अति जवळीक नात्यात दुरावा आणते.
सोनाली जे.
खरेच तर आहे . अति जवळीक नात्यात दुरावा आणते.
बरेचवेळा असे होते ही माझी खास मैत्रीण , खास मित्र म्हणजे त्याच्या बद्दल तिच्या बद्दल मला सगळे माहिती पाहिजे अशी कुठे तरी आशा, अपेक्षा असते. अर्थात एका दृष्टीने बरोबर ही आहे की चांगली मैत्री किंवा चांगले नाते यात एकमेकांच्या विषयी सगळी माहिती पाहिजे. Transperancy पाहिजे. म्हणजे एकमेकांच्या मध्ये गैरसमज होतं नाहीत.
पण ओव्हर पझेसिव्हनेस नको . त्यातून काय होते की त्याने तिने ही गोष्ट संगितलीच पाहिजे. किंवा एखादी गोष्ट सांगितली तर तिचं कौतुक केले गेले पाहिजे. प्रत्येक वेळी किती धडपड केली .किती छान असे सारखे डोक्यावर चढवून ठेवल्या सारखे. मग एखाद्यावेळी जरी कौतुक केले नाहीतरी रुसवा फुगवा , चिडचिड , वाद होवू लागतात.
या शिवाय प्रत्येकाची स्पेस त्याला द्यावी .सतत आपण वॉचमन गिरी करू नये.कोणाशी बोलते / बोलतो. कोणाला भेटणार . प्रत्येक गोष्टीत आपल्याला सहभागी करून घ्यावे किंवा त्याची माहिती द्यावी ही अपेक्षा ही चुकीची असते.
काही प्रसंग खूप शांत करतात, नाहीतर एकवेळ अशी होती की लोकं आपण खुश असण्याचे कारण विचारायचे.आपल्या आनंदात सहभागी व्हायचे.
आयुष्य हे चांगल्या वाईट अनुभवांनी साकारत असते. प्रत्येकाचे आयुष्य असेच असते फक्त दुरून डोंगर साजरे असे वाटत असते. अर्थात काही लोक खरेच खूप नशीबवान असतात. ज्यांना सगळ्या गोष्टी खूप सहजा सहजी मिळत असतात. तर काही लोकांना प्रत्येक गोष्टी करिता प्रचंड झगडावे लागते. आणि त्या झगडण्यातून एखादी गोष्ट मिळविली , achieve केली की एक प्रकारचे समाधान आणि आनंद चेहऱ्यावर दिसतो. प्रचंड खुष होते ती व्यक्ती.
अशा लोकांच्या आयुष्यात आपली अशी म्हणावी अशा आपल्या व्यक्ती ही खूप मोजक्याच असतात. बोटावर मोजण्या इतक्या. याचे कारण प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्यक्ती जास्त आवडते. आकर्षित करते. आयुष्यभर Struggle करणारी व्यक्ती ही इतरांच्या दृष्टीने यशस्वी नसते. कारण अजून स्ट्रगल करते म्हणजे सतत अपयश च येते.
पण ज्या मोजक्या व्यक्ती यांच्या आयुष्यात असतात त्यांना मात्र लगेच यांच्या चेहऱ्यावरचे आनंद , खुशी जाणवते. आणि यांनी कोणती तरी गोष्ट खूप कष्टाने मिळवली असेही जाणवते. पण अशाच आपल्या जवळच्या व्यक्ती मध्ये अती जवळीक केली तर दुरावा ही निर्माण होतो. याचे कारण म्हणजे त्यांच्या स्पेस मध्ये घुसणे , सतत काय सुरू , कोणासोबत भेटले तरी शंका .
किंवा न सांगता भेटले तरी मला सांगितले नाही. यावरून चिडचिड निर्माण होते. याचे कारण ही असे की ती जवळची व्यक्ती म्हणजे आपल्या हक्काची आहे असेच गृहीत धरले जाते. मग सतत तिच्या विचारात राहिले जाते. थोडेसे वागणे बदलले की बेचैन व्हायला होते. काही सांगितले नाही तरी अस्वस्थता होते. किंवा एखादी गोष्ट वेळ आल्यावर सांगतो म्हणाल्यावर ही
ईशा खूप हुशार होती आणि कष्टाळू होती. पण असे काही तरी होत असे की शेवटच्या क्षणी यश तिला हुलकावणी देत असे. तरी खूप सकारात्मक . छोट्या छोट्या गोष्टीत धडपड करून प्रयत्नपूर्वक यश मिळविणारी. ईशा वर खूप लवकर जबाबदाऱ्या पडत गेल्या. दहावी झाली आणि वडिलांना अर्धांगवायु झाला. वडील तसे घरीच . एक बाजू थोडी कमकुवत. ईशा वर त्यांच्या औषधोपचार आणि दवाखान्याची जबाबदारी पडलीच. पण तिचे शिक्षण पूर्ण करताना ती नोकरी ही करत होती. आणि शिवाय हुशार असल्याने शिष्यवृत्ती ही मिळत होती. घर , नोकरी , शिक्षण, वडिलांचे आजारपण सांभाळताना ईशा ची खूप धावपळ होत होती.
ईशा आणि ओम तसे खूप जवळचे मित्र. ईशा प्रत्येक गोष्ट ओम सोबत शेअर करत असे. ओम ला ही तिचे खूप कौतुक होते. ईशा एकदम खुश दिसली की ओम आपणहून विचारत असे की आज काय खास.खुश होण्यासारखे बाई साहेबांनी आज काय केले ?
मग ईशा तिच्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद सांगत असे. आणि प्रत्येक वेळी ओम कडून कौतुकाची अपेक्षा ठेवत असे. किंवा प्रत्येक वेळी ती खुश असेल किंवा अगदी दुखः ,किंवा त्रासात असेल तर ओम ने आता आपण हुंन विचारावे असे तिला वाटत असे.
एखादा नवीन पदार्थ केला की ती आवरजून ओम ला देत असे. किंवा फोटो पाठवत असे. ओम ही मस्त अशी पावती देत असे.
कधी ईशा शांत असेल तर काय झाले असे काळजीपोटी ओम विचारत असे. मग बाबांची तब्येत , तिची धावपळ , येणाऱ्या अडचणी विषयी मोकळेपणे बोलून कधी मार्ग सुचवत असे. तर कधी नुसते त्याचे सोबत असणे हा ही तिला आधार असे.
ईशा ही ओमचा व्यवसाय , येणाऱ्या अडचणी समजून घेवून त्याला मदत , सल्ला देत असे. कधी त्याला मोकळेपणाने बोलू देत असे. जेणेकरून त्याच्या डोक्यावरचे ओझे , ताण हलका होत असे.
पण अलीकडे ओम त्याच्या कामात खूप बिझी होत गेला आणि ईशा सोबत बोलण्यासाठी , भेटण्यासाठी त्याला किंवा अगदी मेसेज करण्यासाठी त्याला वेळ मिळत नव्हता. यातून ईशा ची थोडी चिडचिड होत असे. की एक मेसेज करायला वेळ नसतो. पाठविलेले मेसेज बघण्यास वेळ नसतो. ओम सुरुवातीला माफी मागत होता. ईशा ही समजून घेत होती.
परत दोघांची चांगली मैत्री होत होती. पण हळू हळू हे नेहमीचेच होवू लागले. दोघांच्यात वाद वाढू लागले. परत कुठे तरी समेट होत असे. तर परत गाडी बिघडत असे. याचे कारण अपेक्षा . आणि प्रत्येकवेळी ओम ने ईशा चे खुश असण्याचे कारण ओळखावं . किंवा अगदी तिचे त्रास , दुःख याचे कारण ओळखावे. आणि तिचे कौतुक , compliment द्यावी ही ईशा ची अपेक्षा असे. त्याही पेक्षा आता ईशा ओम ला खूप गृहीत धरू लागली.
पण ओम त्याच्या व्यापात व्यस्त असल्याने अलीकडे त्याचे ही ईशा कडे दुर्लक्ष होवू लागले.भेटी , बोलणे , मेसेज ही कमी होत गेले.
ईशा गैरसमज करून घेवू लागली की मुद्दाम ओम तिला टाळतो आहे. तिने मेसेज केला तर कधीच्या मेसेज ला कधी तरी reply करतो असे ही खात्री पटत गेली.
आपणहून मेसेज करत नाही पूर्वीसारखा ओम हे मनात पक्के होत गेले. एकमेकांच्या मध्ये थोडे अंतर येत गेले. ईशा ओम बाबत थोडी जास्तच possesive होत गेली. तो इतरांना वेळ देतो . तिला देत नाही म्हणून वाद घालत होती. पण ओम त्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यात गुरफटत गेला त्याला या गोष्टींकडे लक्ष देण्यास ही वेळ नव्हता. फक्त मग तो इशाचे विचार कसे चूक आहेत. ती कशीचुकीची हे दाखवून देत गेला. आणि दोघात काही तरी चांगलें बिनसत गेले.
ईशा ने कोणती नवी गोष्ट केली तरी ती शांत राहू लागली. व्यक्त होणे हळूहळू कमी होत गेले. तिचे आनंद , दुःख , येणारी संकटे , बाबांचे आजारपण घर चे बाहेरचे सगळे करत धावपळ करत नशिबाचे टक्के टोणपे खात पुढे जात असलेली ईशा जरी एखादी गोष्ट खूप कष्टाने , स्ट्रगल करून करत होती. ती खुश झाली तरी आता ती ओम ला सांगत नसे. शांत बसत होती. आणि आता ओम ही काही विचारत नसे. कधी कामातून तर कधी नेहमी होणाऱ्या वादातून जावू दे बोलणे ही नको असे म्हणून टाळत असे.
एकवेळ अशी आली होती की लोकं काय पण आपण आपला मानत असलेला ओम ही खुश असण्याचे कारण विचारत होता पण आता ती शांत असते. एकटी असते. अबोल झाले तरी तरी ते विचारणे तर दूरच . काय झाले असे ही विचारणे सोडून दिले त्याने. अति जवळीक नात्यात दुरावा आणत गेली. आणि शेवटी असे झाले की तू तुझ्या गोष्टी कर मी माझ्या गोष्टी करतो. कोणीच कोणाला काही सांगायला ही नको. आणि sharing ही नको caring ही नको अशी स्टेज आली.
बघा विचार करा , चांगली नाती अशी कधी कधी ओव्हर पजेसिवनेस मुळे , कधी गैरसमज कधी सतत एकतर्फी अपेक्षा , इच्छा यातून दुरावतात. मग आनंद असो अथवा दुःख या कशात ही आपल्यांची साथ लाभत नाही. फक्त अती जवळीक आपल्याला स्वार्थी बनविते आणि येतो तो नात्यातला दुरावा आणि राहतो तो एकटेपणा.
करून बघा प्रयत्न निदान जे आहे ते जपण्याचा प्रयत्न करा. जे नाही ते तरी कधीच मिळवू शकणार नाही. पण जे आहे त्याचे महत्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. जवळीक करा पण समोरच्या व्यक्तीला ही मोकळेपणाने श्वास घेण्याची संधी द्या. आपल्या हक्काच्या दबावाखाली त्याच्या भावना , इच्छा , त्याचा मोकळेपणा दाबून टाकू नका. त्याला ही स्वातंत्र्य द्या. अति जवळीकतेने नात्यात दुरावा येवू देवू नका. कारण आपले आपले असे म्हणणारे जवळचे आपल्याला समजून घेणारी नाती आणि लोक खूप कमी असतात. आहेत त्यांना नक्कीच जपा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
