Skip to content

निवड चुकल्यानंतरही त्यात आपली आवड शोधणं, म्हणजेच तडजोड!!

निवड चुकल्यानंतरही त्यात आपली आवड शोधणं, म्हणजेच तडजोड!!


सोनाली जे


” आवड आणि निवड याची सांगड घालता आली की जीवन आनंदात जगता येते. ”

प्रत्येक वेळेस आपल्याला आवडेल तेच निवडता आले असते तर आजकालची स्पर्धा , निती , नियम , कायदे , रीती , समाज याची काही बंधने राहिली नसती ना ? जे निवडले ते आवडून घेण्याची ही तडजोड कधी कधी करावी लागते.

नवरा बायको लग्नानंतर निवड चुकली लक्षात आले तर बदलता येते का ? हा नको त्या दुसऱ्या समवेत किंवा दुसरी समवेत राहता येईल का ? अशी मनमानी करता येईल का ? नाही ना ? कुठे तरी तडजोड करणे गरजेचे असते. सर्वगुण संपन्न कोणी नसते. काही उणे तर काही जास्ती हे जुळवून घ्यावे लागते. अर्थात येते कायद्याने घटस्फोट हा . पण त्याला ही खूप procedure आहेत. पूर्वी एकच पार्टनर त्या सोबतच जुळवून घ्यायचे असेच होते. म्हणून घटस्फोट प्रमाण कमी होते.

बघा हुं , कार्तिक ला रिया खूप आवडली . त्याने मनोमन तिला आपली पार्टनर म्हणून तिची निवड ही केली. रिया ही अतिशय सुंदर , लाघवी मुलगी , स्वभाव ही मनमोकळा , सगळ्यांच्या मध्ये मिक्स होणारी , कार्तिक आणि ती दोघेही प्रेमात पडले. स्वभाव पण जुळत होते. आवडी निवडी . रिया पण MBA करून नोकरी मध्ये रुजू झाली होती.

दोघेही नोकरी करत होते त्यामुळे एका जातीचे नसून ही दोघांनी लग्न करणार आहोत असा निर्णय घरी दिला. दोघांच्या ही घरचे म्हणत होते की जाती मध्ये फरक आहे , संस्कार , रीती रीवज , खानपान यात ही फरक राहणार पण ते दोघांस त्यावेळी पटले नाही.

लग्न झाले .सुरुवातीला सगळे गोडी मध्ये होते. नवीन असताना . कार्तिक हा गुजराती ब्राह्मण कुटुंबातला , शुद्ध शाकाहारी , घरी सगळे खूप धार्मिक , पूजा अर्चा , शुध्दता , स्वच्छ्ता ही . सकाळी घरी सगळ्या स्त्रिया लवकर उठून अंघोळ करून , breakfast , स्वैपाक करणाऱ्या .

तर रिया जॉब करणारी , ती आरामात उठणारी , तिला स्वैपाक करण्याची सवय तर नाहीच. पण उशिरा उठत असल्यामुळे अंघोळ ही न करता breakfast करण्यास येत असे. सुरुवातीला समजून घेत होते तिला पण आता कार्तिक ही चिडू लागला. लवकर उठून घरात मदत करण्यास सांगू लागला. रिया म्हणायची मी दमते दिवसभर ऑफिस , सवय नाही मला कामाची , तसे मग ते वाद होवू लागले.

त्यात रिया ची cast वेगळी . तिला nonveg , eggs खाण्याची सवय .घरात तर सगळे शाकाहारी मग ती आठवड्यात बरेचवेळा बाहेर जेवून येत असे. कार्तिक कडे तशी सवय नव्हती कोणाला. घरच्यांनी समजावलं , कार्तिक ने तरी ही तिला काही फरक पडत नव्हता. घरच्यांचा आदर वगैरे तर दूरच. मी स्वतंत्र आहे. मी कमावती आहे.मला जे आवडते ते करणार. हळूहळू कार्तिक ला जाणवू लागले की त्याची निवड चुकली आहे.

पण निवड चुकल्यानंतरही त्यात आपली आवड शोधणं,हे महत्वाचं होत. म्हणून कार्तिक ने निर्णय घेतला थोडे दिवस रिया सोबत तिच्या माहेरी राहण्याचा. रियाच्या माहेरी मात्र कार्तिक चे खूप आदरातिथ्य होते. त्याच्या करिता सगळ्यांनाच घरी शाकाहारी जेवण , खाणे होत होते. रिया ला ही घरचे सकाळी लवकर उठवत होते. जावई लवकर उठतात त्यांना चहा पाणी लवकर देत जा. घरच्यांवर चिडून का होईना रिया लवकर उठून करू लागली . तेव्हा तिला ही समजले की ती या गोष्टी करू शकते. घरात आई वडील तिला जबाबदारी ची जाणीव व्हावी याकरिता घरातून काही काम काढून बाहेर जात . हळूहळू ती थोडे फार स्वैपाक आणि इतर कामे करू लागली .

कार्तिक आणि रिया ला ही एकत्र वेळ मिळत होता रिया तशी हुशार होती . ऑफिस मध्ये ही तीचे काम परफेक्ट . आता घरात कार्तिक ही तिला थोडी मदत करत होता .तिच्या मधल्या उणिवा दूर करण्याचे सगळे प्रयत्न करत होतें . निवड चुकल्यानंतरही त्यात आपली आवड शोधणं, म्हणजेच तडजोड!!सगळेच अर्थात तडजोड करत होतें .

बरेचवेळा अनेक गोष्टी मध्ये असे होते ..आपली निवड चुकते. अभ्यासक्रम असेल , नोकरी असेल तर कधी मैत्री असेल तर जोडीदार असेल , तर काही वेळेस आनंद मिळविण्याकरिता एखाद्या ठिकाणी जाण्याचे ते ठिकाण निवड .चुकते . काही वेळा. पण म्हणून काय आहे तो आनंद गमावून सतत दुःख करत बसायचे ? का चिडचिड करत बसायची ?

माझी एक मैत्रीण आणि तिचा नवरा थंड हवेच्या ठिकाणी गेले होते. मार्च ची सुरुवात. त्यांना टेन्ट मध्ये राहायचे होतें तो अनुभव घ्यायचा होता. तस म्हणले तर नवीन नवीन लग्न , मग बाहेर भटकंती असे विषय. दोघेही हौशी.

अकरा वाजता त्यांना check in करायचं होते पोहचले. तर तिथला निसर्ग बघून दोघेही खुश . बरं कोणीच दिसत नव्हते तिथे राहायला. बहुदा परीक्षा असतील म्हणून नसतील कोणी असे विचार केलें .

बुकिंग manager ला भेटले . तर तो म्हणाला हो तुमचे बुकिंग आहे पण सध्या AC बंद आहेत सगळ्या टेन्ट चे . Fan आहेत. आधी बुकिंग करून सगळे खात्री करून एवढ्या लांब आले होते दोघे आता कोणता पर्याय ही नव्हता . टेन्ट ची निवड दोघांची होती. सामान ठेवले फ्रेश झाले. तशी सकाळची वेळ होती त्यामुळे प्रसन्न वातावरण होतें . दुपार होवू लागली तसे आत fan लावून बसणे ही असह्य झाले. मग बाहेर येवून बसले. तिकडे त्यांनी मस्त arrangement केल्या होत्या तशा. खुर्ची . उन्हापासून वर असे छान छप्पर असलेले पण मोकळी हवा येईल अशी मस्त arrangement. कोणाला तिकडे मस्त झोपण्याकरिता ही तशी सोय. हे दोघे बाहेर आले तर ऊन होते पण वारा ही मस्त . आत टेन्ट मध्ये गरम हवा त्यापेक्षा इथे मोकळ्या हवेत थांबण्याचा निर्णय घेतला.

मॅनेजर म्हणाला रात्री खूप थंडी आणि वारे असेल .. तेव्हा काही त्रास होणार नाही तुम्हाला आता एक दोन तास थोडे सहन. करावे लागेल.

टेन्ट ची निवड चुकली नव्हती पण असुविधा एवढीच झाली होती की AC बंद होते. पण मझ्या मैत्रीण आणि तिच्या नवऱ्याने उलट ते मोठाले डोंगर , आजूबाजूचा निसर्ग ,उन सावली यांचा खेळ, वाऱ्याची मंद झुळूक , मस्त बाहेर बसून त्या हवेत थंड पेये यांचा आस्वाद घेतला . साडे चार पाच वाजता एकदम हवेत गारवा जाणवू लागला , वारे वाहू लागले . दिवसभरात त्यांना काही त्रास झाला हे ही ते विसरले. रात्री तर निसर्गाचे अप्रतिम दर्शन आणि वातावरण ही सुखद . रोजच्या धावपळीतून शांत ठिकाण .. pollution नाही कोणतेच. आवाज नाही . वर्दळ नाही. केवळ निसर्ग ..

निवड चुकल्यानंतरही त्यात चिडचिड न करता , आपण आनंद , शांतता मिळविण्यासाठी आलो आहोत हे लक्षात घेवून , आपला दुपारचा काही वेळ मस्त निसर्गाच्या सानिध्यात घालवला. एकमेकांचा सहवास ही . त्यात ही आपली आवड शोधणं, हे म्हणजेच तडजोड!!

बरेचवेळा आपल्याला थोडेसे मार्क्स कमी असतात आपली आवडती साइड किंवा क्षेत्र निवडण्याकरिता आपल्याला आवडती क्षेत्रे सोडून सगळीकडे admission मिळत असते पण आपण तेव्हा जी योग्य वाटते ती साइड , क्षेत्र निवडतो. पण मग लक्षात येतं की यापेक्षा ती साइड , ते क्षेत्र आपण निवडायला पाहिजे होते त्यात आपल्याला गती होती , माहिती होती. आवड होती. आता यात मला सगळे नवीन , कसे करणार मी अभ्यास वगैरे negative विचार मनात येतात. पण त्याक्षणी ते विचार झटकून निवड चुकल्या नंतर ही त्यात आपली आवड शोधणं गरजेचे असते. तडजोड करणे गरजेचे असते. त्या विषयाची गोडी निर्माण होण्याकरिता प्रयत्न करणे जरुरी असते. समजून घेणे महत्वाचे असते. या करिता सकारात्मकता असेल , मनाची तयारी असेल की बरं ते नाही तर हे क्षेत्र का त्यात काय करूयात असे म्हणून पुढे गेलात तर निवड चुकल्यानंतरही त्यात आपली आवड शोधणं ही तडजोड ही worth ठरते.

शेजारी काका राहतात . मिलिटरी मधून कर्नल म्हणून रिटायर्ड झाले. त्यांच्या बरोबर बोलताना कायम सकारात्मकता मिळते. कोणती ही excuses त्यांना चालत नाही. वेळ म्हणजे त्या वेळेला हजर पाहिजे. ते आता क्लासेस घेतात . इंग्लिश , maths , science . वेळेत म्हणजे वेळेत पोहचायचे. दिलेला अभ्यास पूर्ण करायचा म्हणजे करायचा. झाला नाही .जमले नाही . बाहेर गेलो ही कारण चालतच नाहीत. ते स्पष्ट म्हणतात तुम्हाला ते करण्याची आवड आणि इच्छा नाही म्हणून जमले नाही असे सांगा.

त्यांच्या सोबत थोडे मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली तेव्हा ते म्हणले त्यांना मेडिकल ला जायचे होते. पण मार्क थोडे कमी पडले त्यामुळे जाता आले नाही. पण जी निवड केली ती चुकली तरी अतिशय कठोर परिश्रम केले , त्यात आपल्याला प्रावीण्य मिळेल याकरिता धडपड केली. आणि प्रचंड जिद्द ठेवून पुढे गेले की आपल्याला याच क्षेत्रात करायचे आहे. हेच आवडून घेवून पुढे जायचे आहे. ही तडजोड करून ते पुढे यशस्वी झाले.

आयुष्य सुंदर आहे. निवड चुकल्यानंतरही त्यात आपली आवड शोधणं, म्हणजेच तडजोड!! कुठेही हार मानून थांबून चालत नाही. सकारात्मक , उत्साही , जिद्दी राहून पुढे जावे लागते . आवड नसेल तरी निवड केली म्हणजे चूक असेल तरी त्या करिता सातत्य , प्रयत्न करणे जरुरी तर ती तडजोड ही सकारात्मक ठरते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “निवड चुकल्यानंतरही त्यात आपली आवड शोधणं, म्हणजेच तडजोड!!”

  1. Khup sundar marriage after understanding important aahe… 😘😍🤩😑

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!