Skip to content

भावनिक आकर्षण कसे जुळते ?? ही मूलभूत ५ कारणे लक्षात घेऊया.

भावनिक आकर्षण कसे जुळते ?? ही मूलभूत ५ कारणे लक्षात घेऊया.


काव्या धनंजय गगनग्रास

( समुपदेशक)


अरे तो किती छान दिसतो नाही, त्याच बोलण, चालणं किती भारी वाटत. तिचे केस किती सुंदर आहेत, दिसायला पण नाजूक, खूप गोड वाटते. अशी वाक्य बऱ्याचदा आपल्या तोंडून निघतात. सेलिब्रिटी, मोठ मोठे कलाकार यांच्या बाबतीत तर हे जास्त असत. अस आपण तेव्हा बोलतो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित झालेले असतो. पण हे आकर्षण कोणत? तर शारीरिक आकर्षण. आपल्याला जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शारीरिक, बाह्य फिचर्स आवडतात तेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या त्यांच्याकडे आकर्षित झालेले असतो.

मग यामध्ये त्यांचा पेहराव असेल, त्यांची देहबोली, चालण्याबोलण्याची लकब इत्यादी गोष्टी येतात. अगदी बरेचदा अनोळखी व्यक्तीच्याबाबत देखील हे होत. वैवाहिक नात्यात किंवा जिथे जवळीकतेचे नाते आहे तिथे अनेकदा शारीरिक आकर्षण ही पहिली पायरी असते, याच कारण म्हणजे आपण माणसाचा स्वभाव जाणून घ्यायच्या आधी तो माणूस दिसतो कसा, राहतो कसा हे पाहतो. अर्थात हे प्रत्येकवेळी होत अस नाही. बहुतांशी वेळी अस होत. नात्यामध्ये जश्या बाकीच्या गोष्टी असतात तस शारीरिक आकर्षण हा देखील एक भाग आहे. यातून पण नात तयार होत, टिकत.

पण नात दीर्घकाळ टिकवायचं असेल, ते चांगल्या पद्धतीने जोपासायच असेल तर तिथे फक्त शारीरिक आकर्षण असून चालत नाही. आणि अशी नाती जास्त काळ टिकत देखील नाही. कारण शारीरिक आकर्षण हीच गोष्ट फार काळ टिकणारी नाही. त्यामुळे फक्त या गोष्टीच्या पायावर जर नात सुरू होत असेल तर ते फार काळ टिकू शकत नाही. त्यासाठी बाकी गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. त्यातलीच एक आणि खूप महत्त्वाची बाजू, एक गोष्ट म्हणजे भावनिक आकर्षण.

एखाद्या व्यक्तीला पाहताक्षणी आपल्याला ती आवडू शकते, त्यातूनही नात तयार होऊ शकत. पण जर नात खऱ्या आणि चांगल्या अर्थाने टिकवायचं असेल तर फक्त हे आकर्षण पुरेस नाही. त्यासाठी भावनिक बंध असणं गरजेचं आहे. भावनिक आकर्षण निर्माण होणे गरजेच आहे. भावनिक आकर्षण म्हणजे काय? ते कधी निर्माण होत? तर जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी फक्त शरीराने नाही तर मनानेही जोडले जातो. भावनिकरित्या व्यक्तीशी जोडलं जाणं म्हणजे त्याला आहे तस स्वीकारणं, त्याच्या चांगल्या वाईट सर्व गोष्टींना आहे तस मानणे. नवरा बायकोच्या नात्यात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.

कारण ज्या व्यक्तीसोबत आयुष्य काढायचं आहे तिथे त्याला माणूस म्हणून स्वीकारणे खूप गरजेचं असते आणि ते भावनिक रित्या जोडले गेल्यावर होते. हे झाले नवरा बायकोच्या बाबत किंवा जी प्रेमाच्या नात्यात आहे त्यांच्याबाबत. पण त्या व्यतिरिक्त देखील आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी भावनिक आकर्षण वाटू शकत. आणि ज्या व्यक्तीविषयी हे अस भावनिक आकर्षण निर्माण होत त्या व्यक्तीबद्दल दर वेळी मनात शारीरिक आकर्षण निर्माण होईलच अस नाही. अश्या अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात ज्यांच्याशी आपलं जवळीकतेच, आपलेपणाच नात असत. पण हे नात निर्माण झालेले असत भावानिक आकर्षणाने. हे नात, हे आकर्षण कसं निर्माण होत? त्याची मूलभूत कारणे कोणती ते पाहू:

१. आवडी निवडी : ज्यांच्याशी आपली मतं जुळत नाही, किंवा ज्यांचे विचार आपल्याला पटत नाही अश्या व्यक्तींच्या संपर्कात आपण कधी फार काळ राहायला पाहत नाही. कारण मतभेद होण्याचं प्रमाण जास्त असत. याउलट ज्यांच्याशी आपले विचार जुळतात, मत जुळतात, आवडी निवडी जुळतात अश्या व्यक्तीच्या संपर्कात राहायला, त्यांच्या सहवासात राहायला आपल्याला आवडत. विचार एकसारखे असल्याने बोलायला खूप वाव मिळतो. मोकळेपणाने बोलता येत. व्यक्तीशी भावनिकरित्या जोडले जाण्यासाठी हे एक कारण महत्त्वाचं ठरतं.

२. एम्पथी: empathy ज्याला तदानुभूती किंवा सहअनुभूती अस म्हटल जात. म्हणजेच काय तर समोरच्या माणसाच विश्व, त्याच जग त्याच्या डोळ्याने पहायची क्षमता. त्याच सुख दुःख, त्याच्या भावना त्याला ज्या पद्धतीने, तीव्रतेने जाणवत आहेत त्या तीव्रतेने अनुभवण्याची क्षमता. जेव्हा अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते जी आपलं सुख दुःख समजून घेऊ शकेल, आपल्या नजरेने गोष्टी पाहू शकेल आणि त्यातून बाहेर पडायला आपल्याला मदत करेल अश्या व्यक्तीशी आपण आपसुकच भावनिकरित्या जोडले जातो.

३. विनोद: हास्य, हसणं कोणाला आवडत नाही? आणि अशी व्यक्ती जर सोबत असेल की आपल्याला हसवत असेल, विनोद सांगून आपला मूड चांगला करत असेल तर आपल्याला अशी व्यक्ती का नकोशी वाटणार? आपल्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये पण असा एखादा माणूस असतोच जो सर्वांना हसवतो. अशी हसऱ्या स्वभावाच्या, खुशमस्करी करणारी माणसं व्यक्तीला आवडतात. कारण हसवणे ही देखील एक कला आहे. सर्वांना हे जमत नाही. दुःखावर अलगद फुंकर मारून त्याला कमी करायची ताकद यात असते. त्यामुळे अशी व्यक्ती जर सोबत असेल तर आपण तिच्याकडे आकर्षित होतो.

४. सोबत असल्याची जाणीव: आताच्या काळात जिथे माणूस स्वतःपासून कुठेतरी दुरावत चाललाय, अश्या काळात अशी व्यक्ती जिने ही जाणीव करून देणं की काहीही झालं तरी तू एकटी/एकटा नाहीये. मी तुझ्या सोबत आहे. मी तुला कधीही एकट पडू देणार नाही. ही जाणीव जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला मिळते तेव्हा आपण त्याच्या अधिक जवळ जातो. कारण आपल्याला सुरक्षित असल्याची जाणीव होते. कोणीतरी आहे ज्याच्याकडे मी माझ्या मनातलं सर्व सांगू शकते/शकतो, जो मला एकट पडणार नाही, ज्याच्याकडे मी कधीही जाऊ शकतो, रडु शकतो, हसू शकतो. तो/ ती मला जज करणार नाही. तो/ती माझी साथ देईल अशी जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या अधिक जवळ जातो.

५. ऐकून घेणं: आपल्याला नेहमी अस वाटत असत की आपण जे काही सांगत आहोत, ते कोणीतरी ऐकावं, आपल्याकडे कोणीतरी लक्ष द्यावं. आपल्या असण्या- नसण्याने कोणालातरी फरक पडला पाहिजे. या गोष्टी जेव्हा एखाद्या माणसाकडून पूर्ण होताना दिसतात तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या जवळ जातो. कारण आपल्याला कोणीतरी विचारात घेतय, आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घेतय ही जाणीव आपल्याला सुखावणारी असते. अश्या व्यक्तीकडे आपण मनातलं सर्व बोलू शकतो, शेअर करू शकतो. जी गुपित अगदी आपण बऱ्याचदा घरातल्या व्यक्तींना सांगत नाही ती या व्यक्तीला आपण सांगतो कारण ती आपल्याला चांगल वाईट ठरवत नाही.

ही अशी काही कारणं आहेत ज्यातून भावनिक आकर्षण जुळते. नात्यामध्ये फक्त चार घटका एकत्र बसणं गरजेचं नसत तर या गोष्टी पण गरजेच्या आहेत. तरच नात चांगल टिकत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!