अशा १० अर्थहीन गोष्टी ज्या आपण रोज करत असतो.
हर्षदा पिंपळे
काही अर्थहीन गोष्टी पुढीलप्रमाणे ज्या आपण रोज करत असतो.
◆ वायफळ बडबड करणे.
◆क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालणे.
◆सोशल मीडिया.
◆एकाच गोष्टीवर तासनतास विचार करणे.
◆इतरांवर कुरघोडी करणे.
◆टीव्हीवरील मालिका.
◆नको ती काळजी करत राहणे.
◆आजच काम उद्यावर ढकलणे.
◆दोष देणे.
◆वाढत्या शरीराचा सतत विचार करणे.
◆वायफळ बडबड करणे –
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काही बोलतच असतो.बरं दिवसभरात आपण इतकं बोलतो पण त्यातील बऱ्याच गोष्टी या अगदीच वायफळ असतात. त्याला खरं तर काहीच अर्थ नसतो.
उगाचच म्हणून आपण अशी वायफळ बडबड करत असतो.स्वतःबरोबर इतरांचाही वेळ यामध्ये वाया घालवत असतो.वायफळ बडबड केल्याशिवाय हल्ली माणसाचा दिवसच जात नाही.
◆क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालणे –
सगळेच दिवस सारखे असतात असं नाही.
कधी भांडणं होतात तर कधी होत नाहीत. रोजचा दिवस अगदीच रडतरडत जात नाही आणि अगदीच काही हसतहसत जात नाही. सगळ्या गोष्टींच मिश्रण हे रोज असतं.खरं तर कुणाला वाद घालायची सवय नसते तर कुणाला अगदी क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालायचीही फार वाईट सवय असते.परंतु असं सातत्याने क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालणं कितपत योग्य आहे?
क्षुल्लक गोष्टींना इतकं महत्त्व का द्यायचं ? क्षुल्लक गोष्टींवर वाद घालायला आपल्याकडे खरच इतका वेळ असतो का ?
◆टीव्हीवरील मालिका-
हल्ली टीव्हीवरील मालिकांविषयी काय बोलायचं तेच कळत नाही.काय काय आणि किती दाखवतील याची कल्पना न केलेलीच बरी.अर्थ नसलेल्या या मालिका सर्रासपणे नाही म्हंटलं तरी कित्येक घरात टक लावून पाहिल्या जातात.जरी कथानक काल्पनिक असलं तरी त्याचा परिणाम कळत नकळतपणे मनावर होत असतो.या निरर्थक मालिका पाहण्यातही कित्येकजणं दिवसातील खूप वेळ वाया घालवतात.छोटी मुलही याला अपवाद राहिली नाहीत.
◆इतरांवर कुरघोडी करणे –
इतरांवर कुरघोडी केली नाही तर आपला दिवस चांगला कसा जाणार नं ? नाही का ? कित्येकांना सवयच असते इतरांना सतत काही ना काही बोलायची, जुनं नवं उकरून काढायची… दिवसभरात एकदा तरी इतरांवर कुरघोडी केल्याशिवाय माणसाला करमत नाही.
◆कोणत्याही गोष्टीवर तासनतास विचार करणे –
एखाद्या गोष्टीवर कितीकाळ विचार करायचा याला काही मर्यादा असणं गरजेचं असतं.पण अनेकदा ज्या गोष्टीला मुळातच काही अर्थ नसतो अशा गोष्टीवरही माणूस तासनतास विचार करून वेळ वाया घालवतो.मेंदूला निष्कारण ताण देत राहतो.
◆सोशल मीडिया –
सोशल मीडियाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कित्येकांची सकाळही सोशल मीडियापासूनच सुरू होते.आणि कित्येकांची रात्र तर सोशल मीडियावरच जाते.सोशल मीडियावर किती वेळ घालवायचा आणि किती नाही याचं काही व्यवस्थापनच नाही. इतकच नाही तर सोशल मीडियाचा योग्य वापर करायचा की अयोग्य तेही अजून कित्येकांना कळत नाही.तासनतास इन्स्टा,युट्यूबवर निरर्थक असणारे व्हिडीओ पाहणे,सतत कमेंट्स, लाईक्स मोजत राहणे,वगैरे वगैरे अशा अनेक निरर्थक गोष्टी सोशल मीडियाच्या वापराद्वारे कित्येकजण करत असतात.
◆नको ती काळजी करत राहणे –
काळजी करणं हा स्वभाव नक्कीच असू शकतो.परंतु आपण एखाद्या गोष्टीची इतकी काळजी करत राहतो की त्याला काही लिमीटच नसते.आणि त्याला काही अर्थही नसतो.कारण अतिकाळजीने गोष्टी बिघडून पुन्हा वेळ वाया जाणारच असतो. स्वतःचा आणि इतरांचाही! काळजी कशाची करावी आणि कशाची नाही हेही समजायला हवं.
◆आजचं काम उद्यावर ढकलणे –
आपण आजच्या दिवसातील एकतरी काम
सतत उद्यावर ढकलत असतो.आणि असं आपण नाही
म्हंटलं तरी रोजच करत असतो.आजचं काम खरं तर नेहमी उद्यावर ढकलायची गरजच नसते.
◆दोष देणे-
दिवसभरात घडलेल्या काही गोष्टींसाठी स्वतःला/दुसऱ्यांना सतत दोष देत राहणे.
◆वाढत्या शरीराचा सतत विचार करणे-
वाढलेलं वजन ,शरिराची चरबी कित्येकांना इतकी काळजीत टाकते की,दिवसभर ती लोकं “माझं पोटच वाढलय,खूपच जाड झालेय, हे असच दिसतय,तसच दिसतय”असं बोलण्यावरच सगळी ऊर्जा खर्च करतात.
या अशा काही गोष्टी आहेत ज्या अर्थहीन वाटतात. तर या गोष्टी आपण कमी करायला हव्यात.किंवा बंद तरी करायला हव्या. या गोष्टी करण्यापेक्षा काहीतरी चांगलं करण्यावर भर द्यायला हवा. आयुष्याला अर्थपूर्ण बनवायचं असेल काही अर्थहीन गोष्टी प्रकर्षाने टाळायला हव्यात.
तर अजून काही अर्थहीन गोष्टी असतील तर त्या कोणत्या? हे सांगायला विसरू नका.
ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

