Skip to content

तुमची बघण्याची नजर उत्तम असेल तर इतरांना पार दुखावलेले प्रसंग सहसा तुम्हाला त्रास देत नाहीत.

तुमची बघण्याची नजर उत्तम असेल तर इतरांना पार दुखावलेले प्रसंग सहसा तुम्हाला त्रास देत नाहीत.


हर्षदा पिंपळे


पाहता भयाण रूप ते
अंगावरी शहारा शहारतो…
कसं सांगायच काळजाचा
एक एक कोपरा थरथरतो…

मित्रांनो आयुष्य म्हणजे कधी सुंदर वळणावळणाचा घाट तर कधी चिखलवाट आहे. जन्मासारखी हवीहवीशी गोष्ट आपल्या आयुष्यात घडते तशीच नकोनकोशी वाटणारी मृत्युसारखी गोष्टही आपल्या आयुष्यात घडते.आयुष्यात असेच कित्येक प्रसंग येतात ज्यामुळे आपण अगदी थक्क होऊन जातो.सुन्न होऊन जातो.त्या वेळेस आपल्याला काय करायच ते कळत नाही. किंवा आपली तशी मनःस्थितीही नसते.

मग ते प्रसंग आपल्या स्वतःच्या आयुष्यातील असो वा दुसऱ्याच्या आयुष्यातील असो.होणारा त्रास होतोच.इतरांच ते अमाप दुःख आपल्याला बघवत नाही. सहनही होत नाही. तीच गोष्ट वारंवार आपल्याला दिसत राहते.कोणतीही गोष्ट करताना तोच प्रसंग आठवत राहतो.आपण त्या त्या प्रसंगाकडे शक्यतो एका चिंताग्रस्त नजरेने पाहतो.’आता काय होईल…? कसं होईल..? असच का झालं…तसच का झालं…?

अशा प्रकारचे प्रश्न मनात घोळू लागतात. मन त्याच त्याच चिंतेने ग्रासून जातं.तनामनाला अक्षरशः त्यावेळी त्रासच होतो.विचार करून करून मानसिक संतुलन बिघडत जातं.आणि नंतर त्याचाच परिणाम म्हणून शारीरिक आरोग्यही कमकुवत होत जातं.

पण असं म्हणतात कुठलीही गोष्ट ही आपल्यावर अवलंबून असते.म्हणजे समोर असलेली संकटं ही कशी हाताळायची हे आपल्या स्वतःवर अवलंबून असतं.आपण किती काळ विचार करत बसायच हे आपल्याच हातात असतं.आपण सतत त्याच नजरेतून पाहत राहिलो तर आपल्याला त्रासच होत राहणार. ज्या वेळी आपण आपल्या विचारांना पूर्णविराम देऊ तेव्हा खरं तर तो त्रास थांबू शकतो.त्या त्रासापासून आपण दूर जाऊ शकतो. अन्यथा नाही.आपण ,आपल्या कोणत्या नजरेने पाहतो यावर सगळं काही ठरत असतं.

आता प्रत्येकाची नजर ही सारखी नसते.भिन्न व्यक्ती तशा त्यांच्या नजराही भिन्नच असतात. जशी दृष्टी तशी सृष्टी ही उक्ती सर्वांनाच माहीत असेल.तर ह्या उक्तीनुसार सांगायच झालं तर खरच आपल्या नजरेवर सगळं काही शक्य आहे. आपल्या आयुष्याच मूल्य ही नजरच ठरवते.आपण कोणत्या नजरेतून येणाऱ्या प्रसंगाकडे पाहतोय त्यावरून आपल्या जगण्याच्या आशा कमी-जास्त होत राहतात.

सकारात्मक आणि नकारात्मक कशा दोन्ही नजरेतून आपण आयुष्याकडे सहसा पाहत असतो.तर अनेकदा जेव्हा दुःखी , वाईट प्रसंग घडले की आपण नकारात्मक नजरेनेच बघत असतो.नकारात्मक नजरेने बघितल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा अधिकाधिक त्रास जाणवतो.हीच जर नजर सकारात्मक असेल तर निश्चितच आपल्याला तो त्रास जाणवत नाही. किंवा तो कमी जाणवतो.सकारात्मक नजरेने पहायच ठरवलं तर गोष्टी वेगळ्या दिसतात. त्या त्या गोष्टीवर एखादं सोल्युशन कसं काढायच याची अनेक उत्तरं मिळतात.आपण उत्तरांच्या शोधात निघतो.पण जर तेच मन चिंतातुर नी नकारात्मक असेल तर आपण नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतो.त्या घडलेल्या प्रसंगावर सतत निगेटीव्ह काहीतरी बोलत राहतो.निगेटीव्ह विचार करत राहतो.आणि स्वतःला त्रास करून घेतो.

म्हणून त्यासाठीच कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची नजर ही उत्तम असायला हवी.जेणेकरून ते प्रसंग कोणत्याही त्रासाची जाणीव करून देणार नाहीत.

त्यामुळे दृष्टी बदलायला शिका.नजरेला थोडं बदलून पहा.गोष्टींकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा.तीच नजर उरलेलं जीवन जगण्यासाठी उत्तम दिशा ठरू शकते यात शंका नाही.

So..कुठल्याही परिस्थितीत दृष्टीवर निगेटीव्हीटीचे दव साचून देऊ नका.आहे ते स्वीकारून पुढे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिचा अवलंब नक्की करून पहा.पहा किती फरक जाणवतोय तो जगण्यात.कित्येक लोकं अशी असतात की जी जगण्याकडे एका चांगल्या नजरेने बघतात.घडलेल्या प्रसंगाकडे, येणाऱ्या कठीण प्रसंगाकडे ते सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात.

सगळं चांगलच होईल असा उद्देश ठेवून पुढचं आयुष्य जगत राहतात.मग आपण का करू शकत नाही असं…? निश्चितच आपणही आपली नजर उत्तम ठेऊ शकतो.एखादा माणूस गेला म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा तो त्या त्रासातून मुक्त झाला असा विचार करून पहा.दुखानंतर सुख येणार असतं असा विचार करा..आयुष्य नक्कीच सुंदर असेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!