Skip to content

शांती हवी असेल तर लोकांचे बोलणे मनाला लावणे सोडून द्या…

शांती हवी असेल तर लोकांचे बोलणे मनाला लावणे सोडून द्या…


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


साक्षी चा स्वभाव आधीपासून जरा हळवा, sensitive होता. कोणी जर काही बोलल की लगेच तिच्या मनाला लागत असे. लगेच ती वाईट वाटून घेत असे. तिच्या डोळ्यात पाणी येतं असे. तिला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी चा फरक पडत असे. शाळेत असताना कोणता कार्यक्रम असेल, ती ड्रेसअप करून गेली असेल आणि कोणी काही टिंगल-टवाळी केली तर बाईसाहेब गेल्या तिथून निघून. मोठे झाल्यावर कामाला सुरू केल्यावर तिथे कोणी काही बोललं खाली खेचण्याचा प्रयत्न केला की तिच्यावर त्या गोष्टीचा परिणाम होई.

माझीच चूक झाली, आपण कुठेतरी चुकतोय, मला काही जमणार नाही, सगळी मला नाव ठेवतात अस विचार चक्र तिच्या डोक्यात एकदा सुरू झालं की त्यातून बाहेर पडण मुश्किल होई. ज्यातून तिची मानसिक शांतता निघून जात होती. कामावर परिणाम, स्वतःवर परिणाम. कुणी कितीही सांगितलं तरी हा लोकांचं बोलणं मनाला लावुन घ्यायचा स्वभाव काही कमी होत नसे. साक्षीप्रमाणे

अनेकांना लोकांचे बोलणे मनाला लावून घ्यायची सवय असते. त्यांना सतत दुसऱ्यांचा aprroval हवा असतो. आपलं काम लोकांना आवडाव, आपण लोकांना आवडाव, आपण इतरांबद्दल चांगला विचार करतो त्यांनी ही करावा अस वाटत. अशी लोक अति संवेदनशील मनाची असतात. अस दर वेळी होईलच अस नाही ना! लोकांचे बोलणे तर मनाला लावून घेऊन आपल्याला काही फायदा होत नाही. यातून इतरांनाच जास्त फायदा होतो. कारण असं म्हणतात की जो जास्त चिडतो त्यालाच जास्त चिडवलं जात. बऱ्याच लोकांचं बोलणं मनावर घेतलं नाही आपण डिस्टर्ब होतो, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागतो.

कामाच्या ठिकाणी बर्‍याचदा असं होतं की काही लोक असतात ज्यांना दुसऱ्यांवर टीका करण्यात, त्यांना खाली खेचण्यात आनंद मिळत असतो. त्यामुळे त्यांचा काही ना काही कमेंट पास करणं हे चालूच असत. अगदी आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये ही आपल्याला हे दिसून येत. जरा काही चूक झाली किंवा काही चांगल जरी केली तरी लोक बोलायला असतातच.

पण हे सर्व मनाला लावून घेतल्याने आपण स्वतःला त्रास करून घेतो. याच्या पुढच्या कामावरही परिणाम होतो आपल्याला जमेल का नाही आपण चुकलो तर आपल्याला एक काम नीट करता आलं नाही तर असं वाटू लागतं. हे विचार एक सारखे डोक्यात घोळत राहतात, यात माणूस कुढत राहतो. पण या सगळ्यातून चांगलं काही निष्पन्न होत नाही.

म्हणून यावर उपाय म्हणजे अशा बोलण्याकडे लक्ष न देणे. आपल्याकडे बरेचदा अस म्हटलं जातं की एका कानाने ऐका व दुसऱ्या ने सोडून द्या. कारण हेच बऱ्याचदा योग्य ठरतं. प्रत्येक गोष्ट प्रत्येक बोलण आपण मनाला लावून घेऊन आपण स्वतःची प्रगती थांबवतो. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की लोक आपण चांगलं केलं तरी बोलतात आणि वाईट केलं तरीही बोलतात. त्यांनी आपल्याशी कसं बोलावं हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे.

आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. परंतु त्याच्या बोलण्यावर आपण कसं वागावं कसं react करावं हे आपल्या हातात आहे. इथे हा विचार केला पाहिजे हे माझ्यासाठी अजून कोणी असतं तर त्याने काय केलं असतं? प्रत्येकजण ही गोष्टी मनाला लावून घेईल का? नाही. म्हणून तर या छान गोष्टी let go करणे चांगले ठरते. यातून आपले स्वास्थ्य च गले राहते.

अनेकदा अापण दुसऱ्याचं बोलण मनाला लावून घेतो तेव्हा असही होऊ शकत की ती व्यक्ती आपल्या चांगल्यासाठी पण सांगत असेल, गमतीनेही बोलत असेल. प्रत्येक वेळी लोक आपल्यासाठी वाईट विचार करतात असं नाही. कदाचित त्यांच्या बोलण्याची पद्धत जरा कठोर असू शकते. म्हणून हा विचार पण केला पाहिजे.

दुसऱ्यांच बोलण मनाला लावून घेऊन आपण आपल आयुष्य थांबवू शकत नाही. ते कसे जगावे? कुढत का प्रगती करत हे आपल्यावर आहे. म्हणून स्वतःला, स्वतःच्या मनाला strong करता आले पाहिजे. तर आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. कारण,

कुछ तो लोग कहेंगे
लोगो का काम है कहना
छोडो बेकार की बातों मै
कही बीत न जाए रैना…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

9 thoughts on “शांती हवी असेल तर लोकांचे बोलणे मनाला लावणे सोडून द्या…”

  1. Tejaswini Shinde

    खूप कमी वेळेत छान सांगीतले आहे,ही गोष्ट तर माझ्याबाबतीत अनेकदा घडली आहे,पण आता मी सहजासहजी सर्वांचे बोलणे मनाला लावून घेत नाही.

  2. वास्तववादी चांगला लेख धन्यवाद !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!