Skip to content

तुमचा BP आणि Sugar यामागे तुमची आनंदी मानसिकता किती महत्त्वाची आहे, वाचा!

तुमचा BP आणि Sugar यामागे तुमची आनंदी मानसिकता किती महत्त्वाची आहे, वाचा!


सोनाली जे.


तणावग्रस्त जीवन शैलीचा आपल्या आरोग्यावर अनेकदा आणि अनेक प्रकारे परिणाम होत असतो. तो म्हणजे बीपी मग उच्च रक्तदाब आणि sugar हे दोन्ही आजार .आणि वेळीच लक्ष नाही दिले तर हृदय आणि किडनी त्याशिवाय स्वादुपिंड असे अनेक अवयवांवर परिणाम होत असतात.

बीपी आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचार हे आहेतच पण औषधाच्या माऱ्यामुळे त्याचा ही शरीरावर परिणाम होत असतो. मग हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी अजून उपयोगी पडतो तो म्हणजे आहार. आणि दुसरा म्हणजे मानसिक शांतता आणि स्थैर्य.

तुमचा BP आणि Sugar यामागे तुमची शांत मानसिकता ही आत्यंतिक महत्त्वाची आहे .

ताण तणावापासून दूर राहणे कोणालाच शक्य नाही. अगदी गृहिणी असो , नोकरी किंवा व्यवसाय करणारा पुरुष , स्त्री असो किंवा रिटायर्ड आजी आजोबा असोत , किंवा आजकाल ची शाळेत , महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले मुली असोत, शिक्षण पूर्ण करून चांगलीं नोकरी शोधणारी तरुण पिढी असो. प्रत्येकाला आजच्या काळात ताण तणाव हे आहेतच. मात्र त्याचे नियोजन करता येणे खूप महत्वाचे आहे . मानसिक धक्का बसेल किंवा अचानक तणाव वाढेल अशा परिस्थितीतून शक्यतो दूर रहा.

तुमच्या आवडत्या छंदा मध्ये मन रमवा, मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढविण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी , तणावातून रिलॅक्स होण्यासाठी योगा , meditation, ,relaxation techniques , व्यायाम , भटकंती , सहल , खेळ मग बैठे असतील किंवा मैदानी खेळ , संगीत , कधी गप्पा गोष्टी , मोकळेपणाने सगळ्यांशी संवाद साधा , अडचणी , समस्या असतील तर जवळचे नातेवाईक , मित्र मैत्रिणी यांच्या सोबत चर्चा करा. त्यातून solution , मार्ग निघतील आणि जरी नाही मार्ग सापडले , समस्या सुटल्या नाहीत तरी कोणासोबत तरी संवाद साधल्याने , मोकळेपणाने बोलल्याने मन हलके होते. मनातल्या कोंडलेल्या भावना व्यक्त केल्या जातात , ताण तणाव हलका होतो. आणि मन शांत होते.

पूर्वी आपण चिडलो , रागावलो तर वडीलधारी मंडळी एक ते दहा अंक मोजण्यास सांगत. तरी राग शांत नाही झाला तर पुढचे आकडे .. आणि असे करत शंभर पर्यंत आणि तरीही राग शांत झाला नाही तर उलटे counting सांगत. ज्यामुळे आपले मन दुसऱ्या गोष्टीत divert होत असे. आणि आपल्या मनातले आधीचे विचार दूर जावून दुसऱ्या विषयात गुंतत आणि लक्ष दुसऱ्या विषयात केंद्रित होते. त्यातून तुमच्या तीव्र भावनांवर ताबडतोब नियंत्रण करणे सहज शक्य होत असे. आणि तो ताण ही निघून जात असे.

अगदीच एखादी आकस्मिक घटना घडली , अचानक काही संकटे समोर आली तर वडीलधारी , किंवा डॉक्टर मंडळी दीर्घ श्वास घेण्यास सांगत. सल्ले देत. त्या दीर्घ श्वासातून तुमचे हृदयाचे वाढलेले ठोके नियंत्रित होण्यास मदत होते आणि हृदयाला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित आणि सुरळीत होतो. त्यातून शरीरातले ऑक्सिजन चे प्रमाण ही वाढते. त्यातून शरीरातल्या स्नायूं वरील ताण कमी होण्यास मदत होते. यातून मन शांतता वाढते.

Sugar हा विकार आपल्या शरीरातील auto immune आजार आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती किंवा क्षमतेच्या विकृतीमुळे शुगर वर परिणाम होत असतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती किंवा क्षमतेच्या विकृती कशामुळे निर्माण होते ? एक तर केवळ शरीरातील बदल, मग harmonal असतील किंवा स्वादुपिंड यातील इन्सुलिन निर्माण करण्यात किंवा होण्यात बदल घडून येणे असेल.

पण बरेचदा मानसिक शांतता ठेवल्यास किंवा पटकन कोणत्या गोष्टींना react झालो नाही. प्रतिसाद दिला नाही . तेव्हा हायपर न होता थोडा संयम ठेवला तर शरीरातील आणि मनातील , विचार यावर योग्य नियंत्रण राहते. शिवाय मेंदू , नससंस्था , हृदय त्याच्या वाहिन्या यांवर अचानक येणारा दबाव , ताण पडत नाही. त्यातून immune system ही चांगली राहते. याउलट सतत विचार , ताण , स्ट्रेस , भीती यातून हृदयाची धडधड वाढते म्हणजे अचानक सतत घडणाऱ्या शारीरिक बदल यातून immune सिस्टीम ही बिघडते. त्यातून बीपी आणि शुगर वाढते.

म्हणून परिस्थिती कोणतीही असो, समस्या कोणतीही असो अथवा अडचणी कोणत्याही येवोत ..हायपर न होता शांत राहणे गरजेचे असते. त्यातून आपले शरीर आणि मन ही नियंत्रणात राहते. आणि योग्य ते solution ते ही समस्या सोडवि्यासाठी सापडते.बरेचदा इतरांच्या चुकीच्या वागणुकीला किंवा त्यांचे वागणे आपल्या मनासारखे नसते म्हणून आपण चिडून ,रागावून किंवा बेचैन होवून react होत असतो आणि ताबडतोब प्रतिक्रिया देतो. म्हणून त्यावर उपाय स्वतः करावा. कोणी कसे वागले तरी त्याचा परिणाम आपल्या मन, भावना आणि शरीरावर होवू देवू नका. शांत रहा. ती तात्पुरती परिस्थिती बदलणारी असते. ती वेळ गेली की भावना आणि मन ही बदलते. त्यामुळे शांतता आणि मौन सगळ्यात उत्तम उपाय.

थोडक्यात, तुमचा आणि तुमच्या सोबत असलेल्यांचा ही BP आणि Sugar यामागे तुमची आणि त्यांची शांत मानसिकता महत्त्वाची आहे. आयुष्य सुंदर आहे. मन आणि शरीर दोन्ही ही निरोगी आणि स्वस्थ ठेवा. मनःशांती आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्लीच आहे ती.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “तुमचा BP आणि Sugar यामागे तुमची आनंदी मानसिकता किती महत्त्वाची आहे, वाचा!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!