Skip to content

सतत डोकेदुखीच्या गोळ्या घेऊ नका ,तुमची सध्याची मानसिकता नीट तपासा.

सतत डोकेदुखीच्या गोळ्या घेऊ नका ,तुमची सध्याची मानसिकता नीट तपासा.


संयोगिता महाजन


सावी तशी खूप हसरी ,मस्ती करणारी,जिथं जाईल तिथं आनंदाची बाग फुलवणारी..सगळे तिला बटरफ्लाय म्हणून चिडवत.तिला ही ते मनापासून आवडायचं.सतत सांगायची आपल्यात एक लहान मूल दडलेलं असतं त्याला बाहेर हुंदडू द्यावं मनोसोक्त नाचू,बागडू द्यावं म्हणजे आपण चिरतरुण राहतो.

आज हीच सावी विपश्यना केंद्रात स्वतःच अस्तित्वाच्या शोधात हरवली होती.जो तो तिच्याविषयी वेगळ्याच नजरेनं शेजारीपाजारी, पाहुण्यांरावळ्यात कुजबुज करत होता की सावीला वेड लागलय…म्हणून ती कुठल्यातरी केंद्रात ठेवलंय..इतकी मोठी शोकांतिका एका शिकलेल्या कुटुंबातील .????ऐकून धस्स झालं.

नोकरी करणारी घरदार छानपैकी संभाळुन पै पाहुणे जपणारी सावी कधी स्वतः च आतून खचत गेली,मनातून तुटली ,स्वतः ची आवडनिवड खुणावत असताना बाजूला ठेवत, कोणी काही म्हणाले तर????? करत एकाकी पडली,नैराश्याने ग्रासून मानसिक तणावाखाली गेली. सगळ्यांना हवं नको बघत ,स्वतः नकळत डोकं दुखतंय, आतून राग राग होतोय,धडधड होतयं म्हणत नकळत डोकेदुखीच्या गोळ्या तर कधी पेनकिलरच्या विविध गोळ्यांची ती बळी पडली हे तिलाच जाणवलं नाही.

आज अशा कित्येक सावी समाजात आहेत.सगळ्यांना सगळं वेळच्यावेळी मिळावं म्हणून धडपड करतात अन नकळतपणे स्वतः च दुखणं वाढवून घेतात.घरच्यांच्या ढीगभर अपेक्षांचे ओझे वाहत स्वतःच्या मनाला स्वाहा करतात.कामामुळे डोकं दुखत असेल,जागरणमुळे असेल..पित्त झालं असेल म्हणून ….अरे ..!!पण तुमच्या मानसिकतेचा थेट परिणाम त्याच्याशी जोडला आहे हे सुशिक्षित मणसांना ही कळू नये.????

सायकालॉजिस्टकडे जाण म्हणजे वेड लागलं आहे ही व्याख्या कधी पुसली जाणार????
हल्लीच्या सर्वत्र डोकं दुखणं कॉमन गोष्ट झालीय.पण ती तीची गरज किती अनकॉमन आहे हे कधी लक्षात येणार???

वरवर सुरेख, हसरी दिसणारी फेसबुक, इन्स्टावरील फॅमिली ,व्यक्ती रिअल मध्ये किती वेगळी असते हा संशोधनाचा विषय झालीय.एक धारण केलेला मुखवटा चिरचिर फाडला तर त्यात दिसेल सत्य एकटेपणाचे,दुःखऱ्या जखमांचे,सततच्या डोकेदुखीचे,असहाय्य वेदना,अन भावनाशून्य जगात आपण फक्त एकटेच अशा सरमिसळ इमोशनल केमिकल लोच्याचे….! प्रत्येकाच्या अपेक्षा, सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या…..अहंकार, स्वाभिमानाच्या भाषा आता सहज जिभेवर येतात त्याला ना वयाची बंधने ना नात्याची..सारंच आलबेल..मग डोकेदुखी थांबणार कशी????

गरजा भागविण्यासाठी पळापळ, ईर्षा, रस्सीखेच,सतत जागरणे, कामाचे प्रेशर,वेळेचे मॅनेजमेंट,आय टी सेकटरचे हाल त्याहूनही वेगळे.नाईट शिफ्ट ,त्यात वेळेची जुळवाजुळव त्यातून नकळतपणे लागलेली व्यसने अन हळूवारपणे दबकत दबकत चोरपावलांनी शिरलेला तो डिप्रेशन नावाचा भस्मासुर….!वेळीच ओळखले तर ठीक नाही तर मानसिकता बिघडलीच म्हणून समजा…!

आज अनेक सिलिब्रिटींचे नाते आचानक तुटले की कालपर्यंत तरी गळ्यात गळें घालून होते आज ब्रेकअप????म्हणून आपण एकाने म्हंटले की त्याची दुसरा रि sss ओढतो .पण त्यांची ते नातं तुटताना होणारी तगमग पाहायला प्रत्यक्ष आपण असतो का,???नाही ना!!मग पैसा असला म्हणजे मन मरत का?? नाही ना….

सिलिब्रिटींचे असो वा झोपडीत राहणारा असो त्याला प्रत्येकाला मन आहेच.फरक इतकाच की सामान्यपणे जगणाऱ्याला चार टोमणे अन जगाच्या चालीरितीचा मार जास्त सोसावा लागतो.पण यात आपले मन त्याची मानसिकता याची जडणघडण अन त्याची स्वयंपूर्णता कधी लक्षात घेणार?????

त्यासाठी प्रत्येकाने मनाचे talk शिकलेच पाहिजे. आपला आनंद हा दुसर्यावर अवलंबून न राहता आपणच आपला मार्ग शोधला पाहिजे.आपली खरंच आनंदी राहण्याची मानसिकता आहे की सतत आपल्या भोवती दगदग असली की आनंद होतो हे स्वतःचे स्वतः डॉक्टर होऊन रुटीन चेकअप केलं पाहिजे.

मनाच् talk करताना जरा विचारा स्वतः ला. अरे बाबा….आज किती हसलो,कितीवेळा चिडलो…कितीवेळा रडलो….कितीवेळा मनसोक्तपणे बोललो….कितीवेळा दुसऱ्याच कौतुक केलो… कितीवेळ स्वतः आरशात पाहून खुदकन हसून स्वतः ला I love myself म्हणालो????(भले वेड लागलं आहे म्हणाले तरी चालेल) स्वतः जेव्हा एखादी कृती करताना,कोणाची मदत होत असताना दिल से Thank you म्हणतो तेव्हा आपली मानसिकता ही माणूस म्हणून जगण्यास लायक होत असते.

एखादं फुल पाहिलं तर तू आज इतका सुंदर दिसत आहेस…, माझ्या डोळ्याला तृप्त केलं thank u… एखादं मनीच पिल्लू पायाशी खेळत असेल तरी म्हणता आलं पाहिजे आज मस्त आनंद दिला या इवल्याशा पिलानं दिला….. कोणी मंदिराच्या दारात भुकेलं दिसलं तर आपोआप अन्न देऊन तृप्त करता यायला हवं…कशाला देवाकडे सुख दे …हे व्रत करेन,इतकं पैसे वाहीन हसत पसरून म्हणायची गरज आहे????तो दारातच उभा राहून तुमच्या मानसिकतेची कसोटी पाहतोय. आहे कनई गंमत..!!

म्हणूनच आपली मानसिकता तपासणे गरजेची आहे.छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता आला पाहिजे.जो सतत रडतराव असतो त्याच्या जवळपास भटकायला ही कोणी बघत नाही पण जो उत्साहाने भरलेला आहे ते नेहमी आपलं वाटतो. नटखट,खट्याळ ,हसरा स्वभाव जवळचा वाटतो.रागीट,अबोल, गंभीर स्वभाव मनाला नकोनकोसा वाटतो.

काही अवती भोवती असे असतात कितीही पैसा असला,सगळं चांगलं असलं तरी सुतकी चेहरा अन सतत नकारात्मक विचार करत असतात त्यामुळे मानसिक आजार स्वतः हुन ओढवून घेतात.

आपली मानसिकता बदलायला दुसरं कोणी कितीही सांगितले तरी ते आतून यावं लागत.ते आतून येण्यासाठी पुस्तक, मित्रमैत्रिणी, आपले
छंद जपणे,आपली विचार करण्याची पद्धत आशावादाकडे हवी , ध्यानध्यारणा,निसर्गाच्या सानिध्यात राहता आलं पाहिजे.त्याच्याकडून भरभरून शिकता आलं पाहिजे.

कोणत्या प्रकारचे टेन्शन हे डोकेदुखी,मनाच अन शरीराच टेन्शन वाढवत.नात्यातील गुंता वाढवण्यापेक्षा त्यातील स्पेस जपा,एकमेकांना समजून आदर द्या,कोणत्याही गोष्टींचा विचार हा एकांगी न करता दोन्ही बाजुंनी करा.व्यक्ती चुकीची नसते तिची विचार करण्याची पद्धत चुकीची असते त्यामुळे नात्यातील येणाऱ्या कडवटपणा टाळण्यासाठी स्त्री पुरुष असा भेद न करता स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान करा.स्त्री म्हणून तिला बंधने घालून तिच्या मनाचा मीच मालक ही मानसिकता बदलली तर नात अजून खुलते.

समोरच्या व्यक्तीने कसे वागावे बदलावे यावर सक्ती करण्यात वेळ वाया न घालवता स्वतः बदल करणे कधीही चांगले.प्रत्येक माणूस स्वतः बदल स्वीकारयला लवकर तयार होत नाही पण दुसऱ्यान माझंच ऐकावं यावर आग्रही असतो.ही जेव्हा मानसिकता बदलू तेव्हा डिप्रेशनमध्ये जाऊन डोकदुखी समस्या दूर होईल.आणि डोकं दुखणं हे जिवंतपणाच लक्षण आहे बर का..

पण त्यांन सतत डोकं वर काढणं नक्कीच हितावह नाही.अतिचिंता ही चिताकडे वाटचाल करते.म्हणूनच आपलं दुखणं ओळखून ते योग्य व्यक्ती समोर ओपनअप झालं पाहिजे.डबक्यात पाणी साचलं तर ते कालांतराने गढूळ शेवाळ युक्त अन डास किडे यांचं माहेर होतं पण वाहत पाणी स्वच्छ, नितळ असतं अगदी मनाच ही तसच त्याचा तळ नितळ दिसण्यासाठी आपण मनाचा डस्टबिन रिकामा करायला हवाच ना!!

तरच आपल मानसिक आरोग्य जपता येईल… आणि या मिळालेल्या आयुष्यात खुल के जियो म्हणून जगता येईल… म्हणूनच तुझं आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी…!ती चुकलेली जागा तेवढी भरली की झालं…कशाला डोकं दुखावून घ्यायचं या मनाला उडू उडू द्यायचं बस्स इतकंच…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

6 thoughts on “सतत डोकेदुखीच्या गोळ्या घेऊ नका ,तुमची सध्याची मानसिकता नीट तपासा.”

  1. सर्वांना मार्गदर्शक लेख , संयोगिता
    लिहीत रहा
    खूप साऱ्या शुभेच्छा!

  2. Parasharam Rama Ambi

    खरंच आज ही वेळ आलेली आहे की स्वत: स्वत:ला तपासून घेण्याची. जीवन जलद आहे. आपल्याला आपल्याकडे पाहायला वेळ मिळत नाही. वास्तव विषय छान मांडलाय. सर्वांना विचार करायला लावणारा आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!