Skip to content

बदला घेण्यापेक्षा स्वतः बदलण्यात जास्त मजा आहे.

बदला घेण्यापेक्षा स्वतः बदलण्यात जास्त मजा आहे.


हर्षदा पिंपळे


“The best revange is massive success.”(-Frank Sinatra) वाह्..! खरं तर ‘Frank sinatra’ यांनी एका ओळीत revange ची व्याख्याच बदलून टाकली.आणि ती खरच तितकीच appreciate करण्यासारखी आहे. आणि या लेखाचा विषयही अगदी या ओळीला साजेसा आहे.’बदला घेण्यापेक्षा स्वतः बदलण्यात जास्त मजा आहे.’ पहा अगदी मिळता-जुळता हा विषय आहे.

यावरून एक नक्की की Frank sinatra यांनी सांगितलेली बदल्याची व्याख्या अजिबातच नाकारण्यासारखी नाही.त्यात काहीतरी तथ्य अगदी निःशंक आहे.आणि त्यांनी केलेली ही व्याख्या नाकारण्यासारखी जरी नसली तरी त्या व्याख्येला नाकारणारे कितीतरी या जगात आहेत.

अगदीच सांगायच झालं तर आपल्या आयुष्यात ‘बदला’ अर्थात ‘revange’ सारखी परिस्थिती एकदा का होईना पण ओढवतेच.म्हणजे कसं होतं तर एकतर कुणीतरी आपला बदला घेत असतं नाहीतर मग आपण तरी कुणाचातरी बदला घेत असतो.म्हणजे एखाद्या घटनेमुळे दोन माणसांमध्ये वितुष्ट निर्माण होते. पण दोघांच्या मनातील राग-अहंकार काही स्वस्थ बसू देत नसतो.दोघांपैकी एकाला तरी सतत वाटतं की आपण बदला घ्यायलाच हवा.

“मला त्रास देतोय,मला त्रास दिलाय आता तर याला मी सोडणारच नाही. याचा बदला मी काहीही झालं तरी घेणारच.असं सहजासहजी मी याला सोडणार नाही.आणि याचा बदला घेतल्याशिवाय याला अक्कलही येणार नाही.”

असं काहीसं नाही म्हंटल तरी प्रत्येकाने ऐकलच असणार यात काही शंका नाही.इतकच नाही तर असं बोलणारे आपल्यातीलच काहीजण असतात.

अगदी मान्य आहे की बदला कुणी असच सहज घ्यायच म्हणून कुणी घेत नाही. त्यामागे कितीतरी कारणं असतात. कुणाच्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी (त्रास दिलेल्या)चिड,राग,द्वेष, अहंकार या अशा काही भावना एखाद्या आगीप्रमाणे धगधगत असतात.आणि यातूनच बदला घेण्याची भावना अर्थात सूडभावना बळावत जाते.

आता एखाद्या व्यक्तीने त्रास दिला तर त्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी कित्येकांचे हात सहजपणे पुढे सरसावतात.आणि अनेकदा बदला घेताना आपण नक्की काय करतोय हा विचार बाजूला राहतो. Revange च्या प्रवाहात कसे वाहत जातो कळतही नाही.पण कधी कधी हीच सूडभावना एखाद्या गुन्ह्यात रूपांतरित व्हायला वेळही लागत नाही. त्यामुळे बदला घेताना जरा जपूनच…!

पण मित्रांनो बदला घेणं खरचं इतकं आवश्यक आहे का…? निश्चितच प्रत्येकाची मतं इथे निरनिराळी असतील.कुणाला वाटत असेन की बदला घेतलाच पाहिजे आणि कुणाला वाटत असेल की बदला न घेतलेलाच बरा.आता नाना तऱ्हेची ही विचारसरणी.

आता अशी विचारसरणी असल्यावर ‘कुणाचं ऐकायच…??? ‘ या संभ्रमात तर मी नक्कीच पडू शकते.

पण मग या बदल्याचा विचार करता मला वाटतं की आपण एखाद्याचा असा बदला न घेतलेलाच बरा.कारण बदला घेऊन काय साध्य होणार…? समोरच्या व्यक्तीने दिलेला त्रास पुसला जाणार आहे का..? की समोरची व्यक्ती सुधारेल…? आणि असे प्रश्न जेव्हा पिंगा घालू लागतात तेव्हा मात्र वाटतं खरचं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते दोन-तीन प्रश्न पुढचा प्रश्न सहज सोडवतात.

कारण खरच असा बदला घेतल्याने काही साध्य होणार नाही.समोरच्या व्यक्तीने दिलेला त्रासही या क्षणाला तसाच असणार आहे. आणि समोरची व्यक्ती सुधारेलच अशी काही शाश्वतीही नाही. इतकच नाही तर आपण आज बदला घेतला आणि उद्या पुन्हा त्याने बदला घ्यायचा प्रयत्न केला तर….???आणि बदला घेताना कळत-नकळतपणे जास्तीच काही होऊन बसलं तर…?? अशा अनेक शंका बदला का घ्यायला नको हे सहज स्पष्ट करतात.

आणि एखाद्याचा बदला घेताना आपण आपला अमूल्य असा वेळ वाया घालवणार असतो हे आपण विसरतोच.पण त्याच वेळेमध्ये आपल्या आयुष्याच काहीतरी कल्याण होऊ शकतं असा विचार आपण का करत नाही…?

केवळ बदला घेण्याच्या नादात आपण आपल्याला विसरून जातो. आपल्यातील चांगूलपणाही नकळतपणे कुठेतरी फेकून देतो.आणि एखाद्या सूडभावनेला करकचून मिठी मारतो.बदला घेऊन मोकळे होतो.पण नंतर पुढे जाऊन त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा कुणी नीट विचारच करत नाही.मग काय…एका बदल्यावर आपल्याला दुसरा-तिसरा असे अनेक बदले अगदी मोफत मिळायला लागतात. आयुष्य केवळ त्याच्याभोवतीच फिरत राहतं.

मित्रांनो खरचं असा बदला घेण्यापेक्षा स्वतःला बदला.त्यातच खरी मजा आहे. आता मला सांगा, जेव्हा नैसर्गिकरित्या जे काही प्रलय आणि संकटं येतात तेव्हा आपल्याला त्रास हा होतोच.आपल्यालाही निसर्गाचा खूप राग येतो.पण तेव्हा आपण त्या निसर्गाचा बदला घ्यायला जातो का…? त्या निसर्गावर कोणताही सूड उगवतो का..?
तर नाही. अशावेळी आपण आपल्याला बदलायचा प्रयत्न करतो. परिस्थिती बदलू शकत नाही म्हणून आपण आपली मनःस्थिती बदलतो.कालांतराने परिस्थितीही सुरळीत होते.

थोडक्यात सांगायच झालं तर जे झालं ते स्वीकारून पुढे जाण्यात अर्थ असतो.आता बदला घेण्यासाठी आपल्याच आयुष्यातील कितीसा वेळ आपण खर्च करणार…?असं वारंवार कुणाचातरी बदला घेत राहिलो तर आयुष्य जगायच राहून जाईल.आणि उरलेल आयुष्य केवळ इतरांचे बदले घेण्यातच जाईल.

त्यामुळे मित्रांनो बदला घेण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात असं काहीतरी करा जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्यांच्या त्या कृत्याचा निश्चितच पश्चाताप होईल.त्यांना दाखवून द्या तुमच्यातील ती ताकद पुन्हा उभं राहण्याची.कोणत्याही वादळाला निडरपणे सामोरं जाण्याची.आणि केवळ त्यांना पश्चाताप व्हावा म्हणून नाही तर स्वतःसाठीही हे आव्हान स्विकारा.

बदला घेण्यापेक्षा बदलवून टाका स्वतःला..त्यातच खरी मजा आहे.आयुष्य म्हणजे बदला घेणं नसतं तर वेळेनुसार स्वतःला बदलणं असतं. स्वतःला इतकं बदलून टाका की समोरचा पुन्हा त्रास देताना हजारदा विचार करेल.बदला घेत राहीलात तर त्याचे तोटेच जास्त आहेत.पण स्वतःला बदलत राहिलात तर त्याचे फायदेच फायदे आहेत.

so…think about it.

पहा…पटलं तर इतरांपर्यंत शेअर करायला नक्की विसरू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

6 thoughts on “बदला घेण्यापेक्षा स्वतः बदलण्यात जास्त मजा आहे.”

  1. खरंच विचार करण्यायोग्य लेख..👍👌👌

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!