Skip to content

अशा लोकांपासून दूरच रहा, जे तुम्हाला बेकार समजतात.

अशा लोकांपासून दूरच रहा, जे तुम्हाला बेकार समजतात.


मयुरी महाजन


समोरचा माणूस आपल्याला काय समजतो, हे आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं असतं,ते यासाठी नाही की, त्याने आपली खोटी स्तुती करावी, आपल्याला मुद्दामून वरचढ सांगण्याचा प्रयत्न करावा ,परंतु त्यासाठी की आपण एखाद्याला खूप जवळचे समजतो, आणि त्याच्या नजरेत त्या गोष्टीला काही किंमतच नसेलं, तर आपलं कुठेतरी चुकतंय असं वाटायला लागतं,

प्रत्येक माणसाच्या ठाई एक गुण असतो, तो म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी का होईना, पण ते करण्याचा प्रयत्न करतच असतो, आता त्यासाठी कधी प्रयत्न कमी पडतात, तर कधी इच्छाशक्ती ,तर कधीतरी ते मिळवण्यासाठी ची जिद्द हरवलेली असते ,काही गोष्टी आयुष्यात मिळवण्यासाठी अपयशाच्या पायऱ्या सुद्धा चढाव्या लागतात ,परंतु आपल्या यशाचा काळ आपल्याला ते ज्ञान नाही देऊ शकत ,जे अपयशाचा अनुभव येताना मिळतं, त्यासारखे अमृत दुसरे नाही,

एकदा हरलो म्हणून काय झालं, पुन्हा निर्माण होण्याची उमेद ठेवावी ,परंतु या सर्वांमध्ये जेव्हा जेव्हा आपला धीर खचतो, आपण डगमगतो ,त्यावेळेस काही जण आपल्याला बेकार समजतात, आपण काहीच करू शकत नाही ,अशा प्रकारची निगेटिव्ह विचारसरणी आपल्यात निर्माण करतात, त्यामुळे पुढे जाणार्‍याचे पाय नकळत खेचले जातात ,

बघा आयुष्याकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन असायला हवा ,आपण दुसऱ्यांकडून आलेल्या स्वतःविषयीच्या विचारांना गृहीत धरून चालतो, म्हणजेच कुणीतरी आपल्याला चांगले म्हटले, आपल्याला चांगलेच वाटणार ,आणि कोणीतरी वाईट म्हटलं तर वाईटच वाटणार ,पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, कोणाच्याही चांगला म्हटल्याने आपण चांगले व वाईट म्हटल्याने वाईट होत नाही, परंतु आपल्याला तसं फील होणे, तसेच जाणवणे हे कशामुळे असते ,तर आपली बिलिव्ह सिस्टम मुळे, कारण आपण तसं मानायला लागतो, हिचं ती गोष्ट आहे, जी आपल्याला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणारी असते, ते आपल्या मान्यण्यावरती आहे,

या सर्व गोष्टी इतक्या वेगाने घडत असतात, की आपल्याला काही कळण्याच्या आतच आपल्यात कितीतरी निगेटिव्ह विचार येऊन गेलेले असतात, त्यामुळे आपण काहीही करत नसालं, बेकार म्हणून कोणीतरी आपल्याला हिणवत असेल ,तर आपण सिस्टम मध्ये ते घुसवून मान्य करण्या आधी, अशी आपल्या आजूबाजूला आपल्या मित्र परिवारात, आपल्या नातेवाईकांमध्ये ,असलेली माणसे अशांपासून दूरच राहायला हवे, त्यातच आपले हित आहे,

माणसं ओळखणे आणि खरी माणसं ओळखणे नित्तांत गरजेच आहे ,जीवनात सर्वात मोठी गफलत आपली कुठे होत असेल, तर ते म्हणजे माणसे ओळखणे, सर्वच माणसे सारखी नसतात , काही आपण पुढे जावे, यासाठी पुढे सरसावलेली असतात, समाजाला काहीतरी देण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची बाजी लावलेली असते ,पण तुलनेने अशी माणसे फार कमी बघायला मिळतात,

जे बेकार समजतात ,त्यांना बेकारच समजू देत ,त्यांच्याशी वाद घालून किंवा भांडणे करून व त्यांच्या कुठल्याही प्रश्नांचे उत्तर न देता ,शांतपणे अशांपासून दूर राहावे, वेळेपेक्षा सामर्थ्यवान काहीच नाही, आपण कुणालाही आपल्या विषयीचे स्पष्टीकरण देत बसायचे नाही, जी माणसे कायम आपली औकात तपासत असतात ,समजून घ्यावे अशी माणसे आपल्याला बेकार समजतात, काही माणसं आपल्याविषयी भ्रमात असतात, अशांना भ्रमात राहू देण्यातच आनंद असतो ,तो जर बेकार समजत असेल, तर समजू देत आपण त्यांच्या त्याच पाँइंट ला लक्षात घेऊन आपली कारकीर्द अशी गाजवावी , की त्यांना प्रश्न पडायला हवा ,अशांना आपल्याच विचारांचा ,की आपण तर याला बेकार समजत होतो, परंतु हा तर हिराचं निघाला,

मित्रांनो आपणही कधी कुणाला बेकार समजू नये, कारण बंद पडलेले घड्याळ सुद्धा दिवसातून दोनदा बरोबर वेळ सांगत असते, ही वेळ आहे, कधी कुणाची बदलेलं सांगता येत नाही, जर आपली चांगली वेळ असेल, तर कोणाला तरी नक्की मदत करा, व आपली वेळ वाईट असेल, तर संयमाने आपले कष्ट व प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवा ,आज नाहीतर उद्या पण त्याचा रिझल्ट आपल्याला नक्की मिळणार…

आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, ह्या जगात देव कधीच कुठली गोष्ट विनाकारण जन्माला घालत नाही, त्यामुळे आपण त्या गोष्टीची जाणं ठेवायला हवी, प्रत्येक व्यक्ती जगण्याच्या पाठीमागे जर त्याचे प्रारब्ध असेल, तर त्याच्या मनगटाच्या ताकदीवरती ते बदलवण्याची क्षमता सुद्धा असतेच, फक्त आपण आपल्याला काय समजतो, हे महत्त्वाचे आहे, आपण स्वतःला आपल्या प्रामाणिक नजरेने जर चांगला माणूस समजत असू,जो प्रत्येकाला हवा हवासा असेलं, तर यापेक्षा दुसरी सुंदर कृती ईश्वराची काय असू शकेल…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “अशा लोकांपासून दूरच रहा, जे तुम्हाला बेकार समजतात.”

  1. Tanmay Kailas Dukare

    खूप छान प्रेरणादायी व मस्त आणि या लेखामध्ये सत्यता आहे

  2. खूप छान प्रेरणा देणारे धन्यवाद

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!