भूतकाळ आणि भविष्याची चिंता न करता वर्तमानकाळ कसा जगवा….!
रागिणी शिखरे
मागचा त्रास सोडून जेव्हा पुढचं जगायला शिकालं, तेव्हा बरच चांगल होण्याची शक्यता असते. आपल्या ह्या काळात आयुष्याचे चक्र फिरत राहत. पण ह्या तीन काळामध्ये महत्त्वाचा असतो तो वर्तमानकाळ. ज्यामध्ये माणूस आज काल जास्त जगत नाही ये, एक तर तो भूतकाळात रमून जातोय किंवा भविष्याची स्वप्ने बघतोय. भविष्याचा विचार जरूर करावा.पण जास्त गरजेचा आहे तो वर्तमानकाळ. कारण आपण जेव्हा मागचा त्रास सोडून सगळं विसरून पुढचं जगायला शिकतो तेव्हा आपल्या आयुष्यात खूप चांगल घडण्याची शक्यता असते. त्रास कोणाला चुकलेला नाही तो प्रत्येकाला असतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता ना कोणता त्रास आहेच. कोणाला कसला आजार आहे तर कोणी करियर च्या विचारात आहे.तर कोणी आर्थिक संकटात आहेत. पण त्रास हे कायम नाहीत. म्हणजे त्रास जरी संपलेला दिसत नसला तरी, त्रासाच्या प्रकारात बदल होतो. म्हणजे की कधी कधी त्रास संपत नाहीये असे वाटते तेव्हा एकच गोष्ट म्हणजे तो त्रास सोडून देणे. आणि पुढेचे आयुष्य जगायला शिकणे. आपल मन सांभाळने आपल्या च हातात असत. मला असं वाटत माणसाची विचार करण्याची मानसिकता म्हणजे, स्वतः च्या बाबतीत काही वाईट घडले तर सारखं सारखं तेच उगाळत बसणे.
यामुळे काय होते आपण सारखा तोच विचार करत बसतो.. सारखं त्याच गोष्टी वर चर्चा करण्या मुळे होते काय? घडून गेलेली गोष्ट बदलत नाही , कारण तो भूतकाळ असतो आणि म्हणूनच त्याचा वर्तमानकाळात विचार न करण गरजेचं असते . आणि असच होत राहिलं तर समोर घडणाऱ्या खूप चांगल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत.म्हणूनच माणसाने वर्तमानकाळात जगायला शिकले पाहिजेल.आहे त्या गोष्टीचा आनंद घ्या उगाच मागचा किंवा पुढचा विचार करून स्वतःचा आनंद वाया नका घालावू…
तिन मैत्रिणी असतात मीना, मयुरी आणि निकिता. यांची खूप जुनी मैत्री असते. अगदी जीवाला जीव देणारी.खायला, फिरायला, शॉपिंग करायला, प्रत्येक गोष्टी मध्ये त्या तिघी एकत्र असत. या तिघी लहान पणा पासुन एकत्र असल्या मुळे त्यांच्यातल नात खूप घट्ट होत. परंतु नंतर त्या त्यांच्या त्यांच्या करियर मध्ये व्यस्त झाल्या. त्या मुळे त्या एकमेकींना जास्त वेळ नाही देऊ लागल्या. पण मीना आणि मयुरी या सारख्या एकत्र असत.आणि त्या निकिताला खूप काही वाईट बोलत होत्या. तिच्या मागे तिच्या बदल चर्चा करत.
पण थोड्याच दिवसात निकिता ला हे समजू लागले तिला वाईट वाटले पण तरीही ती काही बोलली नाही. ती खूप एकटी पडायला लागली, लहानपणापासून च्या मैत्रिणी दूर जाऊ लागल्या होत्या. हे तिला सहन न्हवत होत. पण मीना आणि मयुरी यांना काहीही फरक न्हवता पडत. त्यांना तर नवीन मैत्रीण भेटली होती. हे बघुन निकिता ला वाईट वाटत होत.मग निकिता ने ही ठरवलं होत.की नाही आता लक्ष द्यायचं तिला त्रास तर होत होता पण ती ते सगळ विसरायला लागली आणि अभ्यासा कडे लक्ष देऊ लागली.
आणि या सगळ्यातून बाहेर पडली. नंतर काहीं काळाने तिला सुंदर मैत्रीण भेटली तीच नाव मधुरा होत. ती सेम तिला हवी तशीच होती.समजून घेणारी. जीवाला जीव लावणारी.आणि त्यांचं नात खूप छान झालं. मधुरा ही खूप छान आणि हुशार होती. तिही निकिता ला समजून घेऊन तिच्याशी आपले पणाने वागत होती आणि त्या दोघी प्रत्येक गोष्टीत एकत्र होत्या. सांगण्याचा हेतू हाच की निकिता जर भूतकाळातला विचार करत बसली असती तर आता तिला ही सुंदर मैत्रीण भेटली असती का? म्हणून जे सत्य आहे ते जगा…
🎯 कटू आठवणी विसरणे.. ज्या गोष्टीमुळे एकटेपणा जाणवतोय, मन अस्वस्थ होतंय त्या गोष्टी हळूहळू विसरण्याचा प्रयत्न करा….
🎯 काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. रोज तेच तेच करण्या पेक्षा काहीतरी वेगळं करायला प्राधान्य द्या..
🎯 जे आवडतय त्या साठी वेळ द्या. आवडणारी गोष्ट करण्या साठी आधी प्राधान्य द्या.. कारण आवडीच्या गोष्टी केल्या तर मनाला समाधान मिळते….
🎯 मोकळे पणाने संवाद साधायला शिका. ज्या व्यक्तीला मनातील घालमेल सांगू वाटते त्या व्यक्तीला ते सांगायला संकोच करू नका. नेहमीच संकोच केला तर मनातील गोष्टी मनातच दडून राहतील….
🎯 मन शांत ठेवा.. तुम्ही स्वप्न नक्की बघा भविष्यासाठी पण जे सत्य होणार आहे आपण जे करू शकतो अशी पण बघा.
वेळ निघून गेल्या नंतर वाईट नको वाटायला की तेव्हा आपण तो वेळ वाया घालवला.. जे सत्य आहे ते जगा त्याचा आनंद घ्या.. वर्तमानकाळात जगा आयुष्य सुंदर वाटेल….
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
