Attach होतो तस Detach पण होता आलं पाहिजे.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
रिया आणि भक्ती खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. अगदी बालवाडीपासुनच्या. दोघी शाळेत जाताना एकत्र जाणार येताना एकत्र येणार. डबा शेअर करून खाणार. पहिल्यासून एकमेकांच्या सोबत राहिल्याने कधी बाकीच्या मुलांशी पण बोलावं, कधी त्यांच्यासोबत खेळावं, वावरावं अस झाल नाही. त्यात भक्ती तर खूपच. रिया निदान बाकीच्या मुलांसोबत थोडीतरी मिक्स व्हायची. पण भक्तीच तस व्हायचं नाही. एखादेवेळी रिया शाळेत किंवा क्लासला काही कारणाने येणार नसेल तर ह्या मॅडम जायला टाळाटाळ करायच्या. आई कसतरी रागावून पाठवायची. तेव्हा पण तिला कधी घर येते अस व्हायचं. कारण शाळा किंवा क्लास असुदे जिथे जिथे रिया तिच्या सोबत हवी तिथे ती नसताना राहणं भक्तीला असह्य व्हायचं. इतकी ती तिच्याशी attach होती.
तिची आई तिला नेहमी समजावयची, “तुम्ही आता शाळेत एकत्र आहात फार फार तर एका कॉलजला एकत्र असाल. पण कधीतरी तुम्ही दोघी वेगळ्या होणारच. त्यामुळे तुला रिया शिवाय बाहेर जाण्याची सवय करायला हवी. ती तुझ्यासोबत कायम राहणार नाही. तुमचे मार्ग कधीतरी वेगळे होतील. तुम्ही दोघी प्रत्येक वेळी एकमेकांसोबत राहू शकत नाही. म्हणून तुला अजून मित्र मैत्रिणी पण केल्या पाहिजेत.”
पण या सर्व बोलण्याचा भक्ती वर काहीही परिणाम व्हायचा नाही. ती तर बिंधास म्हणायची, “अस कधी होणारच नाही. आम्ही एकत्रच शिकणार, एकत्रच काम करणार आणि त्याही पुढे ती हसून म्हणायची की आम्ही लग्न पण दोन भावांशी करणार. मग सांग पाहू रिया कशी जाईल माझ्यापासून दूर?” तिच्या या बोलण्यावर आईला पण हसू यायचं. पण मनात तिच्याबद्दल काळजी पण होती.
असच त्या दोघींचं आयुष्य मस्त चालल होत. या वर्षी त्यांची दहावी होती. महत्त्वाचं वर्ष होत. याच वर्षी त्या दोघींच्या आयुष्यात अस काही घडलं ज्याचा परिणाम भक्तीवर झाला.
रियाच्या वडिलांची अचानक ट्रान्स्फर झाली आणि त्यांना दुसऱ्या शहरात जावं लागलं. त्या दोघींनी याची कल्पना पण केली नव्हती. पण वस्तुस्थिती हीच होती की त्या आता वेगळ्या झाल्या होत्या. मैत्री कायम राहणारच होती पण त्या एकत्र नव्हत्या. भक्तीने जे काही मनात ठेवलं होत ते मात्र तुटल.या सर्वाचा परिणाम तिच्यावर झालाच. जाताना रिया तिला समजावून गेली होती की तू अता नवीन फ्रेंड कर, आपण फोनवर रोज बोलूच, सुट्टीत भेटू. पण हे सर्व भक्तीमध्ये काही फरक पाडू शकल नाही.
आधी जेव्हा ती रिया नसताना शाळेत जायची तेव्हा तिला कुठेतरी माहीत असायचं की आज ना उद्या रिया येणार आहे. त्या आशेवर ती जायची. पण आता अस नव्हत. ती शाळेत जायलाच तयार नव्हती. आई बाबांनी खूप समजावलं, ओरडले पण ती जायची नाही. ते तिच्या शिक्षकांशी पण बोलले. त्यांनी तिला समजून घेत आई बाबांनी पण तिच्या सोबत शाळेत यायचा सल्ला दिला. ते तिला कसतरी मनवून घेऊन गेले. अस त्यांनी काही दिवस केलं. ती जायची खरी; पण हरवलेली असायची. अभ्यासात लक्ष नसायचं. शिक्षक मुद्दाम तिला नवीन मुलांमध्ये मिक्स व्हायला लावायचे. तश्या अॅक्टिविटी करायला लावायचे. पण ती त्यात रस घेत नसे. अभ्यासावर याचा परिणाम झालाच, परीक्षेत मार्क कमी झाले. एकटी एकटी राहू लागली.
तिच्या आई बाबांना तिची आता खूप काळजी वाटू लागली. सुरवातीला काही दिवस ठीक आहे. पण आता खूप दिवस झाले तरी ती तसच वागत होती. यावर काहीतरी करायला लागणार होते. ते तिला अस पाहू शकत नव्हते.
एक दिवस भक्ती अशीच बसलेली असताना तिचे बाबा तिथे आले व तिला म्हणाले चल भक्ती जरा आपल्या बागेत फिरून येऊ. ती त्यांच्यासोबत यायला निघाली. बाबांच्या हातात कात्री, पाणी अस काही सामान होत. तिने बाबांना विचारलं बाबा ही कात्री का? त्यावर ते म्हणाले, चल माझ्यासोबत तुला समजेल.
ते दोघं बागेत गेले. खूप छान फुल फुललेली होती. सर्व झाड वाऱ्यात झुलत होती. बाबा त्यातील एका झाडाकडे गेले, त्यांच्या पाठोपाठ भक्ती पण गेली. त्या झाडाला मस्त फुल लागलेली होती. खूप दिवस झालेले येऊन. बाबांनी कात्री घेतली व देठापासून जरा खाली ते कट करू लागले. ते पाहून भक्ती म्हणाली, बाबा अस का करताय? किती छान फुल आली आहेत? का कट करताय त्यांना? असुदेत ना!
बाबा तिच्याकडे पाहून म्हणाले, हो बेटा खूप छान आली आहेत. माझी खूप आवडती आणि जवळची आहेत. त्यावर भक्ती जरा हळवी होऊन म्हणाली, जर आहेत जवळची त्त कट करून दूर का करत आहात त्यांना? बाबा त्यावर उत्तरले, तुला आता नाही समजणार मी अस का केलं. पण काही दिवसानी नीट लक्षात येईल. थोड्या वेळाने ती तिथून निघून गेली.
असेच दिवस गेले आणि काही दिवसांनी बाबा परत तिला बागेत घेऊन आले. त्याच झाडापाशी घेऊन आले आणि तिला दाखवलं. जे फुल त्यांनी कट केलं होत तिथे नवीन फांद्या येऊन त्याला छोटी छोटी अनेक फुल आली होती. हे पाहून भक्तील आश्चर्य पण वाटलं आणि आनंद पण झाला.
तिने त्यांना विचारल हे अस कस झालं? बाबा हसून म्हणाले, बाळा हेच मी तुला समजावत होतो. आपल्या आयुष्यात अश्या काही गोष्टी असतात माणसं असतात जी आपल्या खूप जवळची असतात. अगदी खूप. ज्यांच्यापासून दूर होणं आपल्या मनाला पटत नाही. पण आपल्याला जर अजून पुढे जायचं असेल, आपल्यात प्रगती करायची असेल, एकाच गोष्टीत पूर्ण अडकून पडायचं नसेल तर detached व्हावं लागत. त्यादिवशी जर मी ते फुल काढलं नसत तर तुला आज इतकी फुल दिसली असती का? नाही ना! मला त्या फुलाला काढताना त्रास होत नव्हता अस नाही. पण त्याचे परिणाम चांगले असणार हे मला माहीत होत आणि म्हणून मी तस केलं.
भक्तीला समजलं बाबा तिला काय समजवायचा प्रयत्न करत होते. तिला लक्षात आलं रिया मध्ये गुंतून ती नवीन नाती तयार करत नव्हती, स्वतः ला तिथेच अडकवत होती.
तिने बाबांना वचन दिलं की ती स्वतः ला यातून बाहेर काढायचा नक्की प्रयत्न करेल.त्यानुसार तिने हळू हळू वर्गातली मुलांशी बोलायला सुरू केलं, हळू हळू अभ्यासावर लक्ष दिलं.
तिच्यामध्ये काही दिवसात फरक दिसून आला. अनेक मैत्रिणी झाल्या, पूर्वीच हरवलेल हसू पुन्हा आला. रिया मैत्रीण होती आणि शेवटपर्यंत राहणार होती. पण तिच्यापासून झाल्याने रिया फक्त एकमेव मैत्रीण राहिली नाही तर अजून अनेक नवीन नाती तयार झाली.
मित्रानो या प्रवास कधीच सोपा नसतो. पण अशक्य पण नसतो. आपल्याला जर नदीच्या प्रवाहा सारखं वाहत राहायचं असेल अटॅचमेंटपासून डिटॅचमेंटपर्यंतचा प्रवास करता आला पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
