Skip to content

आपल्या जवळच्या लोकांच्या आनंदाचं कारण बनता येण्यासारखा दुसरा आनंद नाही.

आपल्या जवळच्या लोकांच्या आनंदाचं कारण बनता येण्यासारखा दुसरा आनंद नाही.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


कधी-कधी आपण आपल्या जवळच्या माणसांसोबत भांडतो, त्यांचा हेवा करतो, काही वेळेला अगदी राग-राग ही करतो. पण हे विसरून चालता येणार नाही की आपल्या आनंदाचं कारण देखील आपली जवळची माणसंच असतात. आणि जेव्हा आपल्यामुळे त्यांना आनंद मिळतो त्या भावनेसारखी दुसरी कोणतीच भावना नसते. दुसऱ्यांना आनंद दिल्याने आपल्याला ही आनंद अनुभवता येतो. स्वतःसाठी काही करणे आणि त्यातून आनंद मिळण्यापेक्षा कित्तेक पटीने आनंद हा दुसऱ्याला आनंदी करण्यात असतो. संशोधक सोनजा ल्युबोमिर्स्की यांच्या मते, आनंद लोकांना अधिक freindly , जुळवून घेणारा, mixedup होणारा बनवतो, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो, अधिक समाधान

कारक संबंध निर्माण करतो, उत्पादकता सुधारतो, लोकांचे आयुष्य वाढवतो आणि सामान्यतः लोकांना जीवनात अधिक यशस्वी बनवतो.
दुसऱ्याला आनंद देताना नेहमी पैशाची किंवा काही महाग वस्तूंचीच गरज असते असं देखील नाही. ‘वेळ’ ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. आणि आपला वेळ आपल्या जवळच्या माणसांना देणे, त्यांच्यासोबत काही वेळ घालवणे याने देखील आनंदाची अनुभूती होते. एक चिनी म्हण आहे: “जर तुम्हाला तासभर आनंद हवा असेल तर झोप घ्या. जर तुम्हाला एका दिवसासाठी आनंद हवा असेल तर मासेमारीला जा. जर तुम्हाला एका वर्षासाठी आनंद हवा असेल तर भविष्याचा वारसा घ्या. तुम्हाला आयुष्यभरासाठी आनंद हवा असेल तर कुणालातरी मदत करा. शतकानुशतके, महान विचारवंतांनी एकच गोष्ट सुचवली आहे: इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो.

देणे हा वैयक्तिक वाढीचा आणि चिरस्थायी आनंदाचा एक शक्तिशाली मार्ग आहे या पुराव्याचे समर्थन करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आकर्षक डेटा प्रदान करते. fMRI तंत्रज्ञानाद्वारे, आता आपल्याला माहित आहे की दान केल्याने मेंदूचे तेच भाग सक्रिय होतात जे अन्न आणि लैंगिक संबंधांमुळे उत्तेजित होतात. इतरांना मदत करणे हे केवळ आनंदीच नाही तर निरोगी, श्रीमंत, अधिक उत्पादनक्षम आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचे रहस्य असू शकते.
परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की देणे नेहमीच छान वाटत नाही. कधीकधी सतत देत राहण्याने आपला गैरफायदा घेतला जातोय अशी भा

वना येते. त्यामुळे तोपर्यंतच लोकांना देत रहा जोपर्यंत त्यापासून तुम्हांला आनंद मिळेल. कारण आपल्याला जरी समोरचा माणूस आपला गैरफायदा घेत असल्याचं कळलं नाही तरी आपल्या अंतर्मनाला ते काळात आणि त्यानुसार त्यावेळी आपल्याला आनंद होत नाही. यावरून आपण ठरवू शकतो.

इतरांना आनंदी करणे हे फक्त socializing करणे किंवा स्वतःचा आनंद वाढवण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण आहे. “जेव्हा आपण इतरांना आनंदी बनवण्याचे ध्येय ठेवतो, तेव्हा आपल्याला त्यांच्याशी जोडले गेल्यासारखे वाटते—आपल्या social needs किंवा नातेसंबंधाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या जातात—जी आपल्यासाठी महत्त्वाची असते. आनंद दोन प्रकारचा असतो: घेण्याचा आनंद आणि दिल्याचा आनंद.

मुलाला वस्तू घेण्यास आनंद होतो. तुम्ही मुलांना खेळण्यांच्या दुकानात घेऊन जाता आणि त्यांना संपूर्ण खेळण्यांचे दुकान घरी आणायचे असते. त्यांना सर्वकाही हवे असते. हा लहान मुलांचा आनंद आहे.

मग एक आनंद असतो जो अधिक परिपक्व होतो आणि तो आनंद तुम्हाला दिल्याने मिळतो. तो तुमच्या आजी किंवा आजोबांचा आनंद आहे. जस की, तुमची आजी एकटीच घरी आहे, तर तेव्हा ती 4-5 डिश बनवणार नाही आणि फक्त स्वतःसाठी मोठे, मस्त जेवण करत बसणार नाही. पण जेव्हा तिची नातवंडे भेटायला येतात तेव्हा ती अनेक प्रकारचे पदार्थ बनवते आणि ते वाटण्यात तिला आनंद मिळतो. हा परिपक्व आनंद आहे: दिल्याने मिळणारा आनंद.

आपण पाहतॊ की, जगभरात असे बरेच लोक आहेत ज्यांना नेहमीच देण्यास आनंद होतो. ते का देतात? ते देतात कारण दिल्याने त्यांना अधिक आनंद मिळतो, त्यामुळे त्यांना अतुलनीय समाधान मिळते. यशस्वी व्यक्ती अशी असते, की ज्याने देण्याच्या आनंदाची चव चाखली आहे आणि ते देणे आणि वाटणे ती चालू ठेवते. हे यशाचे लक्षण आहे.

आनंद आणि यश दोन्ही तुमच्या देण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. देण्याची ही क्षमता तुमच्या चेतनेमध्ये आहे. तुम्ही दिलेली वस्तू महत्त्वाची नाही, तर शेअर करण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही लोकांच्या जीवनात योगदान देता तेव्हा त्या बदल्यात तुम्हाला आंतरिक शक्ती मिळते. जेव्हा तुम्ही अशा लोकांसाठी उपलब्ध असता ज्यांना तुमची गरज असते तेव्हा तेव्हा तुमच्या जीवनात शांत, सूक्ष्म स्थिरता येते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आपल्या जवळच्या लोकांच्या आनंदाचं कारण बनता येण्यासारखा दुसरा आनंद नाही.”

  1. प्रथमेश टोळे

    लेख खूप छान आहेत!
    सर्व लेख नेहमी वाचत आहोत !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!