मिनल वरपे
काही दिवसांपूर्वी एक मैत्रीण भेटली.. बऱ्याच वर्षांपासून आमचं काही बोलणं भेटणं झाल नव्हत त्यामुळे एकमेकींच्या आयुष्यात काय काय घडलं हे सांगताना जणू वेळ कमी पडेल की काय असं वाटलं..
मला तर वाटलं की तीच ज्या मुलावर प्रेम होत आता ती त्याच्यासोबत आहे पण खर तर तस काही झालं नाही कारण त्यांचं प्रेम होत असे तिलाच वाटायचे तो मात्र दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेऊन तिच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला.
घरच्यांना त्रास व्हायला नको आणि आपली कोणी चिंता करेन अस वागण्यापेक्षा आपणच स्वतःला सावरायचं हा तिने एक उत्तम निर्णय घेतला.
प्रेम मिळालं नाही म्हणून बहुतेक जन रडतात, आनंदाने जगायचं सोडतात, सतत भावनिक विचार करत निराश होऊन जगण्याला अर्थ ठेवत नाही.पण तिने तस न वागता स्वतःला सतत गुंतवून ठेवले. तिला घर सजवायची, चित्र काढण्याची आणि गाणे ऐकण्याची तिला खूप आवड होती आणि तीच आवड तिने जपली.आणि म्हणूनच तिला स्वतःला सावरायला वेळ लागला नाही.
सगळीकडे बघावं तर नक्कीच असे अनेक जण असतात ज्यांना त्यांचं एक वेगळं दुःख असते. कोणी दुःखात इतके अडकते ती की जगायचं भान राहत नाही तर कोणी त्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. आपण एखाद्या घडलेल्या गोष्टीचा, त्या परिस्थितीचा,संकटांचा, आलेल्या वाईट अनुभवांचा विचार न करण्याचे ठरवतो तेवढे जास्त आपण त्यामधे अजून अडकतो.कारण आपण फक्त विचार करतो.
म्हणून फक्त विचार न करता कृती करून स्वतःला गुंतवले तर आपल्याला सगळ्या चिंतेतून बाहेर पडणं सोपं जाईल.आपल्याला जर स्वतःला सावरायचं असेल, काहीही घडलं तरी त्यामधे न अडकता मोकळं जगायचं असेल तर आपण आपल्या आवडींना जपलं पाहिजे. आपल्याकडे खूप वेगवेगळ्या कला असतात पण त्या कलांचा आपल्याला विसर पडलेला असतो कारण आपण ठरलेली कामे करून आलेला दिवस ढकलत असतो.
छंद आपली मानसिकता बदलण्याचे काम करतात. आपल्याला आनंदी राहायला शिकवतात.आणि आपण जेव्हा आनंदी असतो उत्तम मानसिकतेत असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या नवनविन कल्पना सुचतात.कोणतीही परिस्थिती असो वा मनस्थिती तिला उत्तम करण्याचे काम आपले छंद करतात.
काहीवेळेस तर आपले छंद आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ देईल फक्त आपण ते मनावर घ्यायची गरज आहे.
जर आपण आपले छंद जोपासले आपल्या आवडींना वेळ दिला तर नक्कीच आपल्याला जगण्यातला आनंद मिळेल. म्हणून छंद जोपासण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ तुम्हाला एक रेडिमेट प्लॅटफॉर्म तयार करून देत आहे.
ज्यामध्ये दरदिवशी तुमच्या अंगी असणारे कलागुण, कौशल्य म्हणजेच छंद जोपासू शकता. खालील फोटो वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा. तुमचे छंद तुमची वाट पाहत आहेत.


Very nice.
Positive approach.
Thanks ?
Very Superb, an very positive approach suggested especially to those who are frustrated, by any reason in life.
Also an a very good opportunity to prove ourselves and our qualities towards, which will definitely help all of us to be a good citizen and Human being.
Thank lot.