Skip to content

चिंता समस्येने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना ह्या ४ प्रकारच्या गोष्टी नको सांगायला.

चिंता समस्येने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना ह्या ४ प्रकारच्या गोष्टी नको सांगायला.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


चिंता एक असा शब्द जो आजकाल सर्वांच्या तोंडात बसलेला आहे. ही एक अशी भावना आहे जी सर्वांना कमी अधिक प्रमाणात जाणवते. पण त्याची तीव्रता वाढली की माणसाच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. चिंता ही नेहमी भविष्यकाळाबद्दल असते आणि ती जाणवायला लागली की माणूस ती परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करत असतो.

उदा. परीक्षा जवळ आली की मुल आजारी पडतात, उद्या वर्गात पुढे जाऊन बोलायचे आहे अस समजलं तर शाळेला दांडी मारणे अशी बरीच उदाहरणं आहेत. चिंता विकाराचे पण अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये generalised anxiety disorder, panic disorder, health anxiety, OCD, social anxiety, PTSD, specific phobias असे अनेक प्रकार आहेत. या प्रकारांनुसार व्यक्तीच्या लक्षणांमध्ये बदल होत जातो.

पण चिंतेची काही कॉमन लक्षण आहेत ती म्हणजे माणसाला चिंता जाणवायला लागली की पोटात दुखू लागलं, कारण चिंता सर्वात आधी पोटात जाणवते. आपण म्हणतो देखील माझ्या पोटात गोळा आला, तसच छातीत धडधड होणे, हात पाय कापणे, हाता पायाला घाम येणे, श्वास फुलणे अश्या गोष्टी होतात. विचार पण असे असतात की मला काही ती गोष्ट नीट हॅण्डल करता येणार नाही, परीक्षेत मी नापास होईन, मला काही सुचतच नाही.

एकप्रकारची अस्वस्थता जाणवू लागते. अशी व्यक्ती म्हणजे चिंतेने ग्रस्त असलेली व्यक्ती जर आपल्यासोबत असेल, आपल्यासमोर असेल तर बरेचदा आपण गोंधळतो. तसच बरीच जण अश्या व्यक्तींना सांभाळायचा प्रयत्न करतात, त्यांची चिंता कमी व्हावी, त्यांचं पॅनिक होण कमी व्हावं म्हणून काही प्रयत्न करतात. पण यामध्ये अनेकदा अश्या गोष्टी सांगितल्या जातात ज्यातून चिंता कमी होण्यापेक्षा अजून वाढण्याची शक्यता असते किंवा त्या सांगण्याचा काही परिणाम होतच नाही. त्रास तसाच राहतो.

याच कारण नॉर्मली आपल्याला जेव्हा ताण जाणवतो तेव्हा आपल्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी इथे लागू होतीलच अस नाही. कारण हा त्रास माणसानुसार बदलत जातो. एकाला जे तंत्र उपयोगी पडेल ते दुसऱ्याला पडत अस नाही. तसच टेन्शन येणं आणि तीव्र चिंता जाणवणे यात फरक आहे. त्यामुळे आपण त्या व्यक्तीला त्या वेळी काय सांगत आहोत याचा आधी विचार केला पाहिजे आणि आपल्याला समजलं पाहिजे की काय बोलावं आणि काय बोलू नये. आपण अश्या चार गोष्टी पाहणार आहोत ज्या चिंता समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला आपल्याला सांगायच्या नाही आहेत.

१. शांत व्हा: जेव्हा एखादी व्यक्ती खूप जास्त anxious होते, पॅनिक होते तेव्हा हा शब्द पटकन वापरला जातो की शांत व्हा. पण याचा व्यक्तीवर परिणाम होत नाही कारण जेव्हा व्यक्ती पॅनिक होते तेव्हा श्वास फुललेला असतो, खूप धडधडत असत, माणूस घाबरलेला असतो अश्या वेळी तिला शांत व्हायला जमलं असत तर ती स्वतः झाली असती. पॅनिक असताना लगेच व्यक्ती शांत नाही होऊ शकत. त्यामुळे अस पटकन बोलण्यापेक्षा तशी कृती करा. तुम्ही आधी शांत व्हा. श्वास सावकाश घेणं आणि सोडणे हे तिच्या समोर तुमच्या कृतीतून सावकाश करून दाखवा. समोरची व्यक्ती जर अशी घाबरलेली असेल तर बऱ्याचदा आपण पण टेन्शन मध्ये येतो म्हणून आधी स्वतःची चिंता कमी केली पाहिजे. त्याचबरोबर मी तुझ्यासोबत आहे इतकच म्हणा.

२. तुला वाटत तितकं टेन्शन घेण्यासारखे काही नाही: हे एक वाक्य सहजपणे वापरलं जातं. आपण जेव्हा अस म्हणतो की तू ज्या गोष्टींचं टेन्शन घेतो तेव्हढ त्यात काही नाही यात आपला उद्देश वाईट नसतो. आपल्याला हेच सांगायचं असत की जितकी त्यांनी मनात ती गोष्ट मोठी केली आहे तेवढी ती नाही.

पण हे समजावून सांगायची ही पद्धत नाही. कारण कोणाला कोणत्या गोष्टीची चिंता वाटेल हे आपल्या हातात नाही. ९०%मार्क्स पडणारा मुलगा पण प्रसंगी रडतो आणि ३५% पडणारा पास झालो म्हणून आनंदी होतो. त्यामुळे आपल्याला जी गोष्ट साधी वाटते ती त्यांच्या लेखी मोठी, गंभीर असू शकते.

ही गोष्ट आधी आपण समजून घेतली पाहिजे. याला subjective unit of distress असं म्हणतात. जो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. ही चिंता कमी करण्याच्या cbt मध्ये काही पद्धती आहेत. त्यांचा वापर करून चिंता कमी करता येते. पण अगदी सहज, कोरडेपणा ठेवून आपण जर अस म्हटल की तुला वाटत तेव्हढ हे काही नाही तर त्याने तो माणूस अजून दुखावू शकतो.

३. तु का इतका पॅनिक होत आहेस? : काही वेळा अस होत की माणसाला त्याच्या चिंतेचे कारण माहीत असत. पण अनेकदा जेव्हा व्यक्ती पॅनिक होते खूप जास्त चिंतित होते तेव्हा त्या वेळी त्या माणसामध्ये ती क्षमता नसते की ती सांगू शकेल नेमक कश्यामुळे हे होत आहे. असही असू शकत की बऱ्याच दिवसांच साठलेले काहीतरी बाहेर पडत आहे. त्यामुळे कश्याने इतकं पॅनिक होत आहेस या प्रश्न त्या माणसाला तिथे काहीच उपयोगी पडत नाही. आणि त्याला कोणी आपल्याला असा प्रश्न विचारावा अस अपेक्षित नसत. आता फक्त आपल्या सोबत कोणीतरी असावं अशीच इच्छा असते. जे आपण करू शकतो. आपण फक्त त्यांच्यासोबत तिथे राहायचं आहे.

४. यातून बाहेर पड: कोणतीही व्यक्ती आपल्या मनाने त्रास निवडत नाही. कोणालाच तो नको असतो. काहीतरी कारण असतात म्हणून त्या माणसाला इतका त्रास होत असतो. अश्या वेळी ती व्यक्ती त्रासात असताना तिला म्हणणं यातून बाहेर पड हे असंवेदनशीलता दाखवून देत. तसच त्या माणसाला एकट्यालाच यातून बाहेर पडायला लागेल, मदतीला कोणी नाही अशी जाणीव करून देत. आपल्याला कदाचित त्यांचा त्रास तितक्या तीव्रतेने जाणवत नसेल, समजत नसेल पण निदान आपण आपल्या वागण्याबोलण्यातून त्यांना ही जाणीव करून देऊ शकतो की ते एकटे नाही आहेत. त्यांना मदत करणार कोणतरी आहे. ती दोघं मिळून यातून बाहेर पडू शकतात. ही आशा आपण त्यांच्यामध्ये निर्माण करायची आहे.

आपल्यासोबत कोणतरी आहे ही जाणीव माणसाला खूप काही देऊन जाते. आपला त्रास कोणतरी समजून घेत आहे, आपलं बोलणं ऐकून घेत आहे इतकं त्या माणसाला पुरेस असत. आणि हे चिंतेच्या बाबत नाही तर कोणताही त्रास असलेल्या माणसाला लागू होत.

आपण काय करतो एकसारखं सूचना देत बसतो. ज्याची त्या वेळी खरतर गरज नसते. बोलण्याहुन अनेकदा ऐकणं प्रभावी ठरत. तेच आपल्याला करायचं आहे. एकदा ती व्यक्ती स्थिर झाली की मग आपल्याला नेमकी काय समस्या आहे यावर बोलता येत आणि मग त्यावर कसं काम करायचं, त्यातून बाहेर कसं पडायचे याचे मार्ग शोधता येतात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!