Skip to content

भरून आलेलं मन मोकळं झालं तरच बरं वाटेल.

भरून आलेलं मन मोकळं झालं तरच बरं वाटेल.


रोहिणी राधाकिसन


अस्मिता एक कॉलेज तरुणी, तिच्या शेजारी एक आजी राहायच्या. त्यांच नाव शोभा. त्यांना सगळे शोभा आजी बोलायचे. त्यांना एकच मुलगा, अमित त्याच नाव, तो अमेरिकेत शिफ्ट झाला होता. आजोबांना जाऊनही बरीच वर्ष झाली होती. शोभा आजी एकदम एकट्या पडल्या होत्या. त्यांच्या मुलाचा, अमितचा फोन यायच्या आठवड्याला. पण तो पर्यंत आजी त्याच्या फोनची आतुरतेने वाट बघायच्या. फोन आल्यानंतरही आजींना खूप बोलावस वाटायच पण अमितला खूप घाई असायची फोन ठेवायची. आई पैसे मिळाले का ? तब्बेत कशी आहे? वेळेवर औषधं घेतेस ना? मी बार आहे, तू काळजी घे! जेमतेम हेच बोलणं व्हायचं.

पण आजींच मन मात्र यात भरत नसे. आजींना आणखीनही बोलायचं असे. आजींना वाटायचं मुलाने त्यांच मन जाणून घ्यावं, दोन शब्द प्रेमाचे बोलावेत. खूप काही आजींच्या मनात साठलं होत.

शोभा आजी या शेजारच्या मुलांमध्ये मन रमवायच्या. त्यांना बोलवायच्या त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांच्यावर नातवंडाप्रमाणे प्रेम करायच्या, त्यांना खाऊ द्यायच्या. ती मुलही त्यांना आजी, आजी करत प्रेम करायची. त्यामध्येच अस्मिताही होती. आजी तिला खूप जीव लावायच्या. आजी ती कॉलेज वरुन आली की तिला आवाज द्यायच्या. तिच्या साठी नवनवीन पदार्थ बनवायच्या आणि स्वतःला अश्या गोष्टींमध्ये अडकून ठेवायच्या.

पण त्याना खूप एकट वाटायच. त्यांच्याशी बोलणार , त्यांची काळजी घेणार , अस कोणी नव्हतं. आणि त्यांना याची सतत खंत वाटायची. त्या सतत जुने अल्बम बघत बसायच्या. जुन्या आठवणी मध्ये गुंतून राहायच्या.

एके दिवशी अस्मिता कॉलेज वरून आली खूप वेळ झाला, संध्याकाळ झाली पण आजींचा काहीच ठाव नाही. त्यांनी आज अस्मिताला हाक ही नाही दिली. अस्मिता विचारात पडली. आणि ती आजींच्या घरी गेली, दरवाजा बंद होता. तिने दरवाज्याची घंटी वाजवली. थोड्यावेळाने आजींनी दरवाजा उघडला. अस्मिताने तिच्या प्रश्नांचा भडीमार केला आजींवर. आजी हे काय, तुम्ही मला आवाज नाही दिला? मी कधीची आली आहे. तुम्ही दरवाजा ही नव्हतात उघडत? आजींनी खूप खोल आवाजात अस्मिताला आत यायला सांगितल. अस्मिता आत आली पहिलं तर काय, आजी अल्बम बघत होत्या, त्यांच्या मुलाचा. आणि त्या आज खूप मागे आठवणींमद्धे रमल्या होत्या.

त्यांच मन भरून आलं होत. त्यांनी अस्मिताला त्यांच्या मुलाचा अल्बम दाखवला आणि आठवणींना जीवंत करू लागल्या. अस्मिता स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहत होती. त्यांनी खूप गोष्टी अस्मिताला सांगितल्या आणि अस्मितानेही एकही शब्द न बोलता शांतपणे आजींच्या मनाचा मजकूर ऐकला. आणि आजींना अश्रु अनावर झाले. कधी संध्याकाळ झाली हे त्यांना कळलंच नाही. तरी ही अस्मिता अगदी शांत होती.
आजी म्हणाल्या ‘मी तरी काय तुला या गोष्टी सांगत बसले, पण खरं सांगू अस्मिता माझ मन खूप भरलं होत मला खूप काही बोलायचं होत. खूप आठवणी मनात दडी मारून बसल्या होत्या.

मला माझ मन खूप जड वाटत होत , ओझ असल्यासारखं वाटत होतं . आज तुझ्याशी बोलून मला खूप मोकळं वाटतंय. बरं चल तुझ्यासाठी चहा टाकते.’ अस्मिताने शोभा आजींना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आजी मी आहे ना तुमची अस्मिता. आज पासून आपण मैत्रिणी तुम्ही माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करू शकता. हे ऐकूण आजींच्या चेहऱ्यावर जी स्माईल आली, ती पाहून अस्मिताच ही मन आनंदी झालं.

आपल्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात. दु:ख असतात. खूप साऱ्या भावना असतात. एखाद्या बद्दल राग असतो. खूप सारे गैरसमज असतात. पण या सगळ्यांनी आपल मन भरलेलं असतं. नेहमी आपण या भावनांना उजाळा देत असतो. या भावनांना व्यक्त करत असतो, आपल्या जिवलगांपाशी.

आपली दु:ख, वेदना जर आपण व्यक्त नाही केल्या तर आपण त्यातच अडकून राहतो. 24 तास आपण त्याच विचारांमध्ये अडकून राहतो. दु:खच का, प्रेम ही असुदया आपण आपल्या भावना त्या व्यक्तिला व्यक्त केल्याशिवाय नाही राहू शकत. परिस्थिति काहीही असुदया. भावना कुठल्याही असुदया त्या व्यक्त केल्या तरच आपण मोकळं राहू शकतो. नाहीतर आपली मानस्थिति बिघडेल.

ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट सहन करून थकतो, आपल मन त्या परिस्थितिला स्वीकारू नाही शकत त्यावेळी आपल्याला गरज भासते आपल्या माणसांची ज्यांच्यापाशी आपण आपल भरलेलं, थकलेलं मन मोकळ करू शकतो, त्याला नवी उमेद देऊ शकतो. आणि तेव्हाच आपल्याला बरं वाटत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!