Skip to content

अत्यंत साधेपणाने जगण्याला आपण अवास्तव अपेक्षांनी पूर्ण पोखरून ठेवतो.

अत्यंत साधेपणाने जगण्याला आपण अवास्तव अपेक्षांनी पूर्ण पोखरून ठेवतो.


रोहिणी राधाकिसन


माणूस म्हणून तस तर आपल्या मूलभूत गरजा ह्या अन्न, वस्त्र आणि निवारा याच होत्या, आणि आहेत. पण हे वाक्य जर मी काही कालावधी पूर्वी म्हंटले असते तर कदाचित चालले असते पण सध्याची परिस्थिति बघता ही वाक्य जरा अनुकूल नाही वाटत. जर तुम्ही कोणाला त्याची आजची गरज विचारली तर उत्तर हे तुम्हाला असं मिळेल – मोबाईल, इंटरनेट, vacation, फास्ट फूड, stylish कपडे, car इ.

खरं तर ही गरज नसून केवळ प्रभाव आहे जो आपल्यावर पडला आहे. इतरांकडे बघून आपण त्याच्या मोहात अडकतो आणि आपल्या अपेक्षा वाढायला लागतात. आपलं आयुष्य आपण अगदी साध्या पद्धतीने अत्यंत आनंदी व्यतीत करू शकतो.

परंतु मनुष्याची मानसिकताच आहे खर तर अशी, त्याला एक गोष्ट मिळाली की तो दुसरीच्या शोधात लागतो अगदी गरज नसतानाही. पायी चालणाऱ्याला सायकलची गरज भासते तो सायकल घेतो. आता त्याला वाटत की मी कीती दिवस पेडल मारून सायकल चालवू, आता मला मोटरसायकल पाहिजे. तो मोटरसायकल घेतो, आता त्याला वाटत माझ्या दारात चारचाकी लागली पाहिजे.

मग तो चारचाकी गाडी घेतो. पण त्याची अपेक्षा इतेही थांबत नाही तो म्हणतो आता मला या ट्रॅफिक चा खूप त्रास होतोय मला हेलिकॉप्टरच पाहिजे. आता तुम्हीच बघा एका सायकल वरून सुरू झालेली अपेक्षा हेलिकॉप्टर वरही जाऊन थांबत नाही.

जिथे आपण अगदी साध्या सायकलवर अत्यंत समाधानी राहिलो असतो, काय गरज आहे अश्या अवास्तवी अपेक्षांनी स्वतःची सुख शांती भंग करून मरमर करण्याची, यामुळे आपण जे आहे त्याचही सुख नाही घेऊ शकत. पण फक्त आणि फक्त दिखावा हा आजकाल चा ट्रेंड बनत चाललाय, याच्या नादात आपण वास्तव विसरून कल्पनेच्या जगात जगतोय.

प्रत्येक जन जे काही पोस्ट करतोय किंवा सोशल मिडियावर दाखवतोय, तस त्याच खरं आयुष्य नाही आहे ते फक्त दिखाव्याच आहे ही आपल्याला समजायला हवं. आपण जरी त्या दिखाव्याच्या मोहात पडत असलो तरी आपल्याला ते जमणार आहे का? ह्याचा विचार आपण एकदा करायला हवाच.

स्वप्न आपण सगळेच बघतो. आणि बघायलाही हवीत नाही का? पण वास्तवाला धरून जर एखादी गोष्ट आपल्याला जमणारी असेल, अवास्तव असेल तर त्यासाठी आपण त्या मोहाच्या जाळ्यातून अलिप्त असणं कधीही उत्तमच. इथे माझ म्हणणं अस नाही की आपण स्वप्नच नाही बघायला पाहिजेत, नाही आपण स्वप्न बघितलीच पाहिजेत.

जर आपण एखाद्या गोष्टीची इच्छा व्यक्त नाही केली, ती मिळवण्याची स्वप्न नाही बघितली तर आपण कधी ती मिळवुच नाही शकणार. आणि आपला विकास ही नाही होणार. जर आपण कसली इच्छा व्यक्तच नाही केली तर आपण ती मिळवण्यासाठी तडजोडच नाही करणार.

व्यक्ति किंवा वस्तु काहीही असो अपेक्षा वाढली की त्रास हा होणारच. नात्यातही तसंच आहे. प्रत्येक नात हे छानच असत. आपण काही अपेक्षा ठेवतो, पण त्या पूर्णतः आपल्या मनात असतात. त्या व्यक्तिला त्याबद्दल काहीच माहीत नसतं. जर त्या व्यक्तिला काहीच अंदाज नसेल की तुमच्या मनात की चाललंय तर तो त्या अपेक्षांवर खरा कसा उतरेन. आणि त्या अपेक्षा त्या व्यक्तिसाठी वास्तवात आणण्यासारख्या पण असल्या पाहिजेत नाही का.

पण आपल्याला तर एवढच माहीत असत की नाही तो माझ्या अपेक्षा पूर्ण करत नाही आहे म्हणून. आपण आपल्या मनात उभारलेला अपेक्षांचा मनोरा खाली कोसळतो. मग आपण त्या व्यक्ति बद्दल राग करायला लागतो. आपल्या वागणुकीत चिडचिडच प्रमाण वाढत. वाद वाढतात. आपल्या साध्या सरळ आयुष्याची विल्हेवाट लागते. त्यात काही गोष्टी अपेक्षा असतात ज्या आपण आपल्या जोडीदाराकडून ठेवतो. पण जर सगळ काही छान, आणि साधेपणात सुरू असेल तर हेच सुखी आणि समाधानी आयुष्य आहे.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!