अतिशय जवळची व्यक्ती त्रासात असेल तर त्याचा negative परिणाम आपल्यावर सुद्धा होतो.
हर्षदा पिंपळे
परक्याच्या दुःखाने हळहळणारे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या दुःखाने तर निःशंक हळहळतोच नं….?
दुसऱ्याच सुख न बघवणावरी जशी काही माणसं या जगात आहेत तशीच दुसऱ्याच दुःख न बघवणावरी माणसं सुद्धा या जगात आहेत. मित्रांनो, आपल्या जवळची व्यक्ती जर त्रासात असेल तर त्या गोष्टीच आपल्याला खूप वाईट वाटतं. आपल्याला त्या व्यक्तीचा त्रास अजिबात बघवत नाही.कारण ती व्यक्ती आपली असते.आपल्या जवळची असते. त्याच्या कोणत्याही त्रासाने कळत नकळतपणे आपल्यालाही त्रास होतो.इतकच नाही तर कधी कधी आपल्याच जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात.
प्रत्येकाला कोणता ना कोणता त्रास होत असतो.
*जवळच्या व्यक्तीच आजारपण
*ब्रेकअप
*आर्थिक चणचण
*मानसिक ताणतणाव
*सततचे होणारे वादविवाद
*सातत्याने कामात येणारं अपयश]
*कौटुंबिक कलह
*सामाजिक कलह
*मान-सन्मान/पद-प्रतिष्ठा]
कुणी तो मोकळेपणाने एकमेकांसोबत शेअर करतो तर कुणी मनातल्या मनात साठवून ठेवतो.शेअर करणं त्यांना जमत नाही. आवडत नाही.आपल्याला स्वतःचा त्रास तर सहन होत नाहीच. पण आपल्या जवळच्या व्यक्तीचा त्रासही सहन होत नाही. कुणाच ब्रेकअप झालेलं असतं तर कुणाच जोडीदाराबरोबर भांडण झालेलं असतं.कुणाच ऑफीसमध्ये काहीतरी बिनसलेलं असतं.कुणाच्या आर्थिक चणचणी, तर कुणाच काय……असं बरच काही माणसाच्या आयुष्यात घडत असतं.आणि अशावेळी माणूस सातत्याने नकारात्मकतेच्या गर्तेत अडकलेला असतो.तो सतत कोणत्या ना कोणत्या विचारामध्ये गढून गेलेला असतो.आता कसं होणार…? सगळं व्यवस्थित होईल नं…? अशा प्रश्नांमध्ये ते गुंतलेले असतात. सहसा आनंदाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर लवकर दिसत नाही.पण त्यांच्या अशा वागण्याचा परिणाम आपल्यावरही होतो.
जसं एखाद्या वातावरणात आनंद आणि सकारात्मकता असेल तर तिथे गेल्यावर आपल्यालाही प्रसन्न वाटतं.आपल्यातही एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अगदी तसचं आपल्या अवतीभवती जर नकारात्मक स्वरुपाच वातावरण असेल तर त्याचाही परिणाम आपल्यावर होतो.आपणही नकळतपणे त्या गोष्टींचा विचार करायला लागतो. तो नीट होईल नं..?? त्याचं असं कसं झालं…? आपल्याही बाबतीत उद्या असं होणार नाही कशावरून…? किती दिवस हे असं चालणार..? अशा प्रश्नांभोवती आपलं मन पिंगा घालू लागतं.हळुहळू आपणही नकारात्मक विचारांचा पाठलाग करायला लागतो.आपण त्रास होणाऱ्या व्यक्तीला समजावतोही परंतु त्यानंतर आपण आपली समजुत काही काढत नाही. त्यांना ‘जास्त विचार करू नको ‘ असे बोलणारे आपणच जास्त विचार करायला लागतो.हळुहळू आपलही मन विचलित होतं.कशातच मन लागेनासं होतं.सतत त्या व्यक्तीच्या काळजीने आपल्याच मनात काहूर माजलेलं असतं.
चांगल्या प्रभावाखाली येऊन माणूस चांगल्या प्रकारे घडत असतो.तसच अशा वातावरणात, नकारात्मक प्रभावाखाली देखील माणूस अनेकदा तसाच घडत जातो.आणि असं म्हणतात वाईट गोष्टी माणसाकडून पटकन आत्मसात केल्या जातात. चांगल्या गोष्टी आत्मसात करायला माणसाला खूप मेहनत घ्यावी लागते.खचलेल्या, हताश झालेल्या व्यक्तीकडे पाहून आपलं मनही हताश होतं.त्या निगेटीव्हीटीकडे आपण पटकन केंद्रित होतो.एखाद्याचा त्रास पाहून आपल्याला त्रास होणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु सातत्याने त्याच प्रभावाखाली, त्याच वातावरण निर्मितीत आपण राहीलो तर नकारात्मकतेचा परिणाम (एखादा अपवाद वगळता) आपल्यावर निश्चितच होतो.त्या व्यक्तीला सतत त्रासात बघून आपली मानसिक अवस्था बिघडत जाते.
तर अशा वेळी एकच लक्षात ठेवायला हवं.आपल्याला आपली मानसिक अवस्था बिघडवू द्यायची नाही.रोज कुणीतरी त्रासात असणारच …..हे गणित लक्षात घेऊन तिथेच थांबायला हवं.त्रासाचा विचार करत बसायचा की त्यावर एखादं सोल्युशन शोधायचं याचा विचार करा.त्या व्यक्तीला सावरता सावरता स्वतःचा तोल जाऊ देऊ नका. आणि त्याच वेळी शिकून घ्या की एखाद्या गोष्टीचा इतरांवर कसा प्रभाव पडू शकतो ते.उद्या जर आपण त्रासात असू तर आपल्या जवळच्या व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्या.आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढ उतारामधून काहीतरी शिकून घ्या. काय आणि किती याचं प्रमाण ठरवून घ्यायला शिका.मनाने थोडं स्ट्रॉंग रहायला शिका.आनंदी रहा…आनंद पसरवा…नकारात्मक ऊर्जा सहसा अवतीभवती फिरकणारही नाही.
So…..आपल्यामुळे वातावरणात negative vibes तयार होणार नाहीत याची काळजी घ्या. हसून सुद्धा प्रॉब्लेम्स सोडवता येतात.
टेन्शन तर सगळ्यांना असतं…पण ते कायमस्वरूपी कधीच नसतं.त्यामुळे हसत रहा…हसवत रहा…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
