अवतीभवती असेही लोक असतात जे आपल्याला केवळ दाखवण्यापुरते आपले असतात.
गीतांजली जगदाळे
(समुपदेशक)
आपल्या जीवनात बऱ्याचदा अशा लोकांशी आपला संपर्क येतो जे खरंच आपले आहेत , त्यांना आपली फार काळजी आहे असे ते वागतात . आपल्याला ही माणसं जवळची वाटू लागतात . पण जेव्हा संकट येतं , तेव्हा हीच माणसे पहिला पळ काढतात आणि तेव्हा आपल्याला त्यांचा खरा चेहरा कळतो. आता ते असे का वागतात ? आपले नसताना आपलं असण्याचा आव का आणतात ? असा प्रश्न पडतो . पण याच उत्तर फार सोप्पं आहे पण तसं logical आहे असं नाही .
सर्व माणसांच्या good books मध्ये राहण्यासाठी तसं वागण्याची या माणसांची सवय असते . म्हणजे जेव्हा ही माणसं तुम्हांला भासवतात की , ते तुमचे आपले आहेत , तुमची काळजी करतात आणि तुमचे हितचिंतक आहेत तेव्हा अशी माणसे नक्कीच कोणालाही चांगलीच वाटणार ! या हेतूमुळे ही माणसे दिखावा करतात . हीच ती माणसं असतात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून त्यांना मनातलं सांगता आणि ही माणसं तुमची गुपितं ,तुमचे प्रॉब्लेम्स दुसऱ्या कोणाला जाऊन बोलत असतात . तुमच्या चुका परखडपणे तुम्हांला सांगण्यापेक्षा तुमच्या मागे बोलायला त्यांना जास्त आवडतं . इंग्लिश मध्ये एक म्हण आहे , it’s better to rise alone , then to be accompanied by the wrong people.
ही fake माणसं ओळखणं तसं अवघड ही असतं आणि सोप्पं ही ! जर नीट लक्ष त्यांच्या कृतीकडे , शब्दांकडे दिलं असता काही वेळा तरी अशी माणसं लक्षात येतात . पण सगळ्यात मुख्य म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात हेच लक्ष देणं , ते लक्ष द्यायचं हे सुद्धा वेळच्या वेळी लक्षात येणं आपल्याला अवघड असतं . इथे कितीही विचार केला तरी आपल्या आयुष्याला पुरतील एवढे योग्य विचार आपल्या कडून होत नाहीत तर दुसऱ्या माणसांच्या वागण्यावर , बोलण्यावर आपण कितीसं असं लक्ष देणार ? असं तुम्हांला वाटणं साहजिक आहे . आणि हे खर देखील आहे . पण तरीदेखील काही कटू अनुभवांपासून स्वतः ला वाचवायचं असेल , कोणी आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला एवढी precaution तर नक्कीच घ्यावी लागेल .
कोणीही कितीही सहानुभूती दाखवली तरी लगेच विश्वास ठेवून सगळं सांगू नकात . याचा अर्थ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसावर संशय घ्या असं नाही परंतू प्रचिती येईपर्यंत काही दिवस neutral रहा. कारण ‘आपली माणसं ‘ असण्याच नाटक करण्याचा हेतू असलेल्या माणसांचा त्यामागे काय हेतू असू शकतो हे आपल्याला सांगता येणार नाही .
खरं सांगायचं तर अशा माणसांच्या सहवासात असताना चुकूनही तुम्हांला असं वाटणार नाही की तो माणूस fake आहे , कारण तशी VIP treatment तो माणूस तुम्हाला देत असतो , आणि एवढं चांगलं कोणी आपल्याशी वागत असेल तर कधी ना कधी विश्वास बसणारच !
१. तुमच्या गोष्टी , मतं ऐकून ही मंडळी तुम्हांला मनातल्या मनात भरपूर judge करत असतात , जरी त्यांनी तुम्हांला समोर तसं दाखवलं नसलं तरी .
२. खूप लवकर ही माणसं आपल्या जवळ येतात , खूपच कमी वेळात आपलीशी वाटू लागतात .मला असं म्हणायचं नाहीये की , कमी वेळात जवळ येणारी माणसं वाईटच असतात पण सगळीच चांगली सुद्धा नसतात . इथे आपल्याला वाईट माणसांपासून सावधता बाळगायची गरज आहे .
३. सतत प्रचंड स्तुती करणे .
४. VIP treatment देणे .
५. तुम्ही त्यांचे सगळ्यात favourite आहात असं feel करवतात .
पण हे सगळं करण्यामागे त्यांचा काही ‘छुपा’ हेतु असू शकतो . नम्र माणसे आणि fake माणसे यांत फार फरक असतो . कारण नम्र माणसेही यातल्या काही गोष्टी करतात पण निरीक्षण केलं असता त्यातला फरक जाणवतो . जर चुकून तुमच्यात कधी मतभेद झाले तर ही माणसे तुमचे secrets इतरांना सांगायलाही कमी करत नाहीत .
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
