भावनिक होणं म्हणजे काय ? भावना हाताबाहेर केव्हा जातात ?
गीतांजली जगदाळे
(समुपदेशक)
भावना म्हणजे काय ? त्या कशा आणि कुठून येतात ? भावना म्हणजे काय हे खरंच कितपत आपल्याला समजलंय ? भावना हा असा शब्द आहे की , त्याचा अर्थ आपल्या सगळ्यांना कळतो , मात्र त्याची व्याख्या स्पष्ट करताना आपला गोंधळ उडतो .
आधी विचार येतो आणि मग त्या विचारामुळे भावना निर्माण होते , असं काही मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं होतं . पण काहींच असं म्हणणं होतं की आधी भावना येतात आणि मग विचार येतात . आयुष्यात घडणाऱ्या आणि न घडणाऱ्या घटनांमध्ये कधी भावना आधी येतात तर कधी विचार . भावनिक होणं म्हणजे काय ? कोणत्याही प्रकारच्या भावना खूप प्रमाणात अनुभवणे , त्या control न होणे त्यालाच सोप्या शब्दात भावनिक होणे असे आपण म्हणू शकतो .
प्रत्येकाच्या आयुष्यात ही भावनिक होण्याची phase कधी ना कधी येऊन जातेच , एकदाच असं नाही अनेकदा येते . कोणी कितीही strong , कठोर , हळवं , दगड मनाचं कसंही असो , शेवटी आपण सगळी माणसेच आहोत . बऱ्याच वेळा आपण राग , दुःख नाराजगी अगदी आनंदही control करत असतो .
पण कधी – कधी अशी वेळ येते की , या भावनांचा बांध फुटतो आणि तेव्हा त्या आवरेनाशा होतात . त्यालाच आपण भावनिक होणं किंवा emotional होणं असं म्हणतो . भावनिक होणं हे पूर्णपणे normal आणि natural आहे . माणूस म्हणून तो आपला हक्कच आहे . भावनिक होणं म्हणजे weak असणं असं मुळीच नसतं . काही लोकांचा तसा समज असू शकतो पण भावना असणं आणि भावनिक होणं हीच आपली मानवतेची निशाणी आहे .
पण कधी – कधी या भावनांच्या आहारी जाण्याने किंवा practical decision ची जिथे गरज आहे तिथे अधिक भावनिक होण्याने आपले निर्णय चुकू शकतात . भावनिक होणं चुकीचं नसलं तरी ते काही situations मध्ये त्यावर control असणं गरजेचं असतं .भावना अधिक प्रमाणात sensitive होऊन feel करणं चुकीचं नसतं पण त्यांच्या आधारे आपण जे वागतो ते वागणं कधी – कधी समोरच्याला दुखावू शकतं .
खूप भावनिक किंवा emotional व्हायला झालं की काही गोष्टींची खबरदारी आपण नक्कीच घेऊ शकतो . जेणेकरून आपल्या हातून भावनेच्या भरात असं काही होणार नाही ज्याचा आपल्याला नंतर पश्चताप होईल .
१ . Emotional feel करत असताना कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणं टाळा . १०० ते १ असे उलटे आकडे म्हणा किंवा Z ते A असे उलटे alphabet म्हणा . शांत व्हायला त्याने मदत होईल .
२ . आपण या क्षणी भावनिक म्हणजे नक्की काय – काय feel करतोय , हे समजून घ्यायचा प्रयत्न करा . इतरांच्या भावना समजायचा आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढा स्वतःच्या भावना समजण्याचा प्रयत्न आपण कधी केलाय का ? आपण आता काय अनुभवत आहोत , त्यामागची कारणं काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा , आणि ते स्वीकारा . स्वीकारण्याचा अर्थ त्या भावनांनुसार निर्णय घेतले पाहिजेत असा नाही . पण भावना स्वीकारण्याने त्यांना handle किंवा control की करणं सोप्पं होऊन जातं.
३ . अशा परिस्थितीत काय केल्याने तुम्हाला better वाटतं , याचा विचार करा . थोडं चालून येणं असेल , मोकळ्या हवेत जाऊन बसणं , काहीतरी खाणं , रडून मोकळं होणं , किंवा कोणाशीतरी share करणं इत्यादी जे काही असेल ते करा .
४ . झोपेचा आपल्या भावभावनांवर खूप परिणाम होतो . पुरेशी झोप न घेतल्याने सुद्धा नीट विचार करायला , concentrate करायला problem येतो . झोपेचा आपल्या mood वरही फार परिणाम दिसून येतो . त्यामुळे भावनिक समतोल राखण्यासाठी पुरेशी झोप घेणं महत्वाच आहे . आणि कधी – कधी emotional feel करत असताना शक्य असल्यास थोडी विश्रांती घेतली असता बरं वाटू शकतं.
५. Meditation आणि व्यायाम यांचा आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे . आपण जेवढं meditation आणि व्यायाम यांना आपल्या दिनचर्येचा भाग बनवू तेवढंच आपलं आयुष्य ,आपले निर्णय , भावना , आरोग्य सगळंच आपल्या निरोगी राहण्याची शक्यता वाढते .
६.आपण जे खातो त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर फरक पडत असतो . जेवणाच्या वेळा न पाळणे याचाही भावनांवर विशेष परिणाम होतो . त्यामुळे जमेल तेवढा सात्विक आहार घेणे आणि जेवणाच्या वेळा पाळणे महत्वाचे ठरते .
७ . ‘ stress ‘ हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आजकाल प्रत्येक शारीरिक आणि मानसिक बिघाडात stress चा हात असतोच . आपल्या धावपळीच्या जीवनात stress avoid करणं अवघड आहे . पण त्याची तीव्रता कमी करणं शक्य आहे . पण ते करण्यासाठी झोप , आहार , व्यायाम , meditation या गोष्टींपासूनच सुरुवात करावी लागते .
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

thanq 🙏 so much Very good translation 🙏
Apratim