Skip to content

अशी माणसं ओळखा जी तुमच्या life मध्ये थांबण्यासाठी धडपडत आहेत.

अशी माणसं ओळखा जी तुमच्या life मध्ये थांबण्यासाठी धडपडत आहेत.


मयुरी महाजन


माणूस माणसाशिवाय अपूर्ण आहे, असं म्हटलं जाते, ते अगदी खरं आहे, कारण माणूस म्हणून जशी आपली समाजात राहणे ही गरज आहे, आता जसा समाज आहे, तसेच आपले कुटुंब, आपला मित्रपरिवार ,आपले नातेवाईक, या प्रत्येकामध्ये आपली स्वतःची काहीतरी involvement असते, आता तसं बघितले, तर आपण भाग्यवान समजावं की आपल्याकडे अशी माणस आहेत, ज्यांना आपल्या लाईफ मध्ये थांबण्याची इच्छा आहे, अगदी मनापासून ,त्यासाठी अशी माणसं ओळखावी, जे आपल्या लाईफ मध्ये थांबण्यासाठी धडपडत आहेत,

अन्यथा ज्याला जायचं असतं, त्याला कुठलंही साधसं कारणंही पुरेसं असतं, आणि मला या ठिकाणी आवर्जून एक महत्त्वाचं सांगावसं वाटते, ते म्हणजे आपली लाईफ मग ती आर्थिक परिस्थितीने कशीही असली ,तरी त्यात असलेल्या आनंदाच्या क्षणांनी ,आणि विचारांच्या उदात्त सुविचारांनी समृद्ध करत राहावी, आपापल्या परीने आपल्या लाईफमध्ये, आपल्याला जी life एकदाच मिळाली आहे, त्यात आपल्याला वेगवेगळ्या करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत, आणि त्या लाईफ मध्ये इतरांना त्याचा हेवा वाटावा, थांबावस वाटावं, असं आपल्या लाईफ मध्ये काहीतरी असायला हवं,

कारण ज्या लाईफशी तुम्ही स्वतःच कंटाळलेले असाल ,अशा जगण्यापेक्षा मरण बरं असं जर तुम्ही वारंवार म्हणत असाल, तर विचार करा ज्या लाईफ मध्ये तुम्हाला रहावस वाटत नाहीय, तर तुमच्या त्या लाईफमध्ये इतर जण थांबण्यासाठी उत्सुक नसतीलच, काहींना जन्मतः अनाथ होऊन जगावे लागते, त्यांच्या आयुष्यात त्यांना माणसं भेटतात ,ते अनुभवांनी शिकत जातात, व माणसं ओळखायला शिकतात, गरजेपोटी जवळ येणारी माणसं ही पावलोपावली भेटत असतात, ते आपल्या आयुष्यात थांबण्यासाठी नव्हे, तर गरजेपुरती आलेली असतात, गरज संपली की अशा लोकांची वृत्ती बदलत असते,

माणसे ओळखणे खरंतर ही एक कला आहे, कारण की माणसाशी ओळख तर खूप लवकर व सहज होते, परंतु ओळख होणे व ओळखणे यात फरक आहे ,ज्या दिवशी आपण यातील फरकाला अगदी तंतोतंत समजून घेऊ त्या दिवशी आपण माणसं ओळखण्याच्या कलेत खऱ्या अर्थाने जाणारं, कारण माणसं ओळखण्याची ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे, जसजसे अनुभव येतात, आयुष्यात माणूस तस तसा पुढे जात असतो ,

एक महत्त्वाचा मुद्दा आपण कधी कुणाला जबरदस्ती करून त्याच्यावर दबाव टाकून कुणालाही आपल्या आयुष्यात थांबवू शकत नाही, सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर आपण कोणालाही बंधनात ठेवून आपल्या लाईफ मध्ये बांधून ठेवू शकत नाही ,कारण दबात येऊन जरी ती व्यक्ती तुमच्यासोबत असली तरी मनातून ती कधीच तुमची होऊ शकत नाही,

कारण मला वाटतं माणूस मिळवण्यापेक्षा माणसं कमवायला हवीतं, जिंकायला हवीत, मनाने, कारण जिथे आपण माणसं मनाने जिंकतो, बऱ्याचदा गरजेपोटी काही व्यक्ती एकमेकांच्या आयुष्यात येतात, परंतु त्या आपल्यासाठी नाही तर गरजेच्या हव्यासापोटी आलेली असतात,

खरंतर माणसं आपल्या life मध्ये थांबण्यासाठी धडपड करत असतीलही, पण कधी कधी आपण त्याकडे लक्ष देण्यात कमी पडत असणारं, त्यासाठी आपण स्वतःला ती गोष्ट आठवण करून देणे गरजेचे आहे, व स्वतःला ओळखणे अनुभवणे महत्त्वाचे आहे, कारण बरेचदा एक वाक्य ऐकायला व अनुभवायला येते की कुणी कुणाचं नसतं, हे अगदी कधीतरी का होईना, पण खरंच वाटतं, पण कधीतरी कोणीतरी आपलं होतं हेही तितकेच खरे आहे फरक फक्त इतकाच असतो, की कोणीतरी आपलं होतं, ते पुढेही आपलेच राहील, हे आपण केलेली एक इच्छा असते, परंतु ती प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एक ठराविक वेळ आणि काळासाठी आलेली असते, याचा मात्र विसर पडतो,

कुणीही आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी साठी आलेलं नसतंच, परंतु ते स्वीकारायला मात्र तितकच जड जातं, कारण की मृत्यू हे जीवनातील एक सत्य आहे, त्याला सामोर जावं लागतं प्रत्येकाला ,म्हणून कधीतरी कोणते तरी हात सुटून जातातच, परंतु आपल्या आयुष्यात त्याचं असलेलं अस्तित्व मात्र आठवणीच्या रूपाने जिवंत असतं,

शेवटी एक हृदय घेऊन आलोय, लाखो हृदय जिंकून जायचंय, असं म्हणतात, असं आपल्या लाईफ मध्ये काहीतरी असायला हवं ,प्रत्येकासाठी प्रत्येकाचे जीवन अनमोल आहे ,आणि त्या अनमोल जीवनात मिळालेली माणसं हे आपली ठेव आहे, म्हणून ते जपायला हवं, अशी माणसं ओळखा जी आपल्या तुमच्या लाईफ मध्ये थांबण्यासाठी धडपडत आहेत….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!