Skip to content

दररोज अशी एक गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

दररोज अशी एक गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.


गीतांजली जगदाळे

(समुपदेशक)


बालपणापासून ते मरेपर्यंत प्रत्येक माणूस कशा ना कशाला तरी घाबरत असतो , भीत असतो. लहान असताना कदाचित अंधाराची भीती वाटू शकते आणि मोठे झाल्यावर ती जाऊन अजून कशाची तरी वाटू शकते. काही भीती या वयानूरूप बदलतात , तर काही भीती अशा असतात की लहानपण ते वृद्धा अवस्थेपर्यंत देखील आपली पाठ सोडत नाहीत.

पण जेव्हा आपण आपल्याला वाटत असणाऱ्या भीतीच्या डोळ्यांत डोळे घालून पाहतो आणि त्या भीतीला सामोरे जातो त्या दिवशी आपण त्या भीतीवर मात करतो. आणि बक्षीस म्हणून आपल्यात धैर्य , आत्मविश्वास , आणि आंतरिक क्षमता वाढलेली असते.

खरंतर , ती भीतीची phase सहन करणंदेखील सोप्प नसतं . दरवेळेस ती एक गोष्ट समोर आल्यावर किंवा संपर्कात आल्यावर भीतीने आपली गाळण उडत असते. याचा ही आपल्याला त्रासच होत असतो. आणि त्यामुळेच हे सहन करणं तरी कुठे सोप्प आहे? म्हणूनच भीती समोर असली की असा विचार करून पाहावा की समजा भीती जे सांगते त्याच्या विरुद्धच केलं तर? किंवा जाऊन बघितलं सामोरे तर? असा विचार करायचा आणि फेस करायचं तिला. करण्यापेक्षा बोलणं नक्कीच सोप्प असतं . पण जर हे आपण केलं ना तर जी गोष्ट आपल्याला आजपर्यंत घाबरवत आली तिच्यासमोर निधड्या छातीने ऐटीत उभे राहू एवढं आत्मबल आपल्यात येईल.

माणूस म्हणून आपली प्रगती किंवा विकास तेव्हाच होत असतो जेव्हा आपण आपल्या comfort zone मधून बाहेर पडतो. आणि ज्याची भीती वाटते ती गोष्ट न करणे , हेच आपला comfort zone आपल्याला सुचवत असतो.

सतत वाहणारं पाणी हे स्वच्छ असतं , पारदर्शक असतं आणि महत्वाचं म्हणजे पिण्यालायक असतं . तेच पाणी जेव्हा एखाद्या ठिकाणी साचून राहतं तेव्हा त्याचा घाणेरडा वास येतो , दूषित दिसू लागतं आणि आपण ते पिण्याचा कधीच विचारही करू शकत नाही. माणसांचं ही अगदी सेम आहे. Comfort zone मध्ये अडकून पडणे म्हणजे आपली प्रगती खुंटणे. जिथे आपण आपल्या comfort zone च्या बाहेर उडी मारायला शिकलो तिथून आपली खरी प्रगती सुरु!

‘भीती’ नक्की काय करते? भीती आपला बचाव करते. भीती ही एका मर्यादेपर्यंत गरजेची आहे , महत्वाची आहे. बऱ्याच हानिकारक गोष्टींपासून ती आपला बचाव करते. जेणेकरून त्या भीती च्या भावनेमुळे आपण त्या गोष्टीत पडत नाही. पण आयुष्यात सगळंच असं safe-safe मिळालं असतं तर किती बरं झालं असतं नाही ? काहीतरी मिळवायचं , चांगलं आयुष्य जगायचं म्हणाल की रिस्क घेणं आलंच.

काही लोकांना घराच्या बाहेर पडायची देखील भीती वाटते , अपघाताच्या भितीने असेल किंवा आणखी काही , पण तसं जरी असलं तरी घरातून बाहेर न पडण्याचे देखील खूप तोटे आहेत. त्यामुळे ती रिस्क पत्करून आपल्याला घराबाहेर पडावंच लागत , आणि त्या भीतीवर मात करावीच लागते.

हे सगळंच जरी पटत असलं , तरी जेव्हा भीती समोर उभी राहते तेव्हा हे सगळं ज्ञान कुठेतरी निकामी होतं . मग अशावेळी काय करायचं?

जेव्हा भीती समोर उभी राहते , तेव्हा एकचं गोष्ट करायची आणि ती म्हणजे तिचं ऐकायचं नाही. भीती वाटायला लागली कि ती फार पटापट फार काही बोलायला लागते आणि तेव्हा आपलं अवसान गळून पडतं . त्यामुळे तीच ऐकायचं नाही आणि ती सांगेल ते करायचं नाही. जेव्हा आपण तीच ऐकत नाही तेव्हा तिची सगळी पॉवर आपण काढून घेतो आणि त्यानंतर आपण तिला जरा अधिक सहजरित्या सामोरे जाऊ शकतो.

उदाहरणार्थ , जी लोकं तुम्हाला bully करतात , म्हणजेच त्रास देत असतात , ती तुम्हाला सांगतात हे करा , ते करा पण जेव्हा तुम्ही ते करता त्यावेळी त्या लोकांची पॉवर अजून वाढते. पण जेव्हा तुम्ही त्याच्या विरुद्ध करता तेव्हा त्यांची पॉवर तुम्ही काढून घेता , म्हणजेच ते तुम्हाला परत त्रास द्यायला येत नाहीत. आणि तुम्ही अशा परिस्थितीवर मात केल्याने तुमचंही धैर्य वाढतं .


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!