Skip to content

आयुष्याला स्वाहा करणारा आत्महत्येचा निर्णय चुकत तर नाही ना??

आयुष्याला स्वाहा करणारा आत्महत्येचा निर्णय चुकत तर नाही ना??


संयोगिता महाजन


“आत्महत्या” शब्द तसा ऐकल्यावर अंगावर काटे येतात… आज धावपळीच्या जीवनात एकदातरी मनात हा विचार येऊन जातो. आत्महत्या कोणी जवळच्या व्यक्तीने अथवा सिलिब्रिटीने केली तर हळहळ व्यक्त केली जाते….नंतर हळूच कोणीतरी बोलते….काय कमी होतं असं करायला????नाही ती फालतूगिरी….????असलं काय टेन्शन होतं???जगात यापेक्षाही मोठी संकटे आहेत,नको ते बरं सुचतअसे एक ना अनेक तर्क वितर्क लढवले जातात.पण खरंच जो करतो त्याच्या मानसिकतेचा आपण किती विचार करतो…???

आज शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत या समस्येने ग्रस्त आहेत.या समस्येत मानसिक विकृती,सतत निगेटिव्ह विचार,सतत मरणाच्या धमक्या देऊन पिळवणूक करणाऱ्या, समाजातील प्रत्येक घटकांकडे पाहण्याचा निगेटिव्ह दृष्टिकोन यात समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींचा वेगळा विचार करावा अन कौटुंबिक हिंसाचार, कौटुंबिक एकाकीपण, सामाजिक मूल्य आणि त्या व्यक्तीला अभिप्रेत असलेली मूल्ये यातील संघर्ष,या सर्वांतुन आलेला मानसिक थकवा या गोष्टींचा विचार वेगळा व्हावा.

सुखवस्तू कुटुंबातील मुलगा डॉक्टर होत असताना आत्महत्या करतो, एखादी उच्चभ्रू कुटुंबातील स्त्री आत्महत्येचा मार्ग स्वीकारते…सर्वांशी मिळून मिसळून असणारी,सर्वांचे हवंनको पाहणारी, सतत हसतमुख असणारी नेहा स्वतःच जीवन संपवते.आशा अनेक नेहा आपल्याला आजूबाजूला दिसतील….सर्वांसाठी आपलं जीवन वेचणारी शीतल आमटे अचानक एक्झिट घेते…का बरं??????

या लोकांना जगण्यापेक्षा मरण बरं वाटावं इतकं जग गढूळ करून ठेवलं का आपण??????

इथं राहण्यापेक्षा, ही रोजची घुसमट सहन करण्यापेक्षा सुटलेलं बर अस का बरं वाटावं ????ती कौटुंबिक ,सामाजिक, मानसिक सुरक्षितता आपण द्यायला कमी पडतो का??निश्चितच कमी पडत असू जगण्याचा विश्वास, ती नवी उमेद, ते चार प्रेमाचे,आपुलकीचे क्षण द्यायला कमी पडतो..अस मला एक शिक्षक, समुपदेशक म्हणून काम करताना नक्की जाणवतं. अगदी ग्राउंड लेव्हलला काम करताना बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात ,जी कोणत्याही पुस्तकात मिळत नाहीत.

1.भावनिक समायोजन- या समस्येत भावनिक सक्षमीकरणाचा अभाव जाणवतो.व्यक्तीला नकार पचवण्याची ताकद कमी राहिली आहे.आज लहान मुले, किशोरवयीन मुले यांना ताबडतोब हवं असतं आणि ते एकच्या ठिकाणी चार मिळतं.. त्याची सवय होते मग कोणत्याही बाबतीत नकार नकोच अशी मानसिकता तयार होते

2.सहनशीलता- यात तर एक कमी नाहीतर तिचा अंत हे दोनच प्रकार होतात.सहनशीलता कमी असते तेव्हा रागाच्या भरात टोकाचं पाऊल,अन जास्त असली तर मनात घुसमट होऊन स्वतःचा कडेलोट..

3.मानसिक ताणतणावचिंता,नात्यातील एकटेपणा,आजार,नाती,आर्थिक कारणांमुळे समस्या अडचणी अन त्यावेळी आपलं अस कोणी पाठीशी खंबीरपणे उभे नसेन यामुळे या टोकाच्या निर्णायक विचारावर व्यक्ती येऊन उभा राहते.

4.सतत “सुसाईड आयडीएशन”डोक्यात येणं
5. समोर प्राप्त परिस्थिती बदलू शकत नाही अन यातून आपली सुटका नाही अशावेळी माणूस हतबल होतो.
मग एक कुटुंब, समाज अन मुळात एक व्यक्ती म्हणून आपलं योगदान काय??????

1.परिस्थिती लक्षात घेऊन शांतपणे समोरच्याचे ऐकून घेणं
2.दिखाव्यासाठी ऋण काढून सण साजरे न करताना .पुढील परिणाम लक्षात घ्यावेत.

3.आर्थिक नियोजन करणे.काटकसर असावी पण उधळपट्टी नको
4.जेव्हा केव्हा या परिस्थितीच्या चक्रव्यूहात आपण अडकू तेव्हा open up होणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी ढीगभर लोकांच्या ओळखी उपयोगी पडत नाहीत तर जिवाभावाची उपयोगी पडतात. त्यांच्यासमोर बोला,व्यक्त व्हा.

5.खोट्या प्रतिष्ठेत स्वतःला गुंतवू नका.माणूस म्हणून साधं हसरे,मनाला आनंद देतील त्या गोष्टीत जगायला शिका.अनेकांना जगण्याचा मार्ग सहज सोपे करणारे युथ आयकॉन भय्यु महाराज आपली प्रतिष्ठा मातीमोल होईल म्हणून आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात.लोकं दोन्ही तोंडानी बोलतात…तुम्हाला मरणाच्या दाढेत घेऊन जाण्याइतपत त्याचा नका विचार करू…!

6.वैयक्तिक मूल्ये अन सामाजीक मूल्ये यात सतत क्लॅशेस होत असेल तर अन तुम्हाला मोल्ड होता येत नसेल तर तुमच्या विचारांच्या गटात सामील व्हा.असे बरेचसे उदारमतवादी असणाऱ्यांना फेस करावे लागते.

7.महिलांनी स्वतः आत्मनिर्भर व्हा.त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. जीवन जगण्यासाठी अजून भरपूर कारण आहेत हे लक्षात येईल.कुढत बसू नका.परिस्थितीतीला दोन हात करा.

8.मानसोपचार हा शेवटचा टप्पा पण त्याआधी हेल्पलाईन, स्वतःच्या जवळच्या व्यक्ती यांच्याशी बोला.
9.ध्यान, सकारात्मक विचार, आनंदी व्यक्ती यांचा संपर्क वाढवा.निगेटिव्ह विचार,सतत कुढत बसणारी,टोमणे मराणारी,माणसं यांपासून शक्य असेल तेवढे चार हात लांब रहायला शिका.

आयुष्य खूप छोटं आहे.ते मिळायला ही भाग्य लागते.जीचा नवरा नवजात मुलांचं तोंड न पाहताच शहीद झालाय,जीचा कमवता मुलगा अकसिडेंटमध्ये गेला त्या आईला,युद्धाच्या पट्टीतील प्रत्येक नागरिकाला विचारा जगण्याची किंमत काय असते.. म्हणून तो एक दीड मिंनटचा विचार रोखा.. लाईव्ह येऊन “आत्महत्या” करणं …हा इव्हेंट करण्यासारखा विषय आहे का????काय साध्य होतं… आणि ते पाहायला, मत मांडायला तुम्ही असाल का????नाही ना…!म्हणूनच जीवन जगायला नव्याने सुरुवात करा.

“जीवन खूप सुंदर आहे
अनुभव तुला सांगत जाईल
प्रयत्न करायला विसरू नको
मार्ग तुला सापडत जाईल..”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आयुष्याला स्वाहा करणारा आत्महत्येचा निर्णय चुकत तर नाही ना??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!