भावनांचा कोंडमारा करण्यापेक्षा, भावना व्यक्त करायला हव्यात…
मयुरी महाजन
भावना आयुष्यातील सर्वांत मोठा अविभाज्य घटक आहे,व त्याचं भावनांच्या आधारे आपले संपूर्ण जीवनचक्र चालत असते, मनातील ह्या भावनाचं माणसाला कधी आनंद तरं कधी दुःख देऊन जातात, भावना ह्याच आपल्या जगण्याचा आहे,असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही,
आता भावना या आपल्या सोबत सदासर्वकाळ असतात,पण आपण आपल्या भावनांसोबत असतो का??? हा खरा प्रश्न आहे, कारण भावनांच्या पिंजऱ्यात कधी कधी आपण स्वतःलाचं कोंडून घेतलेलं असतं,व त्या कोंडलेल्या अवस्थेत भावनांचा इतका कोंडमारा होतो, की त्याचा त्रास त्या व्यक्तीला आपल्या भावना न कळतांना ती व्यक्ती फक्त अंदाज लावून मोकळी होते,
माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो, तितक्याच सहजतेने प्रेमही व्यक्त करता आलं असतं, तरं जगायला खरंच किती मज्जा आली असती, कारण माणसाच्या निम्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागामुळे व कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात, आपण बरेचदा प्रेम व्यक्त करायला लाजतो, किंवा प्रेम व्यक्त करायला खूप वेळ घेतो, परंतु राग व्यक्त करायला मात्र आपण अगदी क्षणाचाही अवलंब घेत नाही ,
भावना हि सुंदर, निरागस व अगदी खळखळून हसवणारी, कधी कधी खूप रडवणारी, कधी-कधी मोज मस्तीमध्ये दंगा करणारी, कधीतरी खूप रागवणारी, व संतापची अशा कितीतरी प्रकारे भावना व्यक्त होतात ,आणि व्यक्त व्हायला हव्यात, कारण जर कोणत्याही भावनांचा भडीमार हा आपण आपल्या आतच करत असणारं, तर त्या अव्यक्त भावना माणसाला आपल्या आतचं पोखरू लागतात, व भावनांचा कोंडमारा माणसाला आपल्या जगण्याचा खराखुरा आनंद घेऊ देत नाही, कारण आजूबाजूला कितीही आनंदाचे वातावरण असू द्या ,परंतु मनातून जर व्यक्ती त्यासाठी तयार नसेलं, तर बाकी गोष्टी व्यर्थ आहे,
एखाद्या पाण्याची वाट जरं वाहती असेल ,तर त्या पाण्याकडे पाहण्यात सुद्धा आनंद असतो, साचलेले पाणी डबकं म्हणून साचतं, आणि त्यावर घाण व्हायला सुरुवात होते, त्याचप्रमाणे कुठल्याही भावनेत अडकून पडून त्यातच गुंतून राहिलो, तर आयुष्याच्या पुढच्या प्रवाहासाठी आपल्याला ब्लॉक लागून जाईल, आणि कोंडलेल्या भावनांमुळे निर्माण होणारे हे ब्लॉक पुढच्या प्रवासाला आपल्यासाठी धोक्याचे ठरू शकतात ,
आता प्रश्न येतो की भावना कुठे व्यक्त करायला हव्यात, आणि भावना योग्य वेळी व योग्य त्या ठिकाणी व्यक्त करायला हव्यात, ज्या ठिकाणी आपल्या भावनांचा आदर राखला जातो ,ज्या ठिकाणी आपल्या भावनांचा सन्मान होऊन, त्या भावना समजून घेतल्या जातात, व त्या भावनांसोबत व्यक्त झाल्यावर आपल्याला एखादी व्यक्ती किंवा आपल्या व्यक्त केलेल्या भावनांचे शब्द, आपल्याला एक मोकळीकतेची किंवा व्यक्त झाल्याचा आनंद देते, त्या ठिकाणी आपण व्यक्त व्हायला हवं, मग तुम्ही आरश्यासमोर व्यक्त व्हा ,एखाद्या वही पेन घेऊन आपल्या भावना शब्दात मांडून व्यक्त व्हा पण व्यक्त व्हायला हव्यात,
कारण आज रोजी जर आपण छोट्या छोट्या अगदीच आपल्या भावना व्यक्त न करता त्याचा कोंडमारा करून घेत असणारं, तर ते एक दिवस त्या भावनांची प्रेशर कुकर सारखी शिट्टी वाजल्याशिवाय राहणार नाही, जर आपण आपल्या भावनांचा उद्रेक व ज्वालामुखी होण्यपासून वाचवण्याचा विचार करत असालं, तर आपण आतापासून आपल्या कोंडलेल्या भावनांना एक मोकळीकता, मोकळे पंख, मोकळे आभाळात स्वच्छंदपणे त्यांना मोकळ्या करूया….
आपण जोपर्यंत आपल्या भावना व्यक्त करत नाही, तोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्या भावनांविषयी अनभिन्य होवून अंदाज लावते,
जर आपल्याला वाटत असेल की भावनांचा कोंडमारा करून आपण योग्य करत आहोत, तर लक्षात घ्या, कधीतरी आपल्याला त्या भावनांना फेस करावंच लागेल, त्याला सामोरे जावंच लागेलं, त्यासाठी आपण त्याचवेळी त्या भावना व्यक्त केल्या ,तर मनावरती कुठले ओझे राहत नाही ,आणि साहजिकच कुठल्याही गोष्टीचे ओझे घेवून चालण्यापेक्षा रिकामे चालण्यात आपण आनंद अनुभवू शकतो….
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

