बाहेरून लोकं त्रास देत आहेत यापेक्षा माझीच विचारसरणी चुकीची आणि संकुचित आहे का, यापासून सुरुवात करा.
अपर्णा कुलकर्णी
नताशा ऑफिसमधून तणतणतच घरी आली. तिचा चेहरा बघूनच तिच्या आईचा बीपी हाय होण्याची वेळ आली होती. आजकाल नताशाची चिडचिड खूपच वाढली होती आणि रागाने धुमसत रहाणे हा तिचा स्वभावच होऊन गेला होता. आता आज काय झाले आहे काय माहीत होईल थोड्या वेळात नॉर्मल म्हणत, नलिनीताई किचनमध्ये गेल्या आणि तिच्यासाठी गरमागरम आल्याचा चहा बनवला. तेवढ्यात नील घरी आला आणि भूक लागली आहे खायला दे पटकन आजी म्हणत सोफ्यावर खेळू लागला.
तेवढ्यात नताशा फ्रेश होऊन आली आणि नीलकडे पाहून जास्तच फ्रेश झाली तसेच चहा घेत नीलला भरवू लागली. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत नताशा काम करत बसली होती. नलिनीताई तिच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, अग किती काम करतेस नताशा. नीट आराम करत नाहीस, खात पित नाहीस त्यामुळे तुझी चिडचिड होते, इतका व्याप का वाढवून ठेवला आहेस बाळा ??? तुला माहित आहे ना आई ?? माझ्या डोक्यात कामाचा व्याप नसला तर डोक्यात सतत प्रभासच्या कटू आठवणी डोकावतात. त्यामुळेच तर मी सतत काम करत असते आणि बेडवर पडले तरी झोप लागतच नाही उलट सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून जात रहातो. मध्यंतरी खूप गोळ्या घेतल्या मी झोपेच्या पण त्याने ही काहीच फायदा झाला नाही म्हणूनच तर कामात असते सतत आणि तसेच राहू दे मला प्लीज.
नलिनीताई काहीच न बोलता झोपायला निघून गेल्या होत्या कारण जेंव्हा जेंव्हा त्या काही समजवायला जात तेंव्हा तेंव्हा नताशाची हीच उत्तरे त्यांना ऐकावी लागली होती. पण त्या आई होत्या तिच्या. तिचे बाबा गेल्यापासून आई आणि बाबाची दोन्ही कर्तव्ये नलिनीताईनी पार पाडली होती. नताशचे सगळे हट्ट, शिक्षण, गरजा सगळे काही पूर्ण केले होते. नताशा सुरुवातीपासून खूप गुणी आणि हुशार होती. पण आयुष्यात एक चूक तिच्याकडून झाली होती त्याची फळे ती आजवर भोगत होती.
प्रभासच्या प्रेमात पडून त्याच्या सोबत लग्न करण्याची चूक तिने केली होती. प्रभास खूपच जुन्या विचारांचा आणि आतल्या गाठीचा मुलगा होता. शिवाय संशयी आणि बायकोला खेळण्याप्रमाणे वागविणारा. त्यात त्याच्या घरचे सगळेच लोक त्याच्याच सारखे आडमुठे आणि नावाला सुशिक्षित होते. नील हे नताशाला पडलेले सुंदर स्वप्नच म्हणावे लागेल. तो नताशा सारखा खूप अंबिशिअस आणि हुशार होता. पण माझ्या चुकीमुळे नीलला बाबा असूनही एकट्या आईचेच प्रेम मिळते आहे असा गिल्ट नताशाच्या मनात कायम होताच. त्यात ओळखीचे चार लोक आणि नातेवाईक मिळून जो काही समाज होता तो येता जाता नताशाला टोमणे मारत होते. त्यामुळे तिची चिडचिड जास्तच वाढली होती.
सगळे काही बिनसले होते त्यामुळे. हसरी खेळती नताशा सगळ्या जगाचा भार स्वतःवर घेऊन हसणंच विसरली होती. लोकांच्या बोलण्याचा खूप त्रास करून घेत होती. पण या सगळ्यांचा परिणाम तिच्या व्यवसायावर होत आहे हे तिच्या लक्षात येत नव्हते. कामात चोख असलेली नताशा इतरांकडून ही तशीच अपेक्षा करत होती. कामात शिस्तबध्दपना हवाच पण त्या नादात आपण आपल्या कलिग सोबत खूप वरच्या आणि रफ भाषेत बोलून त्यांची मने दुखावत आहोत आणि समाजाला स्वतः वर बोट दाखवायला संधी निर्माण करून देत आहोत हेच नताशाला समजत नव्हते. त्यात प्रभासने ऑफिसमध्ये येऊन हिचा स्वभावच विचित्र आणि माणूसघाना आहे हे सांगितले होते आणि तेच सिद्ध करत होती नताशा.
त्यामुळे तिच्या बद्दल स्टाफमधे कुजबुज सुरू झाली होती आणि त्याचाही मनस्ताप होत होता तिला. त्यामुळे नताशा डोक्याला हात लावून बसली होती. आईने तिच्या जवळ बसून डोक्यावरून हात फिरवत विचारले, नताशाचे डोळे पाणावले. तिची आईच अशी एक व्यक्ती होती या जगात जिच्यावर विश्वास ठेवून नताशा सगळे काही बोलू शकत होती. आई, माझ्या हातातून सगळे काही सुटत चालले आहे. नीलचा स्वभाव बऱ्याच प्रमाणात प्रभास सारखा आहे कधी कधी भीती वाटते आई, मोठा झाल्यावर तो ही प्रभास सारखा झाला तर ?? मी व्यवसाय दिवस रात्र मेहनत करून वाढवला आहे आणि आज माझाच स्टाफ माझ्यामागे माझ्याबद्दल कुजबुज करत आहे. सगळच बिघडल आहे आई काय करू मी ??
त्यावर नलिनीताई म्हणाल्या, प्रभास आणि त्याची पूर्ण फॅमिली स्वतः चुकीचे वागून तुला दोष देऊन, ऑफिसमध्ये येऊन आरोप करून गेली. ते चुकीचेच होते पण तुझ्या चिडचिड स्वभावामुळे कामाच्या अतिरिक्त ताणमुळे, कामातील शिस्तबध्दपना यामुळे तुझा आवाजाचा स्वर उंचावतो, कोरडेपणा जाणवतो आणि तुझा मुद्दा बरोबर असूनही लोकं तुझ्याबद्दल चुकीचा ग्रह करतात. अशा वेळी बाहेरून लोकं त्रास देत आहेत यापेक्षा आपलीच विचारसरणी चुकीची आणि संकुचित आहे का यापासून सुरुवात कर. तुझे मुद्दे नीट आणि मोजक्या पण नम्रतेचा स्वरात समजावून सांग. कधी कधी आपण फक्त बरोबर असून चालत नाही तर वागणे बोलणे पण नीट आणि योग्य असायला हवे. म्हणजे त्रास कमी होतो आपल्यालाही आणि इतरांनाही.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Jardast