Skip to content

वारंवार भूतकाळात रमत असाल तर तेथून स्वतःला असे बाहेर काढा.

वारंवार भूतकाळात रमत असाल तर तेथून स्वतःला असे बाहेर काढा.


हर्षदा पिंपळे


वर्तमानातील क्षण वेचायला शिका
भविष्याच्या कल्पना रंगवायला शिका…
पण… पण फार काळ भूतकाळात रमू नका.

आपल्यासमोर आपला ताजातवाना वर्तमान असताना आपण वारंवार भूतकाळात रमतो.पहा नाही म्हंटल तरी कित्येकजण हे भूतकाळाचेच चाहते.म्हणजे भूतकाळ यांच्या मानगुटीवर बसलाय की हे भूतकाळाच्या मानगुटीवर बसलेत काहीही कळत नाही. समोर वर्तमान असताना भूतकाळाच्या पाठीमागे लागण्याच कारणच काय…? भूतकाळ स्वच्छ-सुंदर असेल तर माणूस रमतो त्या त्या आठवणींमध्ये. परंतु भूतकाळच अस्वच्छ नी अस्वस्थ करणारा असेल तर अशा भूतकाळाच करायच काय…?प्रत्येक गोष्टीतून काहीतरी वाईटच घडतं असं नाही.

प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगल हे घडतच असतं.भूतकाळ हा भूतकाळ असतो.परंतु त्यामुळे वर्तमान आणि भविष्याकडे दुर्लक्ष करायच नसतं.भूतकाळ हा काहीतरी शिकण्यासाठी असतो.सतत गुंतून पडण्यासाठी नसतो आणि नसावा.भूतकाळात सतत रममाण झाल्याने वर्तमान जगायचा राहूनच जाईल. येणारे नी समोर असणारे क्षण निसटून जातील. नव्या आठवणी, नवे प्रसंग अशाने आपल्या आयुष्यात शिरकावही करणार नाहीत.

काय असतं तरी काय…या भूतकाळात ???

(पहिली बाजू)
*कुणा प्रिय व्यक्तीबरोबर भांडण
*ब्रेकअप
*घटस्फोट
*आर्थिक संकट
*अन्याय, अत्याचार
*अपयश
*मानसिक छळ
*शारीरिक छळ
(दुसरी बाजू)

*आर्थिक बाजू चांगली असणे.
*यशाची भरारी
*नातेसंबंध सुस्थितीत
थोडक्यात सांगायच झालं तर काही सकारात्मक आठवणी/घटना.

असं बरच काही कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यात घडून गेलेलं असतं.परंतु सतत तिथेच अडकून रहायच कितपत योग्य आहे….?? हे असं होतं की, ज्याचा वर्तमान वाईट चाललाय त्याला वाटतं त्याचा भूतकाळ किती चांगला होता…./किंवा मग आपला भूतकाळ वाईट होता आणि आता वर्तमानही तसाच आहे…अनेकदा माणूस असा विचार करत राहतो.पण दोन्ही गोष्टींकडून माणसाने काहीतरी चांगल शिकावं.जे वाईट आहे ते सोडून द्यायला हवा.भूतकाळाच्या पलिकडे माणसाला डोकावता यायला हवं. कधी कधी अशक्य वाटतं हे सगळं परंतु यात अशक्य असं काही नाही. केलं तर क्षणात आपण भूतकाळ पुसू शकतो नाहीतर मग आयुष्यभर तो आपण काही पुसू शकत नाही.तर भुतकाळातून बाहेर येण्यासाठी काय करायच हे आपण थोडक्यात पाहूयात—-

*आपल्या कल्पना जगण्याचा प्रयत्न करा.कल्पना रंगवायला शिका.

*एकाच ठिकाणी अडकून आपण पुढे जाऊ शकत नाही हे लक्षात घ्या.

*एकाच ठिकाणी अडकून आपण खूप काही इनोव्हेटीव करू शकत नाही.हे समजून घ्या.

*जे जे केल्याने प्रफुल्लित वाटतं ते ते करायला विसरू नका.

*डान्स/म्युझिक थेरपी ट्राय करून पहा.

*एका शांत , हवेशीर वातावरणात वेळ घालवा.

*भूतकाळ की समोरचा वर्तमान हे ठरवून घ्या.

*अतिविचार करणं त्वरित थांबवा.

*एखाद्या छंदामध्ये मनाची गुंतवणूक करा.

*भविष्याचा विचार करा.

*पुढे काहीतरी चांगल घडणार आहे असा विचार करा.

*पॉझिटिव्ह रहायचा प्रयत्न करा.

*डोकं मन चांगल्या कामामध्ये इनव्हेस्ट करा.

*योगासने/ध्यानधारणा याने चित्त थाऱ्यावर राहतं.त्यामुळे रोज सकाळी न चुकता या गोष्टी करा.दिवसही चांगला जाईल.

*भूतकाळाचा कम्फर्ट झोन सोडून जरा बाहेर पडा.

मित्रांनो,आयुष्य आईस्क्रीम सारख असतं.वितळायला सेकंदही पुरेसा असतो.त्यामुळे त्याचा आनंद घ्यायचा की आहे त्यात गुंतून पडायच हे प्रत्येकाने ठरवावं.कारण आयुष्य सुंदर आहे ते असं भूतकाळात रममाण होऊन घालवू नका. भूतकाळात राहिलात तर आयुष्य जगायचच राहून जाईल.त्यामुळे विचार करा…भूतकाळाला टाटा बाय बाय करा. काहीतरी चांगलं नक्की होईल यावर विश्वास ठेवा.

सरला तो काळ
जाऊ दे ना आता
कर, वर्तमानासाठी
आता मोकळं आभाळ…

अजून किती रे झुरावं?
भूतकाळाला स्मरावं
क्षणा-क्षणाला पुन्हा का?
सांग दुःखानं भरावं…

जरा सावर मनाला
आवर वेदनेला…
दुःख अंतरीचे आता
नको सांगू रे कुणाला.

झटकून काळजाला
घे श्वास जरा दीर्घ
जरी वाट निखा-याची
तरी दिसेल रे मार्ग.

बघ,
हातात तुझ्याच
तुझ्या भविष्याची दोर
घे
समजून घे पुन्हा तू
जरा आयुष्याचं सार.(-कवयित्री -जयश्री हातगले)

खरं तर खूप सुंदर कविता. यातून खूप काही शिकण्यासारख आहे. प्रत्येकाने हे काव्य मनामनात रुजवायला हवं.आयुष्याच सार थोडं आता समजून घ्यायला हवं.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!