एखादी गोष्ट करण्यापूर्वीच/घडण्यापूर्वीच त्याबद्दल पूर्वग्रह/भीती वा अतिविचार करू नका.
अनघा म्हेतर
Don’t cross the bridge until you come to it!
Somebody has rightly said “Don’t cross the bridge until you come to it ”
आपल्यापैकी बरेच आणि काही तर खूपच , एका विशिष्ट वयानंतर इतका विचार करु लागतात की आपल्याला या म्हणीची गरज पडू लागते .म्हणीचा अर्थ तसा साधाच आहे की पूल येण्याआधीच मनातच तो पूल ओलांडताना वाट कशी असेल ? तुटला तर ? नीट पार होईल ना ? असे विचार करून काहीच हाती लागत नाही ;अर्थात शब्दशः अर्थ नसला तरी ते शब्द बरच काही सांगून जातात.
आपण याआधीही बोर्डाच्या परीक्षेच्या किंवा इतर कोणत्यातरी मोठ्या परीक्षेच्या निकाला आधी एखाद्या मुलाने किंवा मुलीने तणावात येऊन आत्महत्ये सारखं चुकीचं पाऊल उचलले अशी बातमी ऐकली – वाचली असेल आणि नंतर तोच मुलगा किंवा मुलगी चक्क पहिल्या – दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे कळते तेव्हा अतिविचारातून निर्माण झालेला हा ताण इतका भयानक ठरताना दिसतो …आणि अशावेळी ही सरळ , साधी म्हण आयुष्याचा मार्मिक धडा शिकवण्या इतकी अर्थपूर्ण आहे याचा अनुभव येतो .
प्रत्येकवेळी मोठ्या मोठ्या गोष्टीत – प्रसंगीच नाही तर रोज जगताना अनेक लहान गोष्टीत – प्रसंगी ही बऱ्याचदा आपण मनातच पुल ओलांडून जातो. त्यातूनच मग भीती , न्यूनगंड ,काळजी , तणाव , निराशा सारख्या नकारात्मक भावनांनी मन भरून जातं.
आजच्या जगात प्रत्येकाला भविष्याची चिंता सतावते .उद्याच काय? काय होणार ? कसं होणार ? या विचारात कित्येकजण जगत असतात पण त्या सगळ्यात आत्ताचा ‘ हातातला क्षण ‘ ते ‘क्षणातलं आयुष्य ‘ निसटून जातंय हे लक्षातच येत नाही …!
ते म्हणतात ना – “yesterday is history, tomorrow is mystery and today is a gift – that’s why it is called ‘present’ !” म्हणजे काल जे घडलं तो भूतकाळ झाला आणि उद्या काय – कसा असेल हे कुणीच खात्रीने सांगू शकत नाही ते एक गूढच म्हणता येईल पण आपल्या हातात काही असेलच ना तर तो म्हणजे ‘ आज ‘- आपला वर्तमान आहे आणि ती एक अनमोल भेट आहे! भविष्यावर आपलं नियंत्रण नसलं तरी वर्तमानातील संधी उचलणं ,प्रत्येक कृती – कर्म मनापासून करणं , ध्येयाच्या – स्वप्नांच्या दिशेने मेहनत करणं या गोष्टींचे सकारात्मक परिणाम आपल्या भविष्यावर नक्कीच होतील. फक्त अतिविचाराने आणि नकारात्मक भावना निर्माण होऊ देऊन कृतीच नाही केली आताचा क्षण जगलाच नाही तर नक्कीच भविष्य घडणार नाही.
अर्थात “Don’t cross the bridge, until you come to it !” म्हणजे भविष्याचा विचार – नियोजनच करू नये असा त्याचा अर्थ नाही. भविष्याचा वेध घेणं माणसाला नेहमी आवडतं – आवडत आलेलं आहे आणि त्याच जोरावर माणसाने अशक्य – असाध्य वाटणारी अशी प्रगती साध्य केली आहे . पण म्हणून भविष्याच्या विचारात -काळजीत स्वतःला जखडून बंदिस्त करून घेणं चांगलं नाही .स्वतःच्या लहान – सहान इच्छा पूर्ण करण्याआधीच कित्येकजण इन्शुरन्स ला प्राथमिकता देताना दिसतात.भविष्याचे नियोजन – तजवीज असावी, जरूर करावी पण म्हणून अतीविचार ,चिंतेने भीतीने ग्रासलेले तणावपूर्ण जगण्यात काय अर्थ आहे ?
आयुष्य unpredictable असतं आणि तीच त्याची गंमत नाही का ? हजारो म्युझिक ॲप्लिकेशन्स आणि प्ले लिस्ट मध्ये कोणतंही गाणं एका क्लिक वर उपलब्ध असतानाही , अजाणतेपणे सुरू झालेलं /लागलेलं रेडिओ वरच गाणं गुणगुणताना तुमच्या चेहऱ्यावरच सुख तुमचा आनंद काही औरच… आयुष्याचंही तस्सच आहे ..!
“Life too has it’s surprises …! ”
सगळंच प्लॅनिंगच्या चौकटीत बसत असत तर मग न ठरवता मिळालेल्या काही आश्चर्य चकित करणारे सुखद धक्क्यांची मजा कशी अनुभवणार?
एखादी मुलाखत,परीक्षा ,निकाल वा सादरीकरण असो किंवा एखादं नवीन काम ,कला शिकणं , एखादी नवीन सुरवात, एखाद्या व्यक्तीला मनातलं काहीतरी व्यक्त करणं असो वा संवादाने नात्यातला गुंता सोडवणं …या गोष्टी भीती आणि विचारा पलीकडे जाऊन प्रयत्न करून बघण्यात मजा आहे …त्या क्षणातलं मनसोक्त जगणं ,तो क्षण अनुभवणं महत्वाचं कारण शेवटी हाच क्षणाक्षणातला आनंद – अनुभवच तर count होणारेत.
प्रतिक्रिया ( reaction ) काय असेल ह्याचाच विचार करत बसलो तर ती कधी येणारच नाही कारण तुम्ही कृती च नाही करू शकणार . निकालाच्या तणावामध्ये परीक्षेची मजा न घेता तुम्ही फक्त panic होत रहाल आणि फारस चांगलं परफॉर्म ही करता येणार नाही. मनात येणाऱ्या कल्पना फेल होतील म्हणून प्रयत्न न करता यशस्वी नक्कीच नाही होणार . बघा निरीक्षण करून – आत्मपरीक्षण करून की आपणही असाच मनात पुल ओलांडून जातोय का ? उत्तर स्वतःलाच द्या आणि मग मग काय आठवण करून द्या स्वतःला
” Don’t cross the bridge, until you come to it!”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khupach Chan lekh ahe
खूपच छान लिखाण लिहिले आहेस… Very good.. Keep it up… 👌👌👌👌
खूपच छान ; शब्दांची मांडणी योग्य अशी केली आहेस , आणि विषय खूप गंभीर आहे पण तू साध्या सरळ आणि सोप्या भाषेत मांडला आहेस , कोणाच्याही चटकन लक्षात येण्यासारखा . खरंच खूप छान .
खूपच छान ; शब्दांची मांडणी योग्य अशी केली आहेस , आणि विषय खूप गंभीर आहे पण तू साध्या सरळ आणि सोप्या भाषेत मांडला आहेस , कोणाच्याही चटकन लक्षात येण्यासारखा . खरंच खूप छान .
खूप मस्त लेख आहे👌👌 खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलय..💯 motivate , , करणारा आहे, खरचं छान वाटल वाचून . खूपच energetic massage होता आजच्या youth साठी ❤️✨
खूपच छान आहे.सगळ्याना समजेल अशी शब्द रचना आहे.प्रत्येकजन हा लेख वाचुन नक्किच स्व्तःच्या विचारत बदल नक्की करेल.मला लेख खुप आवडला.
खूपच छान आहे. सगळ्याना समजेल अशा शब्दात लीहीला आहेस.मला आवडला लेख..
खुप छान लेख लिहिला आहे.
It’s really Awesome….. Most of the time, we take actions on upcoming problems, which are not going to exist… which are just in our mind… And the writer Described it very Good way.
खूप छान लिहला आहात लेख खूपच प्रेरणा देणारा व उत्तर देणारा संवाद पहावयास मिळाला या लेख वाचून खूप हर्ष झाला . प्रा. अनघा मॅडम
Khupch chan diii😍..ajchya youth sathi ha khupch chan Ani important message ahe
Very relatable n useful
its relate to on everyones life . very good
Yes that’s right……
The purpose of our lives is to be happy
खूप छान आहे
Best
its relate to on everyones life..very good.
Wow.. Aajkal chya dhavplichya.. Dhagdhagichha aayushyat uttam maargdarshan krnara ha lekh.. 👌👌
खुप सुंदर आणि उपयुक्त. Keep it up