नेहमीच बोलण्याची घाई करणारी माणसं होणाऱ्या परिणामांचा विचार करत नाहीत ,ह्यावर उपाय.
रोहिणी राधाकीसन
“अति घाई संकटात नेई” हे आपण ऐकलेल आहे , पण हे आपल्या स्वभावातच असेल तर , आपण किती मोठ्या संकटात अडकू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे हो ना! मग मुळात आपण घाई करतोच का ते समजून घेतल पाहिजे, एकतर आपल्याकडे वेळ कमी असल्यावर आणि दुसर म्हणजे आपल्याकडे संयम कमी असल्यावर . खूप लोकांमध्ये दुसरं कारण आपल्याला बघायला मिळत ते म्हणजे संयम कमी असणे , वेगवेगळ्या परिस्थितीला ,अडचणींना आपण दर दिवशी समोरं जात असतो.
प्रत्येक परिस्थितीला समोरं जाण्यासाठी आपल्याला ती परिस्थिती जाणून घेण्याची गरज असते,काही वेळेस आपल्याला आपले मत मांडावे लागते , काही वेळेला आपल्याला सल्ला द्यायचा असतो, काही वेळेला आपल्याला समोरच्याच मत ऐकाव लागत ,काही वेळेला समोरच्याची अडचण समजून घ्यावी लागते, त्या परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्याव लागत तेव्हाच आपण एखाद्याची मदत करू शकतो ,समोरच्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करू शकतो बरोबर ना!
मग काही लोक नेहमीच बोलण्याची घाई का करतात? आता मला सांगा जर आपण फक्त आणि फक्त बोलतच राहिलोत आणि समोरच्याच ऐकलंच नाही तर , समोरची व्यक्ति आपलं बोलणं का एकेल, आणि आपणही अशी अपेक्षा करतो की माझ बोलणं ऐकल पाहिजे. जर आपल्यामध्येच ज्या गुणाची कमी आहे ती आपण दुसऱ्यामद्धे शोधत असतो.
एक तर आपण प्रत्येकवेळी घाई मध्ये कुठला निर्णय घेत असू तर त्याचे चुकण्याचे योग जास्त असतात , अस म्हणतात की *” एका मिनिटात आयुष्य नाही बदलत पण, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.” आणि जर आपणही बोलण्याची घाई करत करत असाल तर , त्याच्या होणाऱ्या परिणामांचा विचार आपण बोलताना करत नसाल ,आणि याचे दुष्परिनाम तुम्ही नक्की भोगत असाल जस की
1)जर तुम्ही परिस्थिति समजून न घेता बोललात तर तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार विषय सोडून बोलणार, ज्याच्यामुळे तुम्हाला नामुष्कीच मिळणार.
2)तर कधी तुम्ही काही तरी मोठं बोलून फसणार आणि आपल्याच शब्दात अडकणार .
3)या सवयीमुले लोक आपल्याला फक्त आणि फक्त फुगीर, व अति शहाणा समजणार .
4)ही सवय दाखवून देतेकी तुमचं व्यक्तिमत्व किती असंयमी आहे .
5)आणि हयातून तुम्ही समोरच्याचा फक्त अनादरच करता.
6)हे एक उत्तम उदाहरण असेल तुम्ही एक उत्तम श्रोता नसल्याचं.
या गोष्टी टाळून तुम्ही एक चांगला श्रोता बनणं खूप गरजेच आहे , जर आपण ही गोष्ट चार लोकांमध्ये करत असू तर तो समोर असणाऱ्या मोठ्यांचा अनादर आहे , किंवा जर तुम्ही एखाद्याला सल्ला देत असला तर तुम्ही त्याचा भावनांना ठेस पोहचवत आहात , प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक चांगला श्रोता असणं फार महत्वाच आहे .
एक आई-बाबा बनूणही तुम्ही एक उत्तम श्रोता असणं फार गरजेच आहे , जे तुम्ही तुमच्या पाल्याच बोलणं पूर्ण न होऊ देताच मी एक पालक आहे मला सर्व काही माहीत आहे या विचारात अडकलेले असाल आणि आपल्या मुलांचे बोलणे नीट ऐकूण, समजून घेत नसाल आणि वारंवार तुम्ही हेच करत असाल तर तुमची मुले , कधी कुठल्या मोठ्या संकटात जरी अडकली तरी ती तुमच्याकडे मदतीसाठी न येता ती दूसरा पर्याय शोधणार. फक्त येथेच नाही तुम्ही समुपदेशक असाल , तुम्ही व्यवसायक असाल , तुम्ही एक मित्र/मैत्रीण असाल, नवरा/बायको असाल,
अगदी गुरु- शिष्य असाल किंवा नातं कुठलही असुदे तुम्ही समोरच्याच बोलणं आदराने ऐकणं खूप गरजेच आहे. तुम्ही एक चांगला श्रोता असणं खूप महत्वाच आहे. तेव्हाच तुम्ही त्या व्यक्तिला समजू शकता ,त्याची अडचण ,समस्या जाणून घेऊ शकता व त्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकता . तेव्हाच समोरची व्यक्ति दुखा:त आपला धावा करेल.
बऱ्याचदा आपण काही तरी सल्ला देणं गरजेच नसतच, बरीच दुख: , मनं यामुळे हलकी होतात की त्यांच्या भावना संयमाने ऐकणार कोणीतरी आहे. परिणाम स्वरूप या प्रत्येक भूमिकेत आपण आपला व्यवसाय , आपले ग्राहक गमावू शकतो , आपली नाती , मैत्री , जोडीदार यांपासून दुरावू शकतो , न ऐकता बोलण्याच्या घाईत नामुष्की ओढवून घेऊ शकतो. पण आपणं या गोष्टी टाळू ही शकतो, एक चांगला श्रोता बणून बरोबर ना?
कसे ते बघूया –
* त्या व्यक्तिला आरामदायकतेची जाणीव करून द्या , त्याला आपल मन मोकळ करताना , समस्या सांगताना अवघडल्या सारख नाही वाटलं पाहिजे .
** आपलं पूर्ण लक्ष त्याच्या बोलण्याकडे आहे असं दाखवणे .
*** त्याची समस्या आपल्याला कळते आहे अशी त्याला जाणीव करून देणे.
**** त्याच्या दुखा: बद्दल समानुभूती दाखवणे .
*****आपलं मत मांडण्यासाठी त्याचं बोलणं पूर्ण होण्याची वाट पाहणे .
लफ्फाजियों का संक्रमण ही है जो वक्ताओं का कुम्भ हो गया है ये शहर ,
पर उंगलियों पे गिन सकूं उतने भी काबिल श्रोता नहीं है..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

👌खुपच सुंदर 👍