारखा झालेलं. कश्यामध्ये धड लक्ष लागत नव्हत. तिला सारखं अस व्हायचं अस नाही. एरवी ती नॉर्मल असायची. पण जसा ऋतु बदल व्हायचा, लख्ख उनातून जेव्हा थंडी, पावसाचा ऋतु सुरू व्हायचा, त्यातून बाहेर जे एकप्रकारे अंधारल वातावरण, ढगाळ वातावरण निर्माण व्हायचं त्यावेळी तिच्यामध्ये असे बदल व्हायचे. एकप्रकारच नैराश्य, नकारात्मकता मनात निर्माण व्हायची. ज्याचा तिच्या वागण्यावर, झोपवर, भुकेवर परिणाम व्ह्यायचा.

ती कोणामध्ये मिक्स व्हायची नाही. खाण्यापिण्याच चक्र बदललं होत.

ताराच्या बाबतीत जे होत होत ते अनेकांना होत. अनेकांच्या मनात ढगाळ वातावरणात नैराश्य निर्माण होत. हा एक प्रकारचा मुड डिसऑर्डर आहे. ज्याला seasonal affective disorder किंवा seasonal depression असे म्हटले जाते. यामध्ये जेव्हा ऋतु बदलामुळे वातावरण वेगवेगळे बदल होतात त्यावेळी व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडतो. कारण या वातावरणामुळे मेंदूमधील जे हॉर्मोन्स आहेत त्यात बदल होत असतो. ते कमी जास्त होतात. ढगाळ वातावरणात सूर्यप्रकाश कमी होत असतो. याचा परिणाम आपल्या मेंदूमधील सेरोटोनिन या हार्मोनवर होत.

सेरोटोनिन हे हार्मोन आपल्या मनस्थिती शी म्हणजेच आपल्या मुड शी निगडित हार्मोन आहे. जेव्हा हे या वातावरणामुळे कमी स्त्रवत तेव्हा साहजिक त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. आणि त्यातून आपल्याला उदास वाटण, निराश वाटण अश्या गोष्टी होतात. सेरोटोनिन प्रमाणे मेलाटोनिन हे नैसर्गिक हार्मोन जे आपल्या शरीरात स्त्रावत असते त्याचाही परिणाम होतो. ज्यातून थकवा निर्माण होतो.

यावर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार आहेत. ज्यामध्ये लाईट थेरपी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. कारण अपुऱ्या सूर्य प्रकाशाने शरीरात बदल होत असतात. यामध्ये व्यक्तीला प्रखर प्रकाशापासून थोड्या अंतरावर बसवले जाते. हा प्रकाश खूप तीव्र असल्याने तो थेट व्यकीवर टाकला जात नाही. दिवसाला १०-१ ५मि. अस व्यक्तीला त्या प्रकाशात बसवले जाते व त्याच्या प्रतिसादनुसार ही वेळ वाढवली जाते.

याचबरोबर व्यक्तीला औषध देखील दिली जातात. तसच बोधनिक उपचार पद्धती देखील यावर फायदेशीर आहे अस दिसून आल आहे. ज्यातून व्यक्तीचा जो एक या वातावरणाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला असतो तो talk therapy मधून बदलायचा प्रयत्न केला जातो. यासाठी विविध ॲक्टिविटी करायला सांगितल्या जातात.

याच बरोबर आपल्याला स्वतःहून काही प्रयत्न करावे लागतात. ते कोणते? तर जरी बाहेर ढगाळ वातावरण असल तरी आपण बाहेर जायचा प्रयत्न केला पाहिजे. जो काही थोडाफार सूर्यप्रकाश असतो त्याने आपल्याला मदत होऊ शकते. डॉक्टर देखील सरळ लाईट थेरपी न वापरता हाचा सल्ला देतात की पहाटेच्या उन्हात जायच. जिथे हे अजिबातच शक्य नसते त्यांना लाईट थेरपी वापरली जाते.

तसच यामध्ये व्यक्ती स्वतःला एकट पाडून घेते. लोकांपासून दूर राहते. अस न करता बाहेर जाऊन लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या ग्रुप ॲक्टिविटी मध्ये सहभाग घ्यावा. यातून मुड ठीक व्हायला मदत होते. मनातले नकारात्मक विचार कमी होतात. संतुलित आहार घ्या. ज्यातून शरीराला एनर्जी मिळते.

तसेच रोज किमान ३०मी. चालयाला जा. आपण जितकं निसर्गात राहतो तितकं आपल्याला फायद्याचं ठरतं.

अश्या प्रकारे योग्य ते उपचार आणि स्वतःहून केलेलं काही प्रयत्न आणि काळजी आपला त्रास कमी करू शकते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “ढगाळ वातावरणातुन मनात येणारी नकारात्मकता अशी दूर करा.”

  1. मस्त लेख वाचून माझ्या मानतील शंखा दूर झाली माला सुद्धा असच होत निराश मन

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!