Skip to content

आपल्या अवतीभोवती मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची खरी कारणं काय आहेत ?

आपल्या अवतीभोवती मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची खरी कारणं काय आहेत ?


गीतांजली जगदाळे

(समुपदेशक)


मानसिक स्वास्थ्य जपणे महत्वाचे आहे , हे आपल्या सर्वांना पटते . पण त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे मात्र बऱ्याचदा आपल्याला नीटसं कळत नाही . दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण , महागाई , विविध chemicals वापरून वाढवलेली पिके , फळे इत्यादी या सगळ्या गोष्टींचा जसा वाईट परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर होतो तसाच सततचा ताण -तणाव , अपुरी झोप , आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर (मोबाईल , टी . व्ही . इ .) इ . गोष्टींमुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते .

आयुष्यात काही घटनांमुळे नैराश्य येते तसेच काही घटनांमुळे आनंदी , उत्साही आणि प्रेरणादायीही वाटते . म्हणजेच मानसिक आरोग्य ही स्थिर बाब नाही , हे आपल्या लक्षात येते . आपण जर कधी पांढरा ड्रेस घातला तर सतत कसे लक्ष द्यावे लागते , की कुठे डाग तर पडला नाहीये ना ? आपण स्वच्छ जागी बसलो आहोत ना ? तसच लक्ष मानसिक स्वास्थ्य जपताना द्यावं लागतं . कारण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कशाकशाचा आपल्या मानसिकतेवर कसा परिणाम होईल सांगता येत नाही .

आपलं मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो , काही गोष्टी पाळू शकतो तर काही रोजच्या आयुष्यातून वगळू देखील शकतो . पण तेच आपण आपल्या भोवताली वावरणाऱ्या माणसांना करायला सांगू शकत नाही . काही माणसे इतकी कणखर असतात की आजूबाजूच्या माणसांचा , परिस्थितीचा आणि संकटांचा

या कशाचाही त्यांच्या मानसिकतेवर सहसा परिणाम होत नाही त्याकडे तटस्थ दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांना सवय असते . अशा माणसांच्या मानसिक आरोग्यला त्यामुळे सहसा धक्काही लागत नाही . पण आपल्यात अशी माणसे फार म्हणजे फारच कमी असतात . बाकी आपण सगळी सर्वसामान्य माणसे भावनांच्या rollar coaster वरून जात असतो .

वेगवेगळ्या कारणांनी आपल्या मानसिक आरोग्यात बदल होत राहतात . त्याचे स्वरूप व दर्जा यांत फेरफार होत असतात .
मानसिक आरोग्य म्हणजे काय ? त्यात कोणकोणत्या बाबींचा, प्रक्रियांचा समावेश असतो ? या प्रश्नांची उत्तरे जीवनाविषयक योग्य पर्यायांची निवड करण्यासाठी प्रेरक ठरतात .

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येप्रमाणे ‘ आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा किंवा दुर्बलतेचा अभाव नव्हे , तर त्याजोडीने शारीरिक , मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची पूर्णस्वरूप स्थिती असणे होय ‘. या व्याख्येत केलेल्या मानसिक आरोग्याच्या समावेशावरून त्याचे महत्व आपल्या सहज लक्षात येते .

WHO ने केलेली मानसिक आरोग्याची व्याख्याही या बाबींवर प्रकाश टाकते . या व्याख्येप्रमाणे ‘ मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्वास्थ्यस्थिती – ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल , दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल , productivity वाढवून कार्यरत राहील व समाजप्रती योगदान देऊ शकेल ‘. या समर्पक व्याख्येत व्यक्तीच्या जीवनातील मानसिक स्वास्थ्याचे अविभाज्य अस्तित्व आणि त्याचा सखोल व दूरगामी प्रभावी दिसून येतो .

या व्याख्येतले घटक व प्रक्रियांकडे लक्षपूर्वक पाहता असे जाणवते , की यावर अनुवांशिक व परिस्थितीजन्य बाबींचा प्रभाव स्वाभाविकच असणार . याबरोबरच व्यक्तिमत्वाचे विशिष्ट पैलूही आपली छाप पाडत असतात . त्यातील विचार , भावना व वर्तन या त्रिसूत्रीची भलीमोठी कसरत होत असते . हे तिन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत . एका घटकाचा इतर दोन्हीवर नियमित परिणाम होत असतो . हे त्रिसूत्री चक्र सतत कार्यरत असते आणि आपले मानसिक आरोग्य व त्याची सुदृढता ठरवीत असते .

आता आपण आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणात असलेले असे घटक बघू ज्याने आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते . काही घटकांचा काही लोकांवर इतर लोकांपेक्षा जास्त परिणाम होऊ शकतो .

१ . बाल लैंगिक / मानसिक शोषण
२ . एकटेपणा

३ . शिक्षणाच्या , कामाच्या इ . ठिकाणी अनुभवास आलेला भेदभाव
४ . गरिबी , कर्ज

५ . शारीरिक आरोग्य खूप काळापर्यंत निरोगी नसणे .
६ . ड्रग्ज किंवा दारूचा अतिवापर
७ . घरगुती हिंसा , bullying इ .


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!