Skip to content

बऱ्याचदा वाद घालण्यापेक्षा शांत राहिल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात..

बऱ्याचदा वाद घालण्यापेक्षा शांत राहिल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात..


त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होत आणि त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न करून सर्वांची परवानगी मिळवून लग्न केले…

त्या दोघांचं फारच भारी tuning आहे.. बघणा ती माय लेकीची जोडी.. व्हा हे बाप बेटे तर वाटतच नाही अगदी मित्र आहेत असं वाटते..

प्रेयसी.. मैत्रीण ..मुलगी…भाऊ बहिण.. नवरा बायको.. आई असो नाहीतर अगदी ऑफिस मधील कर्मचारी.. एकमेकांशी असलेलं नात.. एकमेकांची जाणीव त्याच ठिकाणी असते जिथे जे आहे ते मनापासून..

एकमेकांविषयी वाटणारी काळजी.. असलेली ओढ.. त्याला कोणी काहीपण बोललं की येणारा राग.. तर कधी आपल्या व्यक्तीचं कौतुक झाल्यावर होणारा आनंद.. म्हणजेच काय तर आपल्या माणसाच्या दुःखात आपल दुःख आणि त्याच्या सुखात आपला आनंद हा तेव्हाच असतो जेव्हा त्या नात्यात बळजबरी नसते..

सांगायचं काय तर अगदी सोप आहे.. हल्ली आपण अनेक भांडण बघतो.. मग ते आपल्या घरात असो नाहीतर आपल्या लाडक्या मालिकेमध्ये 😅 .. घरात सगळं व्यवस्थित असते.. म्हणजे काय तर एक छान कुटुंब.. घरात आई वडील.. मुलगा आणि सून.. सगळ्यांचे जॉब.. सगळ्यांची काम अगदी पद्धतशीर सुरू असतात.. पण भांडण होण्याचं कारण काय तर सासू म्हणते मुलगा सूनेच ऐकतो तर सून म्हणते नवरा आईच ऐकतो.. आता यात परवड मात्र त्या मुलाची होते ज्याला धड नवरा म्हणून सुद्धा जगता येत नाही ना मुलगा म्हणून चांगलं वावरता येत नाही…

खरं तर हे अगदी साधं उदाहरण झालं.. विनोदाचा भाग बाजूला ठेवून जेव्हा आपण गांभीर्याने याचा विचार करू तेव्हा कळेल की खरच आपण किती आणि कुठे चुकतो..

आपण कोण आहोत… आपली ओळख काय.. आपण काय केलं पाहिजे.. आपण आज कुठे उभे आहोत.. आपली कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या यांची ओळख.. आपल कोण आहे.. आपण कोणासाठी काय केलं पाहिजे.. आपण कुठे चुकतो तर आपण कुठे कस वागल पाहिजे.. याची सगळी उत्तर आपण आपली ठरवू शकतो.. नक्कीच आपण आपल आयुष्य कस जगायचं हे आपणच ठरवू शकतो..

दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललय.. त्याने काय केलं पाहिजे.. त्याचे कर्तव्य त्याच्या जबाबदाऱ्या ..त्याच प्राधान्य.. त्याच्या आवडी निवडी हे सगळं काही त्याच तोच ठरवणार.. पण आपण मात्र इकडेच चुकतो आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आपण लुडबुड करण्याचा प्रयत्न करतो..

दुसऱ्याच्या आयुष्यात आपलं महत्त्व काय हे आपण शोधत बसतो…पण मुळातच आपल्या लक्षात येत नाही की त्याच्या आयुष्यात त्याने कोणाला महत्त्व द्यावं हे सर्वस्वी तोच ठरवणार..

आपण काय करतो तर दुसऱ्याच्या आयुष्यात आपल महत्त्व जबरदस्तीने वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि इथेच आपण कमी पडतो.. कारण जबरदस्ती करून कोणतीच गोष्ट टिकत नाही आणि आपण तर इथे नात्याविषयी बोलतोय..

जेव्हा बायको म्हणते तुम्ही आईला महत्त्व देता आणि आई म्हणते तू बायकोला महत्व देतोस तेव्हा त्याचा अर्थ हा अगदी स्पष्ट आहे की जो तक्रार करतोय त्याला स्वतःला दुसऱ्याच्या आयुष्यात महत्त्व मिळत नाही.. यापेक्षा जर तक्रार न करता तिथेच सोडून दिलं तर गोष्टी सोप्या होतील..

कारण अस बळजबरी आपल समोरचा ऐकेल सुद्धा.. आपल्याला महत्त्व देईल सुद्धा पण ते त्याच्या मनाविरुद्ध असल्याने जास्तवेळ टिकणार नाही..

म्हणून आपण आपल एक वेगळं व्यक्तिमत्त्व तयार करायचं की ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल महत्व आपोआप वाढेल..

भांडून.. वाद घालून.. मनाला वाटेल ते बोलून.. समोरच्या व्यक्तीला दुखावून आपण आपलच त्याच्या आयुष्यातील महत्व कमी करत असतो..

काहीवेळेस आपल्याला वाटते की ही व्यक्ती चुकतेय पण अशावेळी आपण समजवण्याचा प्रयत्न करायचा पण नाही ऐकलं तर जबरदस्ती न करता दुर्लक्ष करून तिथून बाजूला व्हायचं ..

बऱ्याचदा वाद घालण्यापेक्षा शांत राहिल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात.. म्हणून जिथे परिस्थिती हातात नाही असं वाटते तिथे शांत राहण्याचा मार्ग उत्तम.. कारण उगाच बोलून आपण आपल महत्त्व कमी करतो..

जेव्हा आपल्याला माहीत आहे की आता काही बोलून उपयोग नाही तेव्हा जे आहे त्याचा स्वीकार करायचा.. त्यामुळे आपल्याला स्वतःला आणि आपल्यामुळे कोणालाच त्रास होणार नाही.

कोणतही नात हे जेव्हा मनापासून असेल तेव्हा तिथे एकमेकांना महत्त्व असतेच.. एकमेकांच्या विचारांना महत्व असते.. पण जिथे आपल्याला महत्त्व नसते तिथे मात्र आपण स्वतःच महत्त्व जबरदस्ती वाढवण्याच्या नादात असलेलं महत्व सुद्धा कमी करतो..

म्हणून जे आहे जसं आहे त्याचा स्वीकार करण्यात शहाणपण आहे पण जबरस्तीने स्वतःच महत्व दुसऱ्याच्या आयुष्यात वाढावं म्हणून त्याला आग्रह करणे किंवा बळजबरी करणे म्हणजे स्वतः स्वतःच महत्व कमी करण्यासारखं आहे.

लेखिका – मिनल वरपे


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!