भावना ताब्यात ठेवणं म्हणजे त्यांना दाबून टाकणं नव्हे!!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यभरात वेगेवगळ्या भावनांचा अनुभव घेत असते. चांगल्या वाईट, त्या त्या प्रसंगात भावना येत असतात. आताच्या काळात तर आपल्या शैक्षणिक बुद्धिमत्तेइतकं किंबहुना त्याहून अधिक भावनिक बुद्धिमत्तेला म्हणजेच emotional intelligence याला महत्त्व दिलं जात आहे.
कारण त्याचीच सध्या खूप गरज आहे. आपलं चांगल्या शाळेत शिकलो, चांगले मार्क पाडले, चांगल्या ठिकाणी नोकरीला लागतो सर्व मान्य, पण आपल्याला जर मला काय वाटत हे समजत नसेल, मला जर माझे इतरांशी असलेले संबंध नीट ठेवता येत नसतील, स्वतःशी, इतरांशी परिस्थितिशी नीट जोडल जाता येत नसेल तर इथे नुसतं शिक्षण असून काही फायदा नाही. इथे भावनाच मदत करतात.
मदत कश्या करतात?
कारण त्या तर सर्वांना असतातच. मग त्यांची मदत कशी? तर ती या अर्थाने की आपल्याला स्वतः ला समजलं की मला काय जाणवत आहे तर आपण त्यापुढे कस वागायचं हे ठरवणार, दुसऱ्याच्या भाव भावना समजून घ्यायची, तिथे स्वतः ला ठेवायची आपली क्षमता असेल ज्यालाच समानुभुती अस म्हणतात, empathy म्हणतात ती जर असेल तर आपले परस्पर संबंध चांगले होतील, आपली नाती सुधारतील.
आता या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्या भावनांना योग्य त्या प्रकारे ओळखून त्यांचे योग्य पद्धतीने नियमन करणे. म्हणजेच साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांना ताब्यात ठेवणे. ज्यातून आपला आपल्यावर ताबा राहील काही नुकसान होणार नाही.
इथेच बरेच जण गफलत करतात. अनेकांना अस वाटत की भावना ताब्यात ठेवणं, त्यांचं नियमन करण म्हणजे त्यांना दाबून टाकणं. त्यांना व्यक्तच होऊ न देणं. खूप जणांना जर आपण विचारल, तुम्हाला राग आल्यावर तुम्ही काय करता? काही जण म्हणतात मी रागावतो, ओरडतो बोलतो आणि काही जण म्हणतात मी काहीच बोलत नाही. गप्प बसून राहतो.
जर आपण त्यांना विचारल पण याने राग गेलेला असतो का? त्यांचं उत्तर असत. नाही! राग नसतो गेलेलो. पण आम्ही तो मनात ठेवतो. याने समोरच्याला पण त्रास नाही आम्हाला पण नाही. इथेच खरी चूक होते. कारण भावना नियमन म्हणजे भावना व्यक्त न करण अस होत नसून त्याला योग्य त्या ठिकाणी योग्य प्रकारे व्यक्त करण अस आहे.
आपण अस म्हणूच शकत नाही की मी भावना व्यक्त नाही करणार किंवा नाही करत. कारण ते शक्यच नाही. जसा श्वास एकतर कमी असतो किंवा जास्त त्याच्या मधला स्पेस आपल्याला साधायचा असतो. म्हणजेच नॉर्मल breathing. इथे अस म्हणून चालेल का श्वास घेऊयाच नको. काय होईल ते माहीत आहे. भावनांच पण तसच आहे.
आपल्याला वाटत असेल की आपण त्यांना दाबून टाकून ताब्यात ठेवतो तर अस होत नाही. त्या ताब्यात नसतात तर दडपलेल्या असतात. ज्याचा परिणाम स्प्रिंग जशी जोरात दाबल्यावर दुप्पट उफाळते त्याप्रमाणे होतो. आपण जितकं आपल्या भावना दाबणार तितक्या त्या अधिक वेगाने आणि वेगळ्याच चुकीच्या पद्धतीने बाहेर पडणार. ज्या व्यक्ती स्वतःचा राग दाबून टाकतात त्यांच्यामध्ये cardiac arrest होण्याचं प्रमाण जास्त असत. कारण शरीर एका मर्यादे नंतर सर्व बाहेर टाकतच.
जस रागाचं तसच चिंता असेल भीती असेल या गोष्टींचं आहे. ते तुम्ही जितकं आत दाबणार तितका त्याचा शरीरावर आणि मनावर परिणाम होतो.
आपल्याला वाटत आपण बाहेर आपल्याला काय वाटतं आहे ते दाखवलं नाही तर आपल्याला काही त्रास होणार नाही. पण अस कधी होत नसत. या दाबून टाकण्याचाच त्रास सर्वात जास्त होतो.
एका उदाहरणाने हे चांगल्या प्रकारे लक्ष्यात येईल. आपण जेव्हा बाहेर कुठे फिरायला जातो तेव्हा बॅग भरायला लागतेच. मग त्यात सर्व सामान ठेवणं आलं.
आता ते कसतरी बाहेर आलं किंवा त्याची चैनच उघडी राहिली तर वाईट दिसणार म्हणून आपण काय करतो जितकं जास्त होईल तितक आपण सामान दाबून भरण्याचा प्रयत्न करतो. बर अनेकदा हे सामान कश्याही पद्धतीने आत टाकलेले असत. त्यातल खरच आपल्याला किती हवय काय हवंय हे न पाहता सर्वच पाहिजे ते बाहेर येऊ नये म्हणून दाबल जात. तात्पुरती ती बॅग बंद पण होते.
पण मग अर्ध्या रस्त्यात काय होत? जे आपल्याला नको तेच. चैन तुटते, आतल सामान बाहेर येत. ज्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात म्हणून हा आटापिटा करतो त्त्याच होतात.
कश्यामुळे होत हे? कारण आपण ती बॅग नीट अरेंज केलेली नसते, मैनेज केलेली नसते. असच भावनांच्या बाबतीत होत. बाहेर उगाच जास्त प्रमाणत जाऊ नये म्हणून आपण आतल्या आत सर्व ठेवतो आणि तेच अजून डबल स्पीड ने बाहेर येत.
म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की भावना ताब्यात असणं त्यांना दाबून टाकणं नव्हे तर त्यांना योग्य प्रमाणात व्यक्त करण आहे.
It’s all about balance!!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
