Skip to content

मनाने स्ट्रॉंग व्हा, त्यासाठी या टिप्स फॉलो करा!

मनाने स्ट्रॉंग व्हा, त्यासाठी या टिप्स फॉलो करा!


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


काही माणसे वैयक्तिक अपयश पचवून लगेच पुढे सरकतात, पण काही लोकांना तेवढ्या सहजतेने अपयशांवर मात करता येत नाही, त्यांना खूप वेळ लागतो, आणि खूप अवघड ही जात. आणि त्याचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होऊन त्यांना आयुष्यात येणारी चॅलेंजेस डोंगराएवढी वाटू लागतात. मनाने स्ट्रॉंग नसणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला फार त्रास होतो.

आपणही याच माणसांमध्ये मोडत असलो तरी काळजी करण्याचं काही कारण नाही. थोडे कष्ट, प्रॅक्टिस आणि नियमितपणा अंगी बाणला तर नक्कीच आपण ही मनाने स्ट्रॉंग होऊ शकतो. पण मनाने स्ट्रॉंग होण्याची प्रक्रिया, एका रात्रीत आपण स्ट्रॉंग होऊ अशी नसते, त्यामुळे आपल्याला सतत प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे आहे.

शरीराने स्ट्रॉंग राहण्यासाठी जस आपण नियमित व्यायाम, सकस आहार या गोष्टी अवलंबतो आणि जंक फूड , unhealthy सवयी टाळतो तसेच मनाने स्ट्रॉंग होण्यासाठी देखील आपल्याला काही सवयी अवलंबाव्या लागतील आणि काही unhealthy सवयी सोडाव्या लागतील. पुढे काही टिप्स दिल्या आहेत ज्याने आपण स्वतःला मनाने स्ट्रॉंग बनवू शकतो.

१.’ आत्मविश्वास’ हा मनाने स्ट्रॉंग होण्यासाठी खूप महत्वाचा असतो. पण आत्मविश्वास येण्यासाठी ज्या क्षेत्रात किंवा ज्या गोष्टींमध्ये आत्मविश्वास कमी पडतो तिथेच पुढे जाण्याचा प्रयत्न करणे, यानेच आत्मविश्वास परत येऊ शकतो. आधी आत्मविश्वास मिळवीन आणि मग मी पुढे जाईन असा विचार करत असाल तर, आत्मविश्वास आणि अचिव्हमेंट्स या गोष्टींचा खूप जवळचा संबंध असतो. जिथे आपल्याला आत्मविश्वास नाही त्या ठिकाणीच छोटी-छोटी पावले टाकली असता, आपल्यात त्या गोष्टी करता-करता आत्मविश्वास निर्माण व्हायला सुरुवात होते.

२. ‘कृतज्ञता’ ही शुल्लक वाटली तरी खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला ज्या-ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या, जसे की, निरोगी शरीर, निरोगी मन, चांगले कुटुंब, आवश्यक असा आहार, डोक्यावर छप्पर आणि चांगलं आयुष्य यातलं आपल्याकडे जे-जे असेल त्याबद्दल कृतज्ञता मानणं आणि व्यक्त करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कृतज्ञेतून आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला जाणीव आणि किंमत आहे हे दिसून येते आणि आपल्याही या गोष्टी लक्षात राहून आपल्याला बरे वाटते.

३. वेळोवेळी येणारी आव्हाने ही आपली परीक्षा घेत असतात, आपली change होण्याची, ऍडजस्ट होण्याची तयारी पारखत असतात. त्यामुळे अशा वेळी आपल्या आयुष्यातल्या present आव्हानांवर लक्ष केंद्रित करून त्यांना सामोरं गेले असता आपण हळूहळू नवीन परिस्थितीला adapt होत असतो, म्हणजेच हळूहळू स्ट्रॉंग होत असतो.

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे आणि सोलुशन काढण्याऐवजी परिस्थिती पुढे ढकलत राहणे . जेव्हा तुम्ही त्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करता, आणि त्याला सामोरं जाऊन सॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला तुमच्यात असणाऱ्या शक्तीचा अंदाज येतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढायला देखील मदत होते. अशाच आव्हानांना तोंड देता-देता तुम्हाला तुमची एक नव्याने ओळख होत असते, आणि ही गोष्ट मनाने स्ट्रॉंग व्हायला खूप फायदेशीर ठरते.

४. प्रतिकूलता हा अडथळा न मानता ती एक नवीन गोष्टी शिकायची संधी समजा. आयुष्यात येणारी संकटे ही आपल्याला माणूस म्हणून प्रगती करायला मदत करतात. जेव्हा आपल्याला संघर्षाचा सामना करावा लागतो, आणि आपण सर्वजण करतो, तेव्हा आपल्याला या ज्ञानाने प्रेरणा मिळू शकते की, हा शेवट नसून सखोल ज्ञान आणि समजून घेण्याचा मार्ग आहे.

५. तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता यावर तुमचे पूर्ण नियंत्रण असते. तुमच्यासोबत काय घडते हे महत्त्वाचे आहे–पण तुमच्या प्रतिसादाइतके महत्त्वाचे नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवता तेव्हा तुमच्या जीवनात आणि नेतृत्वात अतुलनीय प्रगती होऊ शकते. त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद द्यायला शिका.

६. स्वत: ला आव्हान द्या. अल्बर्ट आइनस्टाईन एकदा म्हणाले होते, “एखाद्याने सहज साध्य होणारी उद्दिष्टे शोधू नयेत. एखाद्या व्यक्तीने आपल्या मोठ्या प्रयत्नांतून जे अवघड असं साध्य करता येते, त्याची प्रवृत्ती विकसित केली पाहिजे.” स्वत:ला कमी लेखणे आणि सुरक्षितपणे खेळणे तुम्हाला यशापासून दूर ठेवते. काही वेळा जीवनात रिस्क घेऊन स्वतःवर विश्वास ठेवून एखाद असाध्य किंवा अवघड आव्हान स्वीकारणं आणि त्यासाठी आपल्या प्रयत्नांची शर्थ लावणे ही गरजेचे असते.जेव्हा तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही अनेकदा कल्पनेच्या पलीकडे जाऊन साध्य करू शकता.

७. सजग रहा. माइंडफुलनेस म्हणजे तुमच्या फोकसवर नियंत्रण ठेवणे आणि तुम्ही ज्याकडे लक्ष देता त्याबद्दल aware असणे . मग त्या भावना असो, विचार असो किंवा अगदी आजूबाजूचं वातावरण असो त्याकडे लक्ष देणे, aware राहणे महत्वाचे आहे. आपले कोणते विचार आपल्यालाच त्रास देतात, आणि कोणते विचार आपल्यासाठी चांगले आहेत हे आपल्याला त्यातून कळते. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या दृष्टीने आपण सजग असतो, जिज्ञासू आणि निर्विकार, आणि ओपन माईंडेड राहतो. आणि गोष्टी स्वीकरण्याचा दृष्टिकोन ही बदलतो.सर्वात लवचिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी, सजग राहण्यासाठी वेळ द्या जेणेकरून तुम्हाला खरोखर काय हवे आहे यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता.

८. भीतीने पराभूत होऊ नका. लवचिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणे म्हणजे भीतीचा सामना कसा करायचा हे जाणून घेणे. तुमच्यासाठी मनाने स्ट्रॉंग होण्याची ही संधी आहे या जाणीवेने तुम्ही भयावह परिस्थितीत प्रवेश करता तेव्हा, विश्वास हा भीतीपेक्षा जास्त असतो. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या भीतीवर मात करूनच आपली मनाची शक्ती वाढत असते.

९. स्वतःशी जेव्हा बोलता तेव्हा जागरूक रहा. आपण स्वतःशी काय बोलतो, कसे बोलतो हे खूप महत्वाचे असते. इतरांना आपण जसा सपोर्ट आणि सकारात्मकता देतो त्याचप्रमाणे आपण स्वतःला देखील तशीच वागणूक देणे गरजेचे आहे. आपण इतरांशी कसे बोलतो या काळजीत आपण बरेचदा इतके व्यस्त असतो की कधीकधी आपण स्वतःशी कसे बोलतो याचा विचारच करत नाही, इतरांना इतकं महत्व देतो की स्वतःला खूपच गृहीत धरतो. जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवण्यास सक्षम असावे. स्वत: बद्दलच्या शंका सकारात्मकतेने बदला.

१०. ‘करू शकत नाही’, ‘होणार नाही’ , अशा वाक्यांपासून स्वतःला दूर ठेवा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही काही करू शकत नाही, तेव्हा तुमचे लक्ष सकारात्मकतेकडे ठेवा. नकारार्थी शब्दांना /वाक्यांना सकारार्थी वाक्यांनी रिप्लेस करा.

११. विन्स्टन चर्चिल एकदा म्हणाले होते, “उत्साह न गमावता अपयशाकडून यशाकडे चालत राहावे.” चिकाटी तुम्हाला कोणतीही अडचण, कोणतेही आव्हान, कोणत्याही आघाताला पराभूत न होता सामोरे जाण्याची क्षमता देते. कधीही प्रयत्न न केल्याच्या पश्चात्तापाने भरून राहण्यापेक्षा तुम्ही सामोरे गेलेल्या, पचवलेल्या छोट्या-छोट्या अपयशांनी भरलेले आयुष्य जगणे कधीही चांगले. त्यामुळे कधी-कधी यश-अपयशापेक्षा जास्त महत्वाचं आपण प्रयत्न करतोय की नाही याला असतं.

१२. प्रॉब्लेम पेक्षा सोल्युशनवर फोकस करायला शिका. असं कोणतंही क्षेत्र नाही,किंवा कोणाचंही आयुष्य नाही जिथे संकटे, प्रॉब्लेम्स नाहीत. त्यामुळे आपला १०% फोकस प्रॉब्लेम वर ठेवून ९०% फोकस योग्य ते सोल्युशन शोधण्यावर ठेवा.

१३. वादळांसाठी स्वतःला तयार करा. प्रतिकूलता अपरिहार्य आहे. तुम्ही शक्य तितके चांगले तयार व्हा जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी ताकदीने लढू शकाल.

१४. तुम्ही किती दूर जाऊ शकता याबद्दल तुम्हाला शंका वाटत असेल, तेव्हा तुम्ही किती दूर आला आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्या गोष्टींचा सामना केलात, तुम्ही जिंकलेल्या लढाया, तुम्ही ज्या भीतीवर मात केलीत त्याबद्दल स्वतःला श्रेय द्या.

१५. बहुतेक मानसिक सामर्थ्य अपवादात्मक परिस्थितीत नव्हे तर दैनंदिन जीवनात आणि नेतृत्वात तयार केले जाते त्यामुळे रोजच्या घडामोडींमध्ये ही या गोष्टी लक्षात ठेवणं, त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे.

सकारात्मकता, नियमित तयारी, इच्छा, शिस्त, फोकस आणि दीर्घ दृष्टीकोन हे सर्व तुम्हाला नक्कीच चांगली मदत करेल. मानसिक कणखरतेचा सराव करा आणि तुम्ही किती मजबूत झाला आहात हे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “मनाने स्ट्रॉंग व्हा, त्यासाठी या टिप्स फॉलो करा!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!