Skip to content

सकारात्मक असू तर नकारात्मक लोकांचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही.

सकारात्मक असू तर नकारात्मक लोकांचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही.


मयुरी महेंद्र महाजन


सर्वांना विचारे परिचयाचे आहेत, कारण प्रत्येक जण विचार करतो, विचारांचे प्रकार पडतात, जसे की सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा मानवी जीवनावरती अनन्यसाधारण प्रभाव असलेला बघायला मिळतो ,विचारांची क्रिया ही मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण जगात जे जे काही निर्माण झालेय त्यापाठीमागे विचारापासून त्याची निर्मिती झालेली बघायला मिळते, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तर आहेचं, तसेच व्यक्ती तितके विचार सुद्धा आहेच ,दोन जुळी असणारी भावंड सुद्धा विचारांच्या बाबतीत एकमेकांपेक्षा भिन्न असतात ,

कुठलीही गोष्ट घ्या, त्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो ,प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, परंतु विचारांच्या याच क्रियेला जर त्या ठिकाणी सकारात्मकचे स्वरूप दिले जात असेल, तर त्याचा नक्कीच फायदा होतो, आणि नकारात्मक असलेले विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही,

बघा जर कधी कुठले काम करण्याच्या आधी आपल्याच मनात त्याच्याबद्दल नकारात्मकता असेल, तर आजूबाजूला असणाऱ्या लोकांपैकी नकारात्मक विचार धारेला जर कोणी खतपाणी दिले, तर ती नकारात्मकता वाढीला लागते, आणि त्याच ठिकाणी जर आपण सकारात्मक असू तर नकारात्मक लोकांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही,

आपण आपल्या विचारधारेला सकारात्मकतेचे खत पाणी घालणे, गरजेचे आहे जर आपल्या विचारांमध्ये सकारात्मक भाव असेल, आपले कष्ट प्रामाणिक आणि तितकेच नावीन्याचा ध्यास घेणारे असतील, तर आपल्या आयुष्यात परिवर्तन हे ठरलेले आहे, आता तुम्हाला प्रश्न असेल सकारात्मक असणे म्हणजे नेमके काय ???तर बघा कुठलीही गोष्ट घ्या, त्याला नेहमीच दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कुठलेही काम हाती घेतल्यावर मनात कितीतरी प्रश्नांचे काहूर उठते ,हे होईल का? कसं जमेल? पूर्ण नाही झालं तर?

आणि असेच कितीतरी हे नकारात्मक पद्धतीने त्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करतो, परंतु मला हे करायचे आहे ,त्यासाठी माझी पूर्ण तयारी आहे, मी पूर्ण प्रयत्न करेल ,त्यासाठी ज्या गोष्टी लागतील ते मी शिकणार, मी पूर्ण प्रामाणिकपणे स्वतःला या कामासाठी झोकून देईल,

बघा या ठिकाणी फक्त शब्दांचा फरक आहे, जेव्हा आपण वरती नकारात्मकतेचे शब्द वाचले तेथे आपला भाव वेगळा आहे ,व जेथे सकारात्मकतेचे शब्द वाचले तेथे आपल्याला एक उत्साह ,एक प्रेरणा आणि आय कॅन डू इट… असं स्वतःला म्हणत एक ऊर्जा जाणवते ,तसे तर शब्द ही खूप मोठी ताकद आहे, त्याचा आपण योग्य प्रकारे, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या पद्धतीने ,जर वापर केलात, तर आपण आयुष्यात कुठलेही काम करताना खूप काही शिकत जाणार….

ज्यावेळेस आपण सकारात्मक राहून कामाला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या कामाला चार चाँद लागतात, आणि ज्या वेळेस मनात किंतु परंतु च्या शंका असतील, त्या वेळेस अपेक्षित असलेला रिझल्ट आपल्यासमोर नसतोच ,आपण दुसऱ्याचे विचार नाही बदलू शकत ,जोपर्यंत ती व्यक्ती स्वतः त्यासाठी तयार नसेल,

आपण सकारात्मक असणार, परंतु आजूबाजूला अशी कितीतरी माणसे आपल्याला भेटतात ते नेहमी नकारार्थी बाजूनेचं त्या गोष्टीचा विचार करतात ,जर आपल्या विचारांचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेल, तर आपल्या आजूबाजूला कितीही नकारात्मक लोकांचा संग असू द्या, त्याचा आपल्यावरती काही परिणाम होत नाही ,

उलट नकारार्थी माणसचं जरं सकारात्मक विचारसरणीचा लोकांमध्ये राहिलेत, तर हळूहळू त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मकतेचे परिणाम दिसू लागतात ,ते फक्त विचारांमुळे नाही तर सकारात्मक विचार करणारी माणसे कशी कामे पूर्णत्वास घेवून जातात ,हे त्यांच्या कृतीच्या माध्यमातून दिसत असल्यामुळे सकारात्मकतेबद्दलचा विश्वास गुढ होत जातो ,आणि मग विचाराने सांगितलेल्या गोष्टी कृतीतून दिसल्यामुळे त्यात पटू लागतात…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “सकारात्मक असू तर नकारात्मक लोकांचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!